
भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी अल्ट्राव्हायोलेटने (Ultraviolette) EICMA 2026 मध्ये आपली नवीन Ultraviolette Tesseract Maxi इलेक्ट्रिक मॅक्सी-स्कूटर सादर केली आहे. 6 kWh बॅटरी, 20 hp पीक पॉवर आणि Hypersense Radar टेक्नोलॉजीसह ही स्कूटर युरोपियन मार्केटसाठी तयार करण्यात आली आहे. यामध्ये 7 इंच टचस्क्रीन TFT डिस्प्ले, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेन चेंज असिस्ट आणि कोलिजन अलर्ट यांसारखी आधुनिक फीचर्स मिळतात. शहरातील प्रवासासोबत लांब पल्ल्याच्या राइडिंगसाठीही या स्कूटरची रचना करण्यात आली आहे.
Tesseract Maxi मध्ये 6 kWh बॅटरी पॅक देण्यात आला असून ही स्कूटर 20 hp पीक पॉवर जनरेट करते. फास्ट चार्जिंगच्या मदतीने बॅटरी 1 तासापेक्षा कमी वेळेत 80% पर्यंत चार्ज करता येते, असा कंपनीचा दावा आहे. त्यामुळे रोजच्या प्रवासासोबत लांब अंतर कापणाऱ्या रायडर्ससाठीही ही स्कूटर उपयोगी ठरू शकते. यामध्ये 14 इंच व्हील्स देण्यात आले असून बॉडीची स्ट्रक्चर एरोडायनॅमिक पद्धतीने करण्यात आली आहे.
Hero Scrambler Concept EICMA 2026 मध्ये सादर! Dakar Rally स्टाइलसह प्रीमियम बाइकची झलक
या स्कूटरचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे Hypersense Radar सिस्टीम. या टेक्नोलॉजीच्या मदतीने आजूबाजूच्या वाहतुकीवर लक्ष ठेवता येते. यामध्ये Blind Spot Detection, Lane Change Assist, Overtaking Assist आणि रिअल-टाइम Collision Alerts मिळतात. याशिवाय इंटिग्रेटेड डॅशकॅम आणि Omnisense मिरर्स देण्यात आले आहेत. मिरर्समध्ये मल्टीकलर LED इंडिकेटर्स असल्यामुळे रायडरला आजूबाजूच्या वाहनांशी संबंधित सूचना सहज समजू शकतात.
रायडरच्या सुरक्षिततेसाठी ट्रॅक्शन कंट्रोल आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंगची सुविधाही देण्यात आली आहे. स्कूटरच्या सीटखाली 32 लिटर स्टोरेज स्पेस मिळते. त्यामुळे हेल्मेट आणि रोजच्या वापरातील वस्तू ठेवणे सोपे होऊ शकते. लांब प्रवासासाठी कंपनी टूरिंग व्हायझर, नकल गार्ड्स, टेल बॅग आणि पॅनियर स्टेज यांसारख्या अॅक्सेसरीजही देणार आहे.
रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 ची EICMA 2026 मध्ये एन्ट्री; सर्व किंमती जाहीर
टेक्नोलॉजीच्या बाबतीत 7 इंच टचस्क्रीन TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. दरम्यान, EICMA 2026 मध्ये अल्ट्राव्हायोलेटने SoundHound AI सोबतच्या भागीदारीत Violette AI कॉन्सेप्टही दाखवला. यामध्ये व्हॉइस कमांडद्वारे नेव्हिगेशन सुरू करणे, रायडिंग मोड बदलणे, प्री-राइड चेक आणि सर्व्हिसची माहिती मिळवणे शक्य होणार आहे. त्यामुळे Tesseract Maxi ही केवळ इलेक्ट्रिक स्कूटर नसून कनेक्टेड रायडिंग टेक्नोलॉजीचेही उदाहरण ठरते. भारतातील लाँच आणि किंमतीबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही.
Ans: या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 6 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार फास्ट चार्जिंगद्वारे बॅटरी 1 तासापेक्षा कमी वेळेत 80% पर्यंत चार्ज होते.
Ans: यामध्ये Hypersense Radar, Blind Spot Detection, Lane Change Assist, Overtaking Assist, Collision Alerts, ट्रॅक्शन कंट्रोल आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग मिळते.
Ans: या स्कूटरमध्ये सीटखाली 32 लिटर स्टोरेज स्पेस मिळते. याशिवाय टूरिंग व्हायझर, नकल गार्ड्स, टेल बॅग आणि पॅनियर स्टेज यांसारख्या अॅक्सेसरीजही मिळतील.