Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

600 किमीची रेंज, मॉडर्न फीचर्स आणि बरंच काही! मार्केटमध्ये लवकरच एंट्री मारणार ‘या’ Electric Cars

भारतीय ऑटो बाजारात लवकरच एकापेक्षा एक इलेक्ट्रिक कार्स लाँच होणार आहेत. विशेष म्हणजे या कार्स उत्तम रेंज आणि फीचर्सने सुसज्ज असणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 19, 2026 | 06:17 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • नवनवीन इलेक्टिक कार येणार
  • 600 किमीपर्यंतची रेंज मिळणार
  • जाणून घ्या आगामी इलेक्ट्रिक कार्सबद्दल
भारतात Electric Car ची मागणी झपाट्याने वाढत आहे आणि आता वाहन कंपन्या जास्त रेंज देणाऱ्या नवीन EV कार्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. विशेषतः 600 किमीपर्यंत रेंज देणाऱ्या कार्सवर भर दिला जात आहे, जेणेकरून वारंवार चार्जिंगची चिंता कमी होईल. येत्या काळात अशा अनेक दमदार इलेक्ट्रिक कार्स भारतीय बाजारात येणार आहेत, ज्यामध्ये लॉंग रेंज, आधुनिक फीचर्स आणि आकर्षक डिझाइन पाहायला मिळेल.

Toyota Urban Cruiser Ebella

या यादीत पहिलं नाव टोयोटाच्या अर्बन क्रूझर एबेला या इलेक्ट्रिक कारचं आहे. कंपनी लवकरच आपली पहिली EV बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. ही कार दिसायला मारुतीच्या इलेक्ट्रिक मॉडेलसारखी असू शकते. यात दोन प्रकारचे बॅटरी पॅक मिळतील, ज्यापैकी एक 440 किमी तर दुसरा सुमारे 543 किमी रेंज देईल. या कारची किंमत अंदाजे 16 लाख रुपयांच्या आसपास असू शकते.

अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर कोणती Automatic Car खरेदी करणे तुमच्यासाठी बेस्ट?

Tata Sierra EV

टाटा सिएरा EV ही कार नव्या अवतारात पुन्हा सादर केली जाणार आहे. आधुनिक डिझाइनसह येणारी ही कार एका चार्जमध्ये सुमारे 600 किमीपर्यंत चालू शकते. याशिवाय टाटा कंपनी आपल्या Tata Safari EV या मॉडेललाही लॉन्च करू शकते. ही 6 आणि 7 सीटर SUV असून यामध्येही सुमारे 600 किमी रेंज अपेक्षित आहे.

Nissan Leaf 2026

निसान लीफ 2026 हे मॉडेलही अधिक आधुनिक डिझाइन आणि तंत्रज्ञानासह लॉन्च होण्याची शक्यता आहे. या कारची रेंज सुमारे 600 किमीपर्यंत असू शकते. यात फास्ट चार्जिंग, प्रीमियम इंटीरियर आणि स्मार्ट फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, भारतात लॉन्चबाबत अद्याप स्पष्ट माहिती नाही.

Hybrid सेगमेंटमध्ये ‘या’ कंपनीची जोरदार एंट्री! भारतात एकापेक्षा एक दमदार कार लाँच होण्याच्या तयारीत

Kia Syros EV

किआ सायरोस EV ही कार टाटा नेक्सनला टक्कर देण्यासाठी आणली जाऊ शकते. बजेटचा विचार करून ही कार तयार केली जात असून, यात अलॉय व्हील्स आणि ऑटोमॅटिक ग्रिलसारखे फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. याची रेंज सुमारे 500 किमीपर्यंत असू शकते.

याशिवाय अनेक कंपन्या 600 किमी किंवा त्यापेक्षा जास्त रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक SUV आणि सेडान्सवर काम करत आहेत. या कार्समध्ये सुधारित बॅटरी टेक्नोलॉजी, फास्ट चार्जिंग आणि प्रगत कनेक्टेड फीचर्स मिळणार आहेत.

Web Title: Upcoming electric cars in 2026 toyota urban cruiser ebella tata sierra ev

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric car

संबंधित बातम्या

अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर कोणती Automatic Car खरेदी करणे तुमच्यासाठी बेस्ट?
1

अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर कोणती Automatic Car खरेदी करणे तुमच्यासाठी बेस्ट?

Hybrid सेगमेंटमध्ये ‘या’ कंपनीची जोरदार एंट्री! भारतात एकापेक्षा एक दमदार कार लाँच होण्याच्या तयारीत
2

Hybrid सेगमेंटमध्ये ‘या’ कंपनीची जोरदार एंट्री! भारतात एकापेक्षा एक दमदार कार लाँच होण्याच्या तयारीत

कार खरेदीदारानो, वाईट बातमी आली! ‘या’ तुमच्या आवडत्या SUV च्या किमतीत झाली 40,000 रुपयांपर्यंतची वाढ
3

कार खरेदीदारानो, वाईट बातमी आली! ‘या’ तुमच्या आवडत्या SUV च्या किमतीत झाली 40,000 रुपयांपर्यंतची वाढ

चीनमध्ये तयार होणारी कार चीनच्याच कंपनीला टक्कर देणार! 751 किमीची रेंज आणि बरंच काही
4

चीनमध्ये तयार होणारी कार चीनच्याच कंपनीला टक्कर देणार! 751 किमीची रेंज आणि बरंच काही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.