
आई-बाबा झाल्यानंतर Vicky Kaushal - Katrina Kaif ने खरेदी केली 'ही' लक्झरी कार
Lexus LM350h 4S असे या कारचे नाव असून याची किंमत इतकी जास्त आहे की तुम्ही सहज तुमच्या गावी 10-12 बंगले बांधू शकाल. विकी कौशलचा या चार सीटर कारवरून प्रवास करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
माहितीनुसातर, विकी कौशलने खरेदी केलेली लेक्सस LM350h 4S कार अल्ट्रा-लक्झरी वाहनांच्या श्रेणीत येते. या कारची किंमत सुमारे 3.20 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. महागड्या किमतीसोबतच या कारमध्ये प्रीमियम फीचर्स सुद्धा आहेत. जे या कारची शान वाढवतात.
Car Loan घेणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI ने रेपो रेट कमी केल्याने आता द्यावा लागेल ‘फक्त’ इतकाच EMI
ही कार हायब्रिड इंजिनच्या साहाय्याने चालते. यामध्ये ब्रेक असिस्ट आणि रडार कॅमेरा सारखी ड्राइव्ह-असिस्ट वैशिष्ट्ये देखील आहेत, ज्यामुळे ड्रायव्हिंग सोपे आणि सुरक्षित होते. कारमध्ये क्लायमेट कंट्रोल, पॉवर डोअर्स, चार्जिंग, अपस्केल इंटिरिअर आणि वूडन-लेदर फिनिश देखील आहे.
7 नोव्हेंबर 2025 रोजी विकी कौशल बाबा झाला. त्यांची पत्नी आणि अभिनेत्री कतरिना कैफने एका मुलाला जन्म दिला. या जोडप्याने सोशल मीडियावर अधिकृत घोषणा करत लिहिले की, “आमच्या आनंदाचे आगमन झाले आहे. आम्ही आमच्या मुलाचे अपार प्रेम आणि कृतज्ञतेने स्वागत करतो.” लग्नाच्या चार वर्षांनी विकी आणि कतरिना आई-बाबा झाले. त्यांनी 2021 मध्ये लग्न केले होते.