फोटो सौजन्य: iStock
रिझर्व्ह बँकेने रेपो दर (RBI रेपो दर) 0.25 टक्के कमी करून सर्वसामान्यांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. रेपो दरातील या कपातीचा थेट परिणाम तुमच्या EMI वर होणार आहे. कार EMI भरणाऱ्यांचा EMI आता पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे. 2025 च्या सुरुवातीला RBI ने फेब्रुवारी 2025, एप्रिल 2025 आणि जून 2025मध्ये रेपो दर कमी केला होता. RBI च्या या निर्णयानंतर तुम्ही आधी किती EMI भरत होता आणि तुमच्या कार लोनचा EMI किती असेल याबद्दल जाणून घेऊयात.
एसबीआयच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, 13 ऑक्टोबर 2025 पासून किमान कार लोनचा ईएमआय 8.75 टक्के होता आणि आता, रेपो दरात 25 बेसिस पॉइंट कपात केल्यानंतर, कार कर्जाचा ईएमआय 8.50 टक्के होईल. नवीन आणि जुन्या दोन्ही दरांवर आधारित तुमच्या कारच्या ईएमआयचे कॅल्क्युलेशन करूयात.
पुतीन यांची Aurus Senat कार भारी की Toyota Fortuner? जाणून घ्या किंमत
जर एखाद्या व्यक्तीने 10 लाखांची कार खरेदीसाठी 5 वर्षांचा कर्ज घेतले असेल, तर पूर्वी 8.75% व्याजदरानुसार त्याची मासिक EMI 20,673 रुपये इतका येत होते. परंतु आता व्याजदर 8.50% झाल्यानंतर हा EMI कमी होऊन 20,517 रुपये झाला आहे. म्हणजेच 10 लाखांच्या लोनवर दर महिन्याला सुमारे 120 रुपयांची बचत होणार आहे.
जर 15 लाखांचे कार लोन (5 वर्षे) घेतले असेल, तर आधी 8.75% व्याजदर असताना मासिक EMI 30,956 रुपये भरावा लागत होता. पण नवीन 8.50% व्याजदरानुसार हा EMI कमी होऊन 30,775 रुपये झाला आहे. म्हणजेच 15 लाखांच्या लोनवर दर महिन्याला 181 रुपयांची बचत होईल.
Range Rover नाही तर ‘या’ SUV मधून PM Modi आणि Putin यांचा प्रवास, कारला VIP नंबर प्लेट देखील नाही
जर 20 लाखांची कार खरेदी करण्यासाठी 5 वर्षांचा लोन घेतला असेल, तर आधीच्या 8.75% व्याजदरानुसार दर महिन्याला 41,274 रुपयांचा EMI भरावा लागत होता. मात्र आता व्याजदर 8.50% झाल्यानंतर हा EMI कमी होऊन 41,033 रुपये झाला आहे. याचा अर्थ, 20 लाखांच्या लोनवर दर महिन्याला सुमारे 241 रुपयांची बचत होणार आहे.






