फोटो सौजन्य: @VinFastofficial (X.com)
भारतीय ऑटो मार्केटवर अधिराज्य गाजवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी अनेक ऑटो कंपन्या दमदार कार ऑफर करत असतात. भारतातील कार्सची वाढती मागणी नेहमीच विदेशातील अनेक ऑटो कंपन्यांना आकर्षित करत असते. त्यात आता भारतीय ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार्सना चांगली मागणी मिळताना दिसत आहे.
देशात EVs च्या विक्रीत वाढ होत असल्यामुळे अनेक देशातील प्रमुख इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्या भारतात एंट्री मारण्याच्या तयारीत आहेत. अशातच आता व्हिएतनामची आघाडीची वाहन उत्पादक कंपनी विनफास्ट देखील भारतीय बाजारात एंट्री मारण्याची तयारी करत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
फक्त 50,000 रुपयांच्या डाउन पेमेंटमध्ये हातात येईल Tata Nexon ची चावी, ‘असा’ EMI चा सोपा हिशोब
विनफास्ट कंपनीने भारतात अधिकृतपणे आपला प्रवास सुरू करण्यापूर्वी, देशभरातील अनेक शहरांमध्ये दोन मॉडेल्स प्रदर्शित करण्यात आले आहेत. कंपनी अनेक शहरांमधील प्रमुख शॉपिंग मॉल्समध्ये Vinfast VF6 आणि Vinfast VF7 इलेक्ट्रिक SUV शोकेस करत आहे.
कंपनीने उचललेल्या या पावलानंतर, हे स्पष्ट झाले आहे की विनफास्ट कार लवकरच भारतीय बाजारात अधिकृतपणे लाँच केल्या जातील. या दोन्ही इलेक्ट्रिक एसयूव्ही कंपनीकडून प्रथम बाजारात आणल्या जातील.
पहिल्या टप्प्यात विनफास्टच्या कार देशातील काही मोजक्याच शहरांमध्ये उपलब्ध करून दिल्या जाण्याची शक्यता आहे. यामध्ये चेन्नई, हैदराबाद, दिल्ली, अहमदाबाद, पुणे, विजयवाडा, गुरुग्राम, बेंगळुरू, तिरुवनंतपुरम, लखनऊ आणि कोची यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कंपनी या 11 शहरांमध्ये त्यांच्या कार प्रदर्शित करत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या शहरांमध्ये मुबईचा समावेश नाही.
लेहच्या रस्त्यांवर धावणार पहिली Hydrogen Bus, 2.5 कोटीच्या बसचे काय आहे वैशिष्ट्य
विनफास्ट एशियाचे सीईओ फाम सॅन चाऊ म्हणाले की, भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर, आम्ही VF 7 आणि VF 6 भारतीय ग्राहकांसाठी लाँच करण्यास उत्सुक आहोत. प्रमुख शॉपिंग सेंटरमध्ये त्यांचे प्रदर्शन केल्याने ग्राहकांना आणि ईव्ही प्रेमींना आमच्या इलेक्ट्रिक एसयूव्ही प्रत्यक्ष अनुभवण्याची आणि भारतात शाश्वत गतिशीलता वाढविण्यात विनफास्टची प्रमुख भूमिका पाहण्याची मौल्यवान संधी मिळते.
विनफास्टने जानेवारी 2025 मध्ये झालेल्या ऑटो एक्स्पो दरम्यान भारतीय मार्केटमध्ये आपल्या कार सादर केल्या. त्यानंतर, या दोन मॉडेल्ससह, इतर अनेक मॉडेल्स देखील प्रदर्शित करण्यात आले आहेत.