लेहमध्ये सुरु होतेय पहिली हायड्रोजन बस (फोटो सौजन्य - NTPC Ltd)
आता लडाखची राजधानी लेहमध्ये स्वच्छ ऊर्जेच्या बसेस अर्थात हायड्रोजन सेल बस धावतील. ही केवळ लडाखसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी एक नवीन सुरुवात आहे. लेहमध्ये पहिल्यांदाच हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानावर चालणारी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ही बस केवळ पर्यावरणपूरकच नाही तर लेहची उंची आणि थंड हवामान लक्षात घेऊन ती विशेषतः डिझाइन करण्यात आली आहे. IANS च्या वृत्तानुसार, ही सेवा सोमवार किंवा मंगळवारपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पाचा उद्देश फक्त बस चालवणे नाही तर कार्बनमुक्त लडाखच्या दिशेने एक ठोस पाऊल उचलणे आहे. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाचा एक भाग आहे, ज्यामध्ये त्यांनी २०२० मध्ये स्वातंत्र्यदिनी लडाखला देशातील पहिले कार्बन न्यूट्रल राज्य बनवण्याची घोषणा केली होती. त्यांनी म्हटले होते की लडाखमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत आणि आपण लडाखचा निसर्ग, संस्कृती आणि हवामान वाचवले पाहिजे (फोटो सौजन्य – NTPC Limited)
हायड्रोजन मोबिलिटी प्रोजेक्ट
हा विचार पुढे नेत, मोदी सरकारने NTPC (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन) च्या सहकार्याने ग्रीन हायड्रोजन मोबिलिटी प्रोजेक्ट अंतर्गत हा प्रकल्प सुरू केला आहे. ही बस सेवा फक्त एक सुरुवात आहे. भविष्यात, लडाख आणि देशभरात असे अनेक उपक्रम दिसून येतील, जे भारताच्या हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल मजबूत करतील असा विश्वासही त्यांनी दर्शवला आहे.
एका बसची किंमत
या प्रकल्पांतर्गत,NTPC ने समुद्रसपाटीपासून ११,५६२ फूट उंचीवर लेहच्या सर्वोच्च ठिकाणी १.७ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प बांधला आहे. या सौरऊर्जा प्रकल्पातून हायड्रोजन तयार केले जाईल आणि या बसेसना ऊर्जा पुरवली जाईल. यासाठी लेह प्रशासनाने एनटीपीसीला ७.५ एकर जमीन भाड्याने दिली आहे. या प्रकल्पात समाविष्ट असलेल्या हायड्रोजन बसेस वाहन उत्पादक कंपनी अशोक लेलँडकडून खरेदी केल्या आहेत. एका बसची किंमत सुमारे २.५ कोटी रुपये आहे.
सुरुवातीला ३ रूट्स
लेहमधील सिडकोचे ऑपरेशन इनचार्ज ताशिचोजिन म्हणाले की, आतापर्यंत पाच बसेस आल्या आहेत. या बसेस तीन मार्गांवर चालवण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, सोमवार किंवा मंगळवारपासून बस सेवा सुरू होईल. सध्या ही बस चाचणी म्हणून एक किंवा दोन दिवस चालवली जाईल. जर काही अडचण आली नाही तर नियमित सेवा सुरू केली जाईल.
एका चार्जवर २३० किमी अंतर
ताशिचोजिन म्हणाले की, प्रत्येक बसमध्ये ३२ प्रवाशांची बसण्याची क्षमता आहे आणि ती एका चार्जवर सुमारे २३० किमी अंतर कापू शकते. या बसेसचे भाडेदेखील इलेक्ट्रिक बसेससारखेच असेल, ज्यामुळे प्रवाशांना आर्थिक फायदाही होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. आता यापुढे अजून किती बस येणार आणि आलेल्या बसचा कसा फायदा होणार हे बघावे लागेल.
कार खरेदी करण्याचा प्लॅन करताय? June 2025 मध्ये Google वर ट्रेंड होत आहेत ‘या’ 5 इलेक्ट्रिक कार