फोटो सौजन्य: @AarizRizvi/ X.com
भारतात इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारी मागणी पाहता अनेक विदेशी ऑटो कंपन्या देखील इलेक्ट्रिक कार ऑफर करताना दिसत आहे. अशीच एक कंपनी म्हणेज व्हिएतनामची VinFast कंपनी.
व्हिएतनामची कार निर्माता कंपनी VinFast ने भारतात आपल्या नव्या VinFast VF MP7 या इलेक्ट्रिक MPVची पहिली झलक सादर केली आहे. यामुळे ही कार लवकरच भारतीय बाजारात लॉन्च होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही 7-सीटर इलेक्ट्रिक गाडी असून कुटुंबासाठी खास डिझाइन करण्यात आली आहे.
E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर
VF MP7 खासगी वापर लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. यात लेदरसारख्या आरामदायी सीट्स, आकर्षक इंटीरियर लाइटिंग, की-लेस एंट्री आणि 19 इंचाचे अलॉय व्हील्स दिले आहेत. यामुळे प्रवास अधिक आरामदायी आणि प्रीमियम वाटतो.
रिपोर्टनुसार, या MPVचा डिझाइन VinFastच्या खास स्टाइलमध्ये करण्यात आला आहे. यात LED हेडलाइट्स आणि रियर कनेक्टेड लाइट्स दिल्या आहेत, ज्यामुळे गाडीला आधुनिक लूक मिळतो. इंटीरियरमध्ये 10.1 इंचाची टचस्क्रीन, चार्जिंगसाठी USB पोर्ट्स, उंची समायोजित करता येणारी ड्रायव्हर सीट आणि सहज वापरता येणारे स्टीयरिंग व्हील दिले आहे.
या कारबाबत सर्व तपशील अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेले नाहीत. मात्र, मीडिया रिपोर्टनुसार यामध्ये सुमारे 60.1kWh क्षमतेची बॅटरी आणि फ्रंट-अॅक्सलवर आधारित इलेक्ट्रिक मोटर दिली जाऊ शकते. ही मोटर अंदाजे 150bhp पॉवर आणि 280Nm टॉर्क निर्माण करू शकते, ज्यामुळे शहरातील आणि लांब पल्ल्याच्या ड्रायव्हिंगसाठी चांगली परफॉर्मन्स मिळण्याची अपेक्षा आहे.
भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार झपाट्याने वाढत आहे आणि VinFast देखील आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. MPV सेगमेंट भारतात विशेषतः लोकप्रिय आहे, कारण या गाड्या जास्त जागा आणि बहुउद्देशीय वापरासाठी योग्य असतात.
ही कार पुढील काही आठवड्यांत लॉन्च होण्याची शक्यता असून, तिचे वेगवेगळे व्हेरिएंट, किंमत आणि रंगांची माहिती लवकरच जाहीर केली जाईल.






