फोटो सौजन्य: Gemini
महिंद्रा भारतीय बाजारपेठेत विविध सेगमेंटमधील वाहनांची विक्री करते. कंपनीने ICE आणि EV (इलेक्ट्रिक वाहन) या दोन्ही विभागांमध्ये SUVs ची एक्स्टेंडेड रेंज ऑफर करून देतो. आपल्या पारंपारिक SUVs सोबतच, भारतात या कंपनीच्या इलेक्ट्रिक SUVs ला असलेली मागणीही सातत्याने वाढत आहे.
Tesla ला डच्चू देत ‘ही’ चिनी ऑटो कंपनी गेली पुढे! तरीसुद्धा प्रॉफिट पडलाच कसा?
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक SUV विभागात वाहनांची मागणी वेगाने वाढत आहे. केवळ गेल्या एका वर्षातच, महिंद्राने या विभागातील 50000 हून अधिक SUV वाहनांची विक्री केली आहे.
इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये Mahindra & Mahindra कडून Mahindra BE6, Mahindra XEV 9e आणि Mahindra XEV 9s या तीन आधुनिक SUV ऑफर केल्या जातात. या तिन्ही गाड्या आकर्षक डिझाइन आणि अत्याधुनिक फीचर्ससह सादर करण्यात आल्या आहेत.
BE6 मध्ये अनेक प्रीमियम फीचर्स दिले आहेत. यात एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, 12.3 इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 12.3 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो. याशिवाय फ्रंक (ड्रेन होलसह), इल्यूमिनेटेड लोगो, C-शेप LED DRLs आणि टेल लॅम्प्स, रिअर स्पॉयलर, पॅनोरॅमिक सनरूफ यांसारखे फीचर्स आहेत.
Tata Motors ची ऐतिहासिक कामगिरी, ‘इतक्या’ लाख वाहनांच्या विक्रीसह आर्थिक वर्ष 26 मध्ये नवा विक्रम!
कारमध्ये 19 इंच अलॉय व्हील्स, ॲम्बिएंट लाइटिंग, हरमन कार्डनचे 16-स्पीकर ऑडिओ सिस्टम (Dolby Atmos), अॅप स्टोअर, Alexa आणि ChatGPT सपोर्ट, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, OTA अपडेट्स आणि वायरलेस Android Auto व Apple CarPlay मिळतात.
याशिवाय क्रूझ कंट्रोल, ड्युअल झोन ऑटो AC, 360 डिग्री कॅमेरा, वेंटिलेटेड सीट्स, ड्रायव्हर मेमरी सीट, पावर्ड टेलगेट (जेस्चर कंट्रोलसह), एअर प्युरिफायर आणि इतर अनेक सोयी उपलब्ध आहेत.
XEV 9e मध्येही आधुनिक फीचर्सचा भरपूर समावेश आहे. यामध्ये एअर प्युरिफिकेशन सिस्टम, UV प्रोटेक्टेड सनरूफ, हरमन कार्डन ऑडिओ सिस्टम (Dolby Atmos), AR आधारित हेड्स-अप डिस्प्ले आणि 5G कनेक्टिव्हिटी दिली आहे.
तसेच Amazon Alexa इंटिग्रेशन, स्मार्ट व्हेइकल टेक्नॉलॉजी, कूल्ड सेंटर कन्सोल, 60:40 स्प्लिट रिअर सीट्स आणि टेलिस्कोपिक अॅडजस्टेबल स्टीयरिंग व्हीलसारखे फीचर्सही उपलब्ध आहेत.
XEV 9s ही अधिक प्रीमियम SUV असून यात प्रगत टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. यात Qualcomm Snapdragon 8295 चिपसेट, ऑटो पार्क असिस्ट, व्हिडिओ कॉलिंग सपोर्ट आणि VisionX AR HUD दिले आहे.
याशिवाय Secure360 सर्व्हिलन्स सिस्टम, ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टम, इंटेलिजंट अॅडॅप्टिव्ह सस्पेन्शन, सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर्स आणि 7 एअरबॅग्स मिळतात. ही SUV लेव्हल 2+ ADAS (5 रडार + 1 कॅमेरा) सह येते.
कारमध्ये अॅक्यूस्टिक लॅमिनेटेड ग्लास, ड्युअल वायरलेस चार्जिंग, पावर्ड को-ड्रायव्हर सीट (Boss मोड), वेंटिलेटेड सेकंड-रो सीट्स, सॉफ्ट-रॅप्ड डॅशबोर्ड आणि 16-स्पीकर हरमन कार्डन ऑडिओ सिस्टम (Dolby Atmos) यांसारखे प्रीमियम फीचर्स दिले आहेत.






