फोटो सौजन्य: www.volkswagen.co.in
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत, ज्या विविध सेगमेंटमध्ये कार्स ऑफर करत असतात. त्यातही भारतात एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना दमदार मागणी पाहायला मिळते. म्हणूनच तर आता या सेगमेंटमध्ये ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक कार्स देखील लाँच करत आहे.
जर्मन ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी फोक्सवॅगनने भारतीय मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये उत्तम कार्स विकल्या आहेत. आज म्हणजेच 14 एप्रिल 2025 रोजी कंपनीने Volkwagen Tiguan R-Line अधिकृतपणे लाँच केली आहे. या कारमध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले आहेत? यात किती शक्तिशाली इंजिन आहे? या एसयूव्हीची किंमत किती आहे? त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
फोक्सवॅगनने भारतीय बाजारात टिगुआन आर-लाइन अधिकृतपणे लाँच केली आहे. कंपनीने ही कार फुल साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये लाँच केली आहे.
फोक्सवॅगनने टिगुआन आर-लाइन एसयूव्हीमध्ये 2-लिटर टीएसआय इव्हो पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 204 पीएसची शक्ती आणि 320 न्यूटन मीटरचा टॉर्क देईल. यात 7-स्पीड डीएसजी ट्रान्समिशन देण्यात आले आहे. यासोबतच, यात 4 मोशन ऑल व्हील ड्राइव्ह क्षमता देण्यात आली आहे, ज्यामुळे ही कार कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर चालवता येते.
फोक्सवॅगन टिगुआन आर लाईनमध्ये कंपनीने अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत. ज्यामध्ये 15-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम स्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार प्ले, 10.25 -इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, आयडीए व्हॉइस असिस्टंट, रोटरी कंट्रोलरसह स्क्रीन, आठ स्पीकर ऑडिओ सिस्टम, हेड-अप डिस्प्ले, मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल, दोन वायरलेस चार्जिंग पॉड्स, पॅनोरॅमिक सनरूफ, मॅट्रिक्स हेडलाइट, अँबियंट लाईट, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट, एलईडी डीआरएल, रूफ रेल यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.
या नवीन एसयूव्हीमध्ये प्रवाशांच्या सेफ्टीचीही काळजी घेण्यात आली आहे. यात नऊ एअरबॅग्ज, टीपीएमएस, हिल स्टार्ट असिस्ट आणि हिल डिसेंट कंट्रोल, समोर आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक, 21 फीचर्ससह Level 2 ADAS सारखे सेफ्टी फीचर्स दिले आहे.
ही एसयूव्ही फोक्सवॅगनने 48.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केली आहे. काही काळानंतर या कारच्या किमतीत बदल दिसू शकतो
फोक्सवॅगन टिगुआन आर-लाइन एसयूव्ही फुल साइझ एसयूव्ही सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. या सेगमेंटमध्ये ही कार Toyota Fortuner, Legender, JSW MG Gloster आणि लवकरच लाँच होणाऱ्या Skoda Kodiaq सोबत थेट स्पर्धा करेल.