फोटो सौजन्य: @MotorOctane (X.com)
आपली स्वतःची कार असावी असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न साकार करण्यासाठी अनेक जण रात्रंदिवस मेहनत करत असतात. पैश्यांची जास्तीतजास्त बचत करत असतात. त्यात आज EMI मुळे आपली आवडती कार खरेदी करणे शक्य झालं आहे.
मारुती सुझुकी ही देशातील आघाडीच्या कार उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीने नेहमीच ग्राहकांच्या मागणीनुसार दमदार कार्स मार्केटमध्ये सादर केल्या आहे. यापैकीच एक म्हणजे Maruti Fronx. भारतीय मार्केटमध्ये मारुती सुझुकी फ्रॉन्क्सला मोठी मागणी आहे. अलीकडेच, कंपनीने व्हेरियंटनुसार या कारची किंमत 2,500 रुपयांपर्यंत वाढवली आहे. पूर्वी फ्रॉन्क्सची सुरुवातीची किंमत 7.52 लाख रुपये होती, आता ही किंमत 7.54 लाख रुपये झाली आहे.
Kia चा फ्युचर प्लॅन वाचलात का? 2030 पर्यंत प्रत्येक 100 कारपैकी 43 इलेक्ट्रिक कार विकण्याचा मानस
जर तुम्हीही मारुती फ्रॉन्क्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आपण जाणून घेऊयात की ही उत्तम कार तुम्ही EMI वर कशी खरेदी करू शकता. तुमचा पगार 40 हजार रुपये असला तरी तुमच्या बजेटनुसार तुम्ही मारुती सुझुकी फ्रॉन्क्स खरेदी करू शकता.
मारुती सुझुकी फ्रॉन्क्सचा सर्वाधिक विक्री होणारा व्हेरियंट अल्फा टर्बो (पेट्रोल) आहे, ज्याची ऑन-रोड किंमत 13 लाख 13 हजार रुपये आहे. जर तुम्ही 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट देऊन हा व्हेरियंट खरेदी केला तर उर्वरित रक्कम 9.8 टक्के व्याजदराने 5 वर्षांसाठी सुमारे 23,500 रुपये ईएमआय म्हणून भरावा लागेल. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की मारुती फ्रॉन्क्सची ऑन-रोड किंमत शहरे आणि डीलरशिपनुसार बदलू शकते.
33 किमीचा मायलेज देणारी ‘ही’ कार झाली अजूनच महाग, द्यावे लागेल ‘इतके’ अतिरिक्त पैसे
आता या मारुती कारमध्ये कोणते फीचर्स उपलब्ध आहेत याबद्दल जाणून घेऊया. तुम्हाला या कारच्या आतील भागात ड्युअल-टोन फीचर आणि समोरील भागात हेड-अप डिस्प्ले देखील मिळेल. फ्रॉन्क्समध्ये 360-डिग्री कॅमेरा फीचर देखील आहे. या कारमध्ये ARKAMYS ची 9-इंचाची स्मार्टप्ले प्रो प्लस इन्फोटेनमेंट सिस्टम देखील आहे. कारमध्ये वायरलेस चार्जरने मोबाईल फोन चार्ज करण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे.
मारुती सुझुकी फ्रॉन्क्समध्ये स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी देखील आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या वाहनापासून दूर असतानाही त्याच्या अपडेट्सची माहिती ठेवू शकता. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीमध्ये कनेक्ट करता येते. तुम्ही रिमोट ऑपरेशन्सद्वारे तुमच्या कारशी कनेक्टेड राहू शकता. या कारमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग आणि सुरक्षिततेशी संबंधित अनेक फीचर्स देखील समाविष्ट आहेत. आता याच्या Delta+ (O) व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग्जची सुविधा देण्यात आली आहे.