फोटो सौजन्य: www.mahindraelectricsuv.com
इलेक्ट्रिक कार्सना दिवसेंदिवस चांगली मागणी मिळत आहे. ग्राहक देखील वाढत्या इंधन आणि सीएनजीच्या किमतींना कंटाळून आता EV च्या खरेदीकडे वळताना दिसत आहे०. ग्राहकांमध्ये असणारी हीच वाढती मागणी पाहता आता अनेक ऑटो कंपन्या आता मार्केटमध्ये उत्तम फीचर्स असणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करत आहे.
काही काळापूर्वी महिंद्राने EV सेगमेंटमध्ये आपल्या 2 दमदार इलेक्ट्रिक कार्स लाँच केल्या होत्या. या दोन्ही कार्सना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कार उत्पादक कंपनी महिंद्राने इलेक्ट्रिक वाहनांच्या जगात मोठी चमक दाखवली आहे. कंपनीने फक्त 3 आठवड्यात 3000 युनिट्सची डिलिव्हरी करून एक उत्तम रेकॉर्ड बनवला आहे. ही डिलिव्हरी 20 मार्च 2025 पासून नव्याने लाँच झालेल्या इलेक्ट्रिक एसयूव्ही XEV 9e आणि BE 6 ची आहे. या दोन्ही कार्सची मागणी इतकी जास्त आहे की एखाद्या व्यक्तीला यापैकी एक कार खरेदी करायची असेल तर त्याला 6 महिन्यांपर्यंत वाट पहावी लागू शकते. चला या कार्सबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया.
जर Honda CB300R मध्ये दिसली ‘ही’ समस्या तर तात्काळ कंपनीला करा संपर्क, फुकटात होईल दुरुस्ती
महिंद्राच्या या दोन ईव्हींबद्दल लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. बुकिंग डेटानुसार, सुमारे 59% ग्राहक XEV 9e आणि 41% ग्राहक BE 6 निवडत आहेत. यापैकी बहुतेक लोक या कारचे टॉप व्हेरियंट (पॅक थ्री) खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत, ज्यामध्ये सर्वात अॅडव्हान्स फीचर्स आहेत.
जेवढी या दोन्ही कार्सची मागणी जास्त आहे तितकाच याचा वेटिंग पिरियड देखील जास्त आहे. काही शहरांमध्ये, ग्राहकांना या ईव्ही मिळविण्यासाठी 6 महिन्यांपर्यंत वाट पहावी लागू शकते. हे लक्षात घेऊन, महिंद्राने आपले प्रोडक्शन आणि डिलिव्हरी नेटवर्क आणखी जलद गतीने वाढवण्याची योजना आखली आहे.
महिंद्राच्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये ‘डिफॉल्ट ड्राइव्ह मोड’ सादर करून महिंद्राने एक अनोखे पाऊल उचलले आहे. हे मोड विशेषतः अशा लोकांसाठी डिझाइन केले आहे जे पहिल्यांदाच ईव्ही चालवत आहेत. हा मोड पेट्रोल किंवा डिझेल इंजिन असलेल्या कारसारखाच ड्रायव्हिंग अनुभव देतो, त्यामुळे ड्रायव्हरला ईव्ही चालवताना कोणतीही अडचण जाणवत नाही.
Kia चा फ्युचर प्लॅन वाचलात का? 2030 पर्यंत प्रत्येक 100 कारपैकी 43 इलेक्ट्रिक कार विकण्याचा मानस
महिंद्रा केवळ वाहने विकण्यापुरते मर्यादित नाही तर ग्राहकांना सर्वोत्तम ‘ओनरशिप एक्सपीरियन्स’ देण्यासाठी ते विशेष व्हिडिओ गाईड्स देखील देत आहेत. या व्हिडिओंमध्ये, तुम्हाला बॅटरी चार्जिंगच्या स्मार्ट पद्धती आणि ड्रायव्हिंग टिप्स याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. या गाईड लाइन्समुळे ग्राहकांना पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या वाहनाची पूर्ण क्षमता समजून घेता येईल आणि त्याचा वापर करता येईल.