Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्ही पण केलाय का कधी ‘वडाप’ मधून प्रवास! कॅब आणि मेट्रोच्या जमान्यात हा आहे ग्रामीण महाराष्ट्राचा स्वस्ताचा प्रवास पर्याय!

ग्रामीण महाराष्ट्रात दुर्गम रस्ते आणि एसटी बसच्या कमतरतेवर मात करत 'वडाप' शेअरिंग खाजगी वाहतूक ही कष्टकरी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी एक स्वस्त, सुलभ व वेळेची बचत करणारी महत्त्वाची जीवनवाहिनी बनली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 25, 2026 | 02:21 PM
तुम्ही पण केलाय का कधी ‘वडाप’ मधून प्रवास! कॅब आणि मेट्रोच्या जमान्यात हा आहे ग्रामीण महाराष्ट्राचा स्वस्ताचा प्रवास पर्याय!
Follow Us
Follow Us:

शहरांमध्ये जिथे ‘कॅब’ आणि ‘मेट्रो’ची चर्चा असते, तिथे ग्रामीण महाराष्ट्राच्या दळणवळणाचा कणा म्हणजे ‘वडाप’. वडाप म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे साधन नाही, तर ती ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी आणि मध्यमवर्गीय लोकांच्या जीवनाशी जोडलेली एक भावना आहे. जिथे एसटी बस वेळेवर पोहोचत नाही किंवा जिथे दुर्गम रस्ते आहेत, तिथे हा ‘वडाप’ धावून येतो. ही संस्कृती ग्रामीण जनतेच्या मनामनात पक्की रुजलेली आहे.

वडाप म्हणजे काय?

ग्रामीण भाषेत खाजगी वाहनांमधून शेअरिंग तत्त्वावर केल्या जाणाऱ्या स्वस्त आणि सुलभ वाहतुकीला ‘वडाप’ किंवा ‘वडापची गाडी’ म्हटले जाते.

‘घंटागाडी’ची सुरुवात महाराष्ट्रातील ‘या’ शहरातूनच झाली! ही आहे घंटागाडीची इंटरेस्टिंग गोष्ट!

सर्वसामान्यांसाठी किफायतशीर आणि हक्काचा प्रवास

लक्झरी गाड्यांच्या चकचकाटापासून दूर, वडाप हा सामान्य माणसासाठी खऱ्या अर्थाने परवडणारा पर्याय आहे. अगदी १० ते २० रुपयांमध्ये एका गावातून दुसऱ्या गावात जाता येत असल्याने हा मध्यमवर्गीयांसाठी आर्थिक दिलासाचं ठरतो. एसटी बसची तासनतास वाट पाहण्यापेक्षा, चौकात उभी असलेली वडापची गाडी प्रवाशांनी भरली की लगेच निघते. यामुळे वेळेची बचतही होते. वडापच्या गाडीत शेतातील भाजीपाल्यांचे गाठोडे, दुधाचे कॅन आणि कॉलेजचे विद्यार्थी एकाच वेळी अगदी गुण्यागोविंदाने प्रवास करतात. चालक आणि प्रवाशांमध्ये असणारे ओळखीचे आणि घरगुती आपुलकीचे  नाते या संस्कृतीला अधिक समृद्ध करते.

वडापसाठी वापरली जाणारी प्रमुख वाहने

ग्रामीण भागातील खडतर आणि कच्च्या रस्त्यांवरून वाट काढण्यासाठी वडापमध्ये मजबूत आणि जास्त प्रवासी क्षमता असणाऱ्या वाहनांचा प्रामुख्याने वापर केला जातो.

कमांडर जीप: वडाप संस्कृतीची खरी सुरुवात या जीपने झाली. ग्रामीण भागात हिला मानाचे स्थान आहे. गाडीची क्षमता १० जणांची असली तरी मागे-पुढे मिळून अगदी १५ ते २० लोक या जीपमधून आरामात प्रवास करतात.

उसाच्या ट्रॅक्टरची ‘हायड्रॉलिक ट्रॉली’ सिस्टीम नेमकी कशी काम करते? सविस्तरपणे समजून घ्या

क्रूझर: सध्याच्या काळात सर्वाधिक लोकप्रिय असलेले हे वडापचे वाहन आहे. मोठी बॉडी आणि मजबूत इंजिनमुळे अनेक गावांना जोडणारी ही मुख्य गाडी ठरते.

छोटा हत्ती: काही भागांमध्ये प्रवाशांसोबतच त्यांचे सामान किंवा शेतीमाल नेण्यासाठी या लहान गाड्यांचा वापर वडाप म्हणून केला जातो.

टमटम: तालुक्याच्या ठिकाणाहून जवळच्या गावांमध्ये ५ ते ७ किलोमीटरच्या प्रवासासाठी ‘टमटम’ किंवा मोठ्या रिक्षा वडाप म्हणून सर्रास धावताना दिसतात.

थोडक्यात सांगायचे तर, ग्रामीण महाराष्ट्रात ‘वडाप’ ही चैनीची गोष्ट नसून ती तिथली जीवनवाहिनी आहे. बाजाराचा दिवस असो, दवाखान्याची ऐनवेळ असो की मुलांची शाळा, वडापची गाडी नेहमीच ग्रामीण जनतेची हक्काची सोबती राहिली आहे.

Web Title: Wadap affordable travel culture in rural maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

BYDची लक्झरी कार भारतात येणार! Denza D9 आणि Z9 GTची एंट्री, किंमत पाहून बसेल धक्का!
1

BYDची लक्झरी कार भारतात येणार! Denza D9 आणि Z9 GTची एंट्री, किंमत पाहून बसेल धक्का!

Hero MotoCorp ची सप्टेंबरमध्ये दमदार कामगिरी; 7.66 लाख टू-व्हीलर्सची विक्री
2

Hero MotoCorp ची सप्टेंबरमध्ये दमदार कामगिरी; 7.66 लाख टू-व्हीलर्सची विक्री

महिंद्राच्या या 3 इलेक्ट्रिक SUVची 1 लाखांहून जास्त विक्री; EV मार्केटमध्ये मोठा टप्पा!
3

महिंद्राच्या या 3 इलेक्ट्रिक SUVची 1 लाखांहून जास्त विक्री; EV मार्केटमध्ये मोठा टप्पा!

सप्टेंबरमध्ये कियाच्या गाड्यांची रेकॉर्डब्रेक विक्री! 32,017 युनिट्स विकून केला राडा
4

सप्टेंबरमध्ये कियाच्या गाड्यांची रेकॉर्डब्रेक विक्री! 32,017 युनिट्स विकून केला राडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.