फोटो सौजन्य: @HyundaiIndia/ X.com
भारतीय ऑटो बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. यात काही विदेशी कंपन्यांचा देखील समावेश आहे. ह्युंदाई ही त्यातीलच एक कंपनी. या साऊथ कोरियाच्या कार उत्पादक कंपनीने भारतीय मार्केटमध्ये दमदार कार्स उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्राहकांनी देखील कंपनीच्या वाहनांना भरघोस प्रतिसाद दिला आहे.
कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये कंपनीने Hyundai Aura ऑफर करते. जर तुम्ही या सेडान कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागेल, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
Maruti Suzuki Fronx Automatic खरेदी करण्याचा प्लॅन? अशाप्रकारे करा प्लॅनिंग
ह्युंदाईच्या ऑरा सेडानचे बेस व्हेरिएंट E विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.54 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. जर ही कार राजधानी दिल्लीमध्ये खरेदी केली, तर 6.54 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीसोबत रजिस्ट्रेशन आणि इन्शुरन्सचा खर्चही जोडला जाईल. रजिस्ट्रेशन टॅक्ससाठी सुमारे 52 हजार रुपये आणि इन्शुरन्ससाठी सुमारे 33 हजार रुपये मोजावे लागतात. अशा प्रकारे या कारची दिल्लीतील एकूण ऑन-रोड किंमत 7.40 लाख रुपये इतकी होते.
जर तुम्ही Hyundai Aura चा बेस व्हेरिएंट खरेदी केला तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवरच तुम्हाला फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 5.40 लाख रुपयांची रक्कम मिळवावी लागेल. जर बँक तुम्हाला 9 टक्के व्याजासह 7 वर्षांसाठी 5.40 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा फक्त 8693 रुपयांचा EMI भरावा लागेल.
नवीन अवतारात दिसेल Mahindra XUV 700, लाँच होण्याआधीच इंटिरिअरची मिळाली माहिती
जर तुम्ही बँकेकडून 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 5.40 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला 7 वर्षांसाठी दरमहा 8693 रुपयांचा EMI भरावा लागेल. अशा परिस्थितीत, 7 वर्षांत तुम्हाला Hyundai Aura च्या बेस व्हेरिएंटसाठी सुमारे 1.90 लाख रुपयांचा व्याज द्यावा लागेल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 9.30 लाख रुपये असेल.
कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये ह्युंदाईने ऑरा आणली आहे. या सेगमेंटमध्ये ती Maruti Dzire, Honda Amaze आणि Tata Tigor सारख्या कारशी थेट स्पर्धा करते.