Maruti Suzuki Fronx Automatic खरेदी करण्याचा प्लॅन? (फोटो सौजन्य: @MotorArenaIndia/X.com)
मारुती सुझुकी ही देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे, जिने विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. कंपनीच्या कार या उत्तम परफॉर्मन्स आणि बजेट फ्रेंडली किमतीसाठी ओळखल्या जातात. तसेच कंपनी बदलत्या काळानुसार त्यांच्या वाहनांमध्ये काही महत्वाचे अपडेट्स आणत असते. ग्राहक सुद्धा कार खरेदी करताना पहिले प्राधान्य मारुती सुझुकीच्या कार्सना देत असतात.
भारतात कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये सुद्धा चांगली मागणी मिळत आहे. हीच मागणी लक्षात घेत कंपनीने Maruti Suzuki Fronx लाँच केली आहे. ही कार तिच्या डिझाइन, मायलेज आणि फीचर्समुळे खूप लोकप्रिय होत आहे. विशेष म्हणजे कंपनी त्यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देखील उपलब्ध करून देते, ज्यामुळे ती शहरात आणि महामार्गावर आरामदायी ड्रायव्हिंग अनुभव देते. जर तुम्ही ही खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि आधीच 2 लाखांचे डाउन पेमेंट केले असेल, तर याचा EMI किती असेल, त्याबद्दल जाणून घेऊयात.
खरंच 10 वर्ष जुनी कारमध्ये E20 फ्युएल भरू शकतो का? प्रत्येक कार चालकाने जाणून घ्या
Maruti Fronx च्या ऑटोमॅटिक बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 9.30 लाख रुपये आहे. राजधानी दिल्लीमध्ये ही कार खरेदी केल्यास तिची ऑन-रोड किंमत अंदाजे 10.40 लाख रुपये पडते. या किमतीमध्ये एक्स-शोरूम प्राइसशिवाय सुमारे 66,000 रुपये RTO शुल्क आणि अंदाजे 39,000 रुपये इन्शुरन्सचा खर्च समाविष्ट आहे.
जर तुम्ही Fronx Automatic खरेदी करताना 2 लाख रुपये डाउन पेमेंट दिले, तर तुम्हाला बँकेतून सुमारे 8.40 लाख रुपयांचे कार लोन घ्यावे लागेल. बँक जर 9% व्याजदराने 7 वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज मंजूर करते, तर तुमची महिन्याचा EMI 13,524 रुपये होईल. म्हणजेच पुढील सात वर्षे दर महिन्याला तुम्हाला हीच रक्कम भरावी लागेल. अशा प्रकारे फक्त व्याजाच्या स्वरूपात तुम्हाला सुमारे 2.95 लाख रुपये जास्त भरावे लागतील.
जर तुम्ही सात वर्षे दर महिन्याला 13,524 रुपये EMI भरलात, तर या कारची एकूण किंमत 13.36 लाख रुपये इतकी होईल. यात एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि लोनचे व्याज समाविष्ट असेल. म्हणजेच, फक्त 2 लाख रुपये डाउन पेमेंट करून तुम्ही ही स्टायलिश व फीचर-लोडेड SUV आपल्या घरी आणू शकता.
Mahindra XUV 3XO RevX A ला मिळाला ‘हा’ नवीन फिचर, आता प्रवास होणार अधिकच मजेदार
Maruti Suzuki Fronx ही कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील कार आहे. हिचा थेट स्पर्धा Maruti Brezza, Hyundai Venue, Kia Sonet, Mahindra XUV 3XO आणि Kia Syros सारख्या लोकप्रिय SUVs सोबत होतो.