फोटो सौजन्य: @autocarindiamag (X.com)
आपली स्वतःची कार असावी असे प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न उराशी बाळगून अनेक जण दिवसरात्र कष्ट करतात. मात्र, अनेकांना कार खरेदी करताना पूर्ण रक्कम भरणे शक्य नसते. अशावेळी, कित्येक जण कार लोनच्या साहाय्याने कार खरेदी करतात.
भारतात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत. त्यातीलच एक आघाडीची कंपनी म्हणजे मारुती सुझुकी. मारुतीने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. Maruti Grand Vitara ही त्यातीलच एक उत्तम कार.
नुकतेच मारुती सुझुकीने मारुती ग्रँड विटाराचा एक नवीन सीएनजी व्हेरिएंट लाँच केला आहे. या एसयूव्हीचा बेस सीएनजी व्हेरिएंट म्हणून Delta CNG उपलब्ध आहे. जर तुम्ही Maruti Grand Vitara चा सीएनजी बेस व्हेरिएंट म्हणून Delta घरी आणण्याचा विचार करत असाल, तर 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, ही कार घरी आणण्यासाठी तुम्ही दरमहा किती EMI देऊ शकता?
भारतात नवीन Honda City Sport लाँच, स्पोर्टी लूकसह मिळणार दमदार परफॉर्मन्स
मारुती Grand Vitara चा CNG बेस व्हेरिएंट म्हणून Delta देत आहे. कंपनी या मिड साईझ एसयूव्हीचा सीएनजी बेस व्हेरिएंट 13.48 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहे. जर ही कार राजधानी दिल्लीमध्ये खरेदी केली तर 13.48 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीसह त्यावर रजिस्ट्रेशन आणि इंश्युरन्स देखील भरावा लागेल.
ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला सुमारे 1.35 लाख रुपयांचा रजिस्ट्रेशन टॅक्स आणि सुमारे 62 हजार रुपयांचा इंश्युरन्स भरावा लागेल. यासोबतच, 13500 रुपयांचा TCS चार्ज देखील भरावा लागेल. यानंतर, राजधानी दिल्लीमध्ये कारची ऑन-रोड किंमत 15.62 लाख रुपये होईल.
जर तुम्ही मारुती ग्रँड विटाराचा बेस व्हेरिएंट Delta CNG खरेदी केला तर बँक तुम्हाला फक्त एक्स-शोरूम किमतीवर फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 13.62 लाख रुपयांची रक्कम फायनान्स करावी लागेल. जर बँक तुम्हाला 7 वर्षांसाठी नऊ टक्के व्याजासह 13.62 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा फक्त 21924 रुपये EMI भरावा लागेल.
Uber, Rapido आणि Ola टेन्शनमध्ये ! बंगळुरूनंतर महाराष्ट्रात सुद्धा Bike Taxi बॅन होणार?
जर तुम्ही बँकेकडून 7 वर्षांसाठी 9% व्याजदराने 13.62 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 21924 रुपये ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, 7 वर्षांत तुम्हाला Maruti Grand Vitara CNG बेस व्हेरिएंट डेल्टासाठी सुमारे 4.78 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 20.41 लाख रुपये असेल.