फोटो सौजन्य: @HondaCarIndia (X.com)
भारतीय मार्केटमध्ये कार्सच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. हीच वाढती मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या बेस्ट परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत असतात.यातीलच एक आघाडीची कार उत्पादक कंपनी म्हणजे होंडा.
होंडाने विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने मार्केटमध्ये आपल्या लोकप्रिय कारचा नवीन व्हेरिएंट लाँच केला आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
होंडा कार्स इंडिया लिमिटेड (HCIL) ने त्यांची लोकप्रिय मिड साईझ आकाराच्या सेडान होंडा सिटी, Honda City Sport चा एक नवीन व्हेरिएंट भारतीय बाजारात लाँच केला आहे. नवीन सिटी स्पोर्ट बोल्ड लूक, स्पोर्टी डिझाइन आणि प्रीमियम इंटिरिअरसह लाँच करण्यात आला आहे. नवीन होंडा सिटी स्पोर्टची खास फीचर्स, डिझाइन आणि किंमत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Uber, Rapido आणि Ola टेन्शनमध्ये ! बंगळुरूनंतर महाराष्ट्रात सुद्धा Bike Taxi बॅन होणार?
नवीन होंडा सिटी स्पोर्टची एक्स-शोरूम किंमत 14,88,900 रुपये ठेवण्यात आली आहे. या कारच्या मर्यादित युनिट्स लाँच करण्यात आल्या आहेत.
होंडा सिटी स्पोर्ट अतिशय स्पोर्टी लूकसह लाँच करण्यात आली आहे. ही कार लिमिटेड व्हर्जनमध्ये लाँच करण्यात आली आहे, ज्यामुळे ती आणखी खास बनते. ही कार फक्त CVT (ऑटोमॅटिक ट्रान्समिशन) सह लाँच करण्यात येणार आहे. तसेच ती रेडियंट रेड मेटॅलिक, प्लॅटिनम व्हाइट पर्ल आणि मेटेरॉइड ग्रे मेटॅलिक या तीन रंगांच्या ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आली आहे.
या कारच्या एक्सटिरिअर लूकबद्दल बोलायचे झाले तर, त्यात स्पोर्टी ब्लॅक ग्रिल, ब्लॅक ट्रंक लिप स्पॉयलर, ग्लॉसी ब्लॅक शार्क फिन अँटेना, मल्टी-स्पोक ग्रे अलॉय व्हील्स आणि कॉन्ट्रास्टिंग लूकसाठी ब्लॅक ओआरव्हीएम आहेत.
होंडा सिटी स्पोर्टच्या एक्सटिरिअरसोबतच, त्याचे इंटिरिअरबद्दल देखील खूप प्रभावी आहे. आत एक इमर्सिव्ह ब्लॅक केबिन आहे. त्यात प्रीमियम लेदर ब्लॅक सीट्स, लाल स्टिच पॅटर्न, ब्लॅक रूफ लाइनिंग आणि पिलर्स, गडद लाल डॅश गार्निश, 7-रंगी लयबद्ध अॅम्बियंट लाइट अशी फीचर्स आहेत.
होंडा सिटी स्पोर्टमध्ये 1.5 लिटर आय-व्हीटीईसी पेट्रोल इंजिन वापरले आहे, जे E20 इंधनासह देखील काम करते. त्याचे इंजिन 121 पीएस पॉवर आणि 145 एनएम टॉर्क जनरेट करते. यासोबतच, ही कार सीव्हीटी आणि पॅडल शिफ्टसह जोडले गेले आहे, जे सुरळीत आणि उत्तम ड्रायव्हिंग देते.
कंपनीने दावा केला आहे की ते एका लिटर पेट्रोलमध्ये 18.4 किमी पर्यंत मायलेज देईल. त्यातील बहुतेक फीचर्स नियमित होंडा सिटी सारखेच असतील. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कंपनीने होंडा सेन्सिंग (ADAS) सारखे स्मार्ट फीचर्स प्रदान केली आहेत.