फोटो सौजन्य: X
भारतात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत आहे. यातीलच एक महत्वाची आणि लोकप्रिय कंपनी म्हणजे स्कोडा. भारतीय मार्केटमध्ये स्कोडाच्या अनेक कार लोकप्रिय आहेत. नुकतेच कंपनीने आपली Skoda Kylaq ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतीय मार्केटमध्ये लाँच केली होती.
जर तुम्ही सुद्धा Skoda Kylaq खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या एसयूव्हीचा सर्वात स्वस्त व्हेरियंट, ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह Signature AT खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर २ लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला दरमहा किती ईएमआय भरावा लागेल याबद्दल जाणून घेऊया. पण त्याआधी या कारची किंमत किती आहे त्याबद्दल जाणून घेणे महत्वाचे.
फेब्रुवारी 2025 मध्ये Hyundai च्या ‘या’ कार खरेदी केल्यास होणार जबरदस्त बचत
Skoda Kylaq चा सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक व्हेरियंट म्हणून सिग्नेचर एटी ऑफर करते. या एसयूव्हीचा सिग्नेचर एटी व्हेरियंट 10.59 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. या कारची डिलिव्हरी सुरू झाल्यानंतर, जर ती राजधानी दिल्लीत खरेदी केली तर 10.59 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीसह, त्यावर रजिस्ट्रेशन टॅक्स आणि आरटीओ शुल्क देखील भरावे लागेल. तसेच ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला आरटीओसाठी 1.06 लाख रुपये आणि विम्यासाठी 45016 रुपये द्यावे लागतील. टीसीएस चार्ज म्हणून 10590 रुपये द्यावे लागतील. यानंतर, दिल्लीमध्ये या कारची ऑन-रोड किंमत 12,20,506 रुपये होईल.
जर तुम्ही स्कोडा Kylaq चा सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक व्हेरियंट, सिग्नेचर एटी खरेदी केले तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवरच फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 10,20,506 रुपयांची रक्कम फायनान्स करावी लागेल. जर बँक तुम्हाला 9% व्याजदराने सात वर्षांसाठी 10,20,506 रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा फक्त 16264 रुपये ईएमआय भरावा लागेल.
‘या’ मेड इन इंडिया कारची जपानी लोकांना भुरळ, रेकॉर्डब्रेक मागणीनंतर बुकिंग थांबवली
जर तुम्ही बँकेकडून नऊ टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 10,20,506 रुपयांचे कार कर्ज घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 16264 रुपये ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, सात वर्षांत तुम्हाला स्कोडा काइलेकच्या सिग्नेचर एटी व्हेरियंटसाठी सुमारे 3.45 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 15.66 लाख रुपये होईल.
ही नवीन कार स्कोडा कंपनीने कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये लाँच केली आहे. या सेगमेंटमध्ये, ह्युंदाई व्हेन्यू, किआ सोनेट व सायरोस, टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा, महिंद्रा XUV 3XO, निसान मॅग्नाइट, रेनॉल्ट किगर सारख्या कॉम्पॅक्ट एसयूव्हींशी थेट स्पर्धा करते.