फोटो सौजन्य: @volklub (X.com)
भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार्सची डिमांड ही वाढतच चालली आहे. ग्राहक देखील मोठ्या प्रमाणात या EVs ला चांगला प्रतिसाद देत आहे. म्हणूनच तर आता अनेक ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक कार्सच्या निर्मितीवर लक्षकेंद्रित करत आहे. यातीलच एक आघाडीची कार उत्पादक कंपनी म्हणजे टाटा मोटर्स.
टाटा मोटर्सने देशात बेस्ट कार्स ऑफर केल्या आहेत. भारतात कंपनीने इलेक्ट्रिक कार्स देखील लाँच केल्या आहेत. यातीलच एक उत्तम कार म्हणजे Tata Tiago EV. ही कार कंपनीकडून सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार म्हणून ऑफर केली जाते. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर किती EMI भरून तुम्ही ही घरी आणू शकता, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी या कारची किंमत जाणून घेणार आहोत.
‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारवर तुटून पडलेत ग्राहक ! 53 टक्के मार्केटवर एकट्याने गाजवतेय वर्चस्व
टियागो ईव्हीचा बेस व्हेरियंट टाटा मोटर्सने 7.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत सादर केला आहे. जर तुम्ही ही कार राजधानी दिल्लीमध्ये खरेदी केली तर त्याची ऑन-रोड किंमत सुमारे 8.43 लाख रुपये होते. या किमतीत, 7.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीव्यतिरिक्त, आरटीओसाठी सुमारे 5500 रुपये आणि इंश्युरन्ससाठी सुमारे 39 हजार रुपये द्यावे लागतील.
जर तुम्ही या कारचा बेस ईव्ही व्हेरियंट खरेदी केला तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवर फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 7.43 लाख रुपयांचे फायनान्स करावे लागेल. जर बँक तुम्हाला सात वर्षांसाठी 9% व्याजदराने 7.43 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा फक्त 11,964 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
‘हे’ स्कूटर म्हणजे पैश्यांची दमदार बचत ! किंमत 1 लाख रुपयांपेक्षाही कमी
जर तुम्ही बँकेकडून 9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 7.43 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 11964 रुपयांचा EMI भरावा लागेल. अशा परिस्थितीत, सात वर्षांत तुम्हाला Tiago EV साठी सुमारे 2.61 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला कारची एकूण किंमत एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह द्यावी लागेल, जी सुमारे 11 लाख रुपये असेल.