फोटो सौजन्य: istock
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार्सला दमदार मागणी मिळत आहे. हीच वाढती मागणी पाहून आता अनेक ऑटो कंपन्या ज्या पूर्वी इंधनावर चालणाऱ्या कार उत्पादित करीत होत्या, त्याच आज इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर लक्षकेंद्रित करीत आहे. ग्राहक देखील मोठ्या प्रमाणात या अत्याधुनिक इलेक्ट्रिक कार्सला चांगला पाठिंबा देत आहे. अशातच आता एका इलेक्ट्रिक कारने ग्राहकांना भुरळच घातली आहे.
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कारची मागणी सातत्याने वाढत आहे. जर आपण गेल्या आर्थिक वर्ष 2025 बद्दल बोललो तर पुन्हा एकदा टाटा मोटर्सने या सेगमेंटमधील विक्रीत अव्वल स्थान मिळवले आहे. या काळात टाटा मोटर्सना एकूण 57,616 नवीन ग्राहक मिळाले. या काळात टाटा मोटर्सचा मार्केट शेअर 53.52 टक्के होता. चला या काळात इतर कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कारच्या विक्रीबद्दल सविस्तर माहित जाणून घेऊया.
विक्री यादीत एमजी मोटर दुसऱ्या स्थानावर राहिली आहे. तर एमजी मोटरने या कालावधीत एकूण 30,162 युनिट्स इलेक्ट्रिक कार विकल्या आणि त्यांचा शेअर मार्केट 28.02 टक्के होता. तर महिंद्रा या विक्रीच्या यादीत तिसऱ्या स्थानावर होती. या कालावधीत महिंद्राने एकूण 8,182 कार विकल्या. तसेच कंपनीचा मार्केट शेअर 7.60 टक्के राहिला. याशिवाय, या विक्रीच्या यादीत BYD इंडिया चौथ्या स्थानावर राहिली आहे. या कालावधीत BYD ने एकूण 3,401 कार विकल्या ज्याचा मार्केट शेअर 3.16 टक्के होता.
ग्राहकांनो थोडंतरी ‘या’ कारकडे पाहा ! मागील 12 महिन्यात फक्त 9 खरेदीदार, विक्री 84 टक्क्यांनी घटली
दुसरीकडे, या विक्री यादीत Hyundai इंडिया पाचव्या क्रमांकावर होती. या कालावधीत ह्युंदाई इंडियाने एकूण 2,410 कार विकल्या आणि त्यांचा मार्केट शेअर 2.24 टक्के राहिला. तर पीसीए ऑटोमोबाईल या विक्री यादीत सहाव्या स्थानावर होते. PCA Automobile ने या कालावधीत 1.82 टक्के मार्केट असलेल्या एकूण 1,962 कार विकल्या आहेत. तर बीएमडब्ल्यू इंडिया या विक्री यादीत सातव्या स्थानावर होती. या काळात बीएमडब्ल्यूने एकूण 1,550 कार विकल्या आणि त्यांचा मार्केट शेअर 1.44 टक्के होता.
याशिवाय, Volvo India या विक्री यादीत दहाव्या स्थानावर राहिली आहे. या कालावधीत व्होल्वो इंडियाने एकूण 394 इलेक्ट्रिक कार विकल्या आणि त्यांचा मार्केट शेअर 0.37 टक्के इतका होता.