फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात टू व्हीलर सेगमेंट अनेक उत्तम बाईक आणि स्कूटर विकल्या जातात. त्यातही भारतीय ग्राहक नेहमीच दुचाकी खरेदी करताना स्वस्तात मस्त अशा बाईक किंवा स्कूटर खरेदी करताना दिसतात. त्यामुळेच तर दुचाकी उत्पादक कंपन्या देखील बजेट फ्रेंडली बाईक आणि स्कूटर ऑफर करतात.
देशातील ऑटोमोबाईल मार्केटमध्ये आता स्कूटरची विक्री सुद्धा झपाट्याने वाढताना दिसत आहे. स्कूटर हे बाईक सारखेच किफायतशीर आणि चालवायला सोपे असतात. भारतीय बाजारात अशा अनेक स्कूटर आहेत, ज्यांचा परफॉर्मन्स उत्तम तर आहेच. पण या चांगले मायलेज देखील देतात.
आता ड्रायव्हिंग होईल गारेगार ! ‘या’ 5 सर्वात स्वस्त कारच्या सीट्समधून निघते थंडगार हवा
जर तुम्ही 1 लाख रुपयांच्या बजेटमध्ये चांगली स्कूटर शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. भारतीय बाजारपेठेत या श्रेणीतील अनेक उत्कृष्ट स्कूटर उपलब्ध आहेत जे फीचर्स, मायलेज आणि विश्वासार्हतेच्या बाबतीत उत्कृष्ट आहेत.
तुमच्यासाठी पहिला पर्याय म्हणजे होंडा अॅक्टिव्हा 6जी, ज्याची ऑन-रोड किंमत 92,181 ते 98,731 रुपयांच्या दरम्यान आहे. यात 109.51 सीसी इंजिन आहे, जे प्रति लिटर 59.5 किलोमीटर मायलेज देते. त्याचा टॉप स्पीड 85 किमी प्रतितास आहे. होंडा अॅक्टिव्हा ही भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर मानली जाते.
दुसरा पर्याय म्हणजे टीव्हीएस ज्युपिटर, ज्याची ऑन-रोड किंमत 88,561 रुपयांपासून सुरू होते आणि 1.06 लाख रुपयांपर्यंत जाते. यात 113.3 सीसी इंजिन आहे आणि ते 48 किमी प्रति लिटर मायलेज देते. याचा टॉप स्पीड 82 किमी प्रतितास आहे, जे स्मूद राइड आणि उत्कृष्ट ग्राउंड क्लिअरन्ससाठी ओळखला जातो, ज्यामुळे ही स्कूटर दररोजच्या राइडिंगसाठी एक उत्तम पर्याय बनते.
सुझुकी अॅक्सेस 125 ची ऑन-रोड किंमत सुमारे 1 लाख रुपयांपासून सुरू होते. यात124 सीसी इंजिन आहे जे 8.42 पीएस पॉवर निर्माण करते आणि 45 किमी प्रति लिटर मायलेज देते. ही स्कूटर अशा ग्राहकांसाठी परिपूर्ण आहे, जे थोडी अधिक पॉवर, उत्तम डिझाइन आणि चांगला परफॉर्मन्स शोधत आहेत.
भारतात लवकरच लाँच होणार 2025 Hyundai Ioniq 5, मिळणार अनेक हाय-फाय फीचर्स
यामाहा फॅसिनो 125 एफआय हायब्रिडची ऑन-रोड किंमत 99,969 रुपयांपासून सुरू होते. यात 125 सीसी इंजिन आहे, जे 68.75 किमी प्रति लिटर मायलेज देते आणि त्याचा टॉप स्पीड 90 किमी प्रति तास आहे. ही स्कूटर विशेषतः तरुणांना लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली त्याची स्टायलिश डिझाइन आणि उत्कृष्ट मायलेज यामुळे ती एक स्मार्ट निवड बनते. या सर्व स्कूटर 1 लाख रुपयांच्या बजेटमध्ये येतात.