फोटो सौजन्य: iStock
जगभरात लक्झरी कार्सच्या मागणीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.अनेक सेलिब्रेटी आणि मोठमोठ्या उद्योजकांच्या कार कलेक्शनमध्ये हमखास आलिशान आणि हाय परफॉर्मन्स कार पाहायला मिळतात. यातही सर्वात जास्त डिमांड ही मर्सिडीज-बेंझ किंवा बीएमडब्ल्यू सारख्या कार्सला जास्त असते. लक्झरी कार उत्पादित करण्यात अनेक देश आघाडीवर आहेत. सध्या जर्मनी यात पहिल्या क्रमांकावर आहे.
जेव्हा जेव्हा आपण लक्झरी कारबद्दल बोलतो तेव्हा जर्मनी हे नाव सर्वात आधी येते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जगातील अनेक सर्वोत्तम आणि प्रीमियम कार कंपन्या जर्मनीमधून येतात. Mercedes-Benz, BMW, Audi, Porsche आणि Maybach सारख्या सर्व प्रसिद्ध कंपन्या जर्मनीच्याच आहेत.
या ऑटो ब्रँड्सनी त्यांच्या उत्तम डिझाइन, पॉवरफुल परफॉर्मन्स आणि विश्वासार्ह तंत्रज्ञानाच्या आधारे जगभरात एक वेगळी ओळख मिळवली आहे. हेच कारण आहे की आज जर्मन ब्रँड्सना लक्झरी कारच्या जगात बादशाह मानले जाते.
खरंतर, जर्मन कार कंपन्यांचा इतिहास खूप जुना आहे. यात मर्सिडीजने जगातील पहिली कार बनवून आपल्या प्रवासाची सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत या कंपन्यांनी स्वतःमध्ये सतत सुधारणा केल्या आहेत. त्यांच्या कार केवळ दिसायला छान नसतात तर तांत्रिकदृष्ट्या देखील खूप प्रगत असतात. जर्मन कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्या खूप मजबूत, टिकाऊ आहेत आणि उत्तम परफॉर्मन्स देतात.
जर्मनीला लक्झरी कारचा राजा म्हणण्याचे आणखी एक मोठे कारण म्हणजे त्यांचे इंजिनिअरिंग. जर्मन इंजिनिअर त्यांच्या कारमध्ये अतिशय अचूक तंत्रज्ञान वापरतात. कारचे इंजिन असो, गिअर सिस्टम असो, सेफ्टी फीचर्स असो किंवा इंटिरिअर असो. सगळ्या बाबतीतच आपल्याला या कारमध्ये हाय क्वालिटी दिसून येते. बीएमडब्ल्यू त्याच्या स्पोर्टी ड्रायव्हिंगसाठी प्रसिद्ध आहे, मर्सिडीज त्याच्या उत्तम कम्फर्ट आणि लक्झरीसाठी प्रसिद्ध आहे. दुसरीकडे, ऑडी त्याच्या डिझाइन आणि क्वाट्रो तंत्रज्ञानासाठी ओळखली जाते.
या कार्सची ओळख फक्त जर्मनीपुरती मर्यादित नाही. भारत, अमेरिका, दुबई, युरोप – सर्वत्र लोक या कार्स केवळ प्रवासासाठीच नव्हे तर एका खास अनुभवासाठी खरेदी केल्या जातात. याशिवाय, जर्मन कंपन्या नेहमीच नवीन तंत्रज्ञानात पुढे असतात. आज जेव्हा संपूर्ण जग इलेक्ट्रिक वाहनांकडे वाटचाल करत आहे, तेव्हा मर्सिडीज EQS, BMW i7 आणि ऑडी ई-ट्रॉन सारख्या कार्स या सेगमेंटमध्ये आपला ठसा उमटवत आहे. या केवळ उत्तम रेंट देत नाहीत तर खूप प्रीमियम अनुभव देखील देतात.
जर आपण इतर देशांबद्दल बोललो तर, इटलीमध्ये Ferrari, Lamborghini आणि Maserati सारखे उत्तम ऑटो ब्रँड आहेत, परंतु या कार प्रामुख्याने स्पोर्ट्स आणि सुपरकार सेगमेंटमध्ये येतात, मास-सेगमेंट लक्झरीमध्ये नाहीत.
अमेरिकेत Cadillac आणि Lincoln सारखे ब्रँड आहेत, परंतु त्यांची जागतिक लोकप्रियता मर्यादित आहे. जपान आणि दक्षिण कोरियामधील Lexus, Acura आणि Genesis सारखे ब्रँड देखील वेगाने वाढत आहेत, परंतु त्यांना अजूनही जर्मन ब्रँड इतके लोकप्रिय आणि विश्वासार्ह मानले जात नाही.