Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बोअरवेल मशीन कशी काम करते? ऑटोमोबाईल आणि तंत्रज्ञानाचा हा अविष्कार कसा शोधतो खडकातील पाण्याचा मार्ग?

बोअरवेल यंत्रणा ही हायड्रॉलिक, कॉम्प्रेसर आणि DTH तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीच्या कठीण खडकातून सुरक्षितपणे पाणी उपसून काढणारा आधुनिक अभियांत्रिकीचा एक अद्भुत चमत्कार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 24, 2026 | 04:57 PM
बोअरवेल मशीन कशी काम करते? ऑटोमोबाईल आणि तंत्रज्ञानाचा हा अविष्कार कसा शोधतो खडकातील पाण्याचा मार्ग?
Follow Us
Follow Us:

बोअरवेल म्हणजेच ज्याला आपण मराठीत कुपनलिका म्हणतो. ही कुपनलिका खोदणारी गाडी ही ग्रामीण आणि शहरी भागात पाण्याचा मुख्य स्त्रोत तयार करणारी एक अद्भुत प्रणाली आहे. जमिनीच्या शेकडो फूट खाली जाऊन पाण्याचा मार्ग मोकळा करणे हे या मशीनचे मुख्य काम असते. पाहायला गेलं तर जमिनीच्या आत शंभर दोनशे तीनशे फुट आत खोदत जाणे, आणि पाण्याचा स्त्रोत सुरक्षितपणे वर वापरण्यासाठी काढून आणणे, हे एक तंत्रज्ञानाचे दिव्यच म्हणावे लागेल.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक चमत्कार

तांत्रिक दृष्ट्या विचार केला तर ही मशीन ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक उत्तम चमत्कार आहे. एका अवजड ट्रकमध्येच प्रचंड क्षमतेचे हायड्रॉलिक पंप, हाय-प्रेशर एअर कॉम्प्रेसर आणि रोटेशन गियर सिस्टीम एकत्र केलेली असते. ट्रकचे इंजिन केवळ गाडी चालवण्यासाठीच नाही, तर जागेवर स्थिर राहून कॉम्प्रेसर आणि ड्रिलिंग रॉड्सना अफाट शक्ती देण्यासाठी ‘पॉवर टेक-ऑफ’ सिस्टीमद्वारे वापरले जाते. एकाच वाहनात इतकी प्रचंड मेकॅनिकल आणि हायड्रॉलिक ऊर्जा सामावून घेणे हे अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

घराचा पाया ठरवताना मातीची चाचणी का महत्त्वाची? वेगवेगळ्या मातीनुसार फाउंडेशनची खोली आणि खोदकामाचे नियम; आत्ताच समजून घ्या

जमिनीचे स्तर आणि पाण्याचे थर (पाण्याचे पडदे असेही म्हणले जाते)

ड्रिलिंग सुरू झाल्यावर मशीनला जमिनीच्या वेगवेगळ्या स्तरांमधून जावे लागते:

  • वरचा थर (Overburden): यात मऊ माती, मुरूम आणि लहान खडक असतात.
  • कठीण खडक (Hard Rock): यात प्रामुख्याने काळा पाषाण किंवा बेसाल्ट खडक असतो, जिथे ‘हॅमर ड्रिलिंग’चा वापर होतो.
  • पाण्याचे थर (Water Aquifers): जसे मशीन खाली जाते, तसे खडकांच्या फटींमध्ये साठलेले पाणी लागते. ज्याला बऱ्याच भागात पाण्याचे पडदे लागणे असेही म्हटले जाते. पहिल्या थराला ‘वरचे पाणी’ म्हणतात, जे सहसा उन्हाळ्यात आटते. कायमसाठीच्या पाण्यासाठी मशीन आणखी खोलवर जाऊन मुख्य पाण्याचा स्त्रोत शोधावा लागतो.
कार्यपद्धती आणि तांत्रिक गोष्टी  

बोअरवेलचे काम प्रामुख्याने DTH Down-The-Hole तंत्रज्ञानावर चालते.

ड्रिलिंग Drilling: कॉम्प्रेसरच्या सहाय्याने अतिउच्च दाबाची हवा खाली सोडली जाते. यामुळे ड्रिलिंग रॉडच्या टोकाला असलेले ‘बटन बिट’ खडकावर वेगाने आपटून त्याला भुगा करते. हा खडकाचा भुगा हवेच्या दाबानेच जमिनीवर बाहेर फेकला जातो.

केसिंग पाईप Casing Pipes: जमिनीच्या वरच्या मऊ थरातील माती किंवा वाळू बोअरवेलमध्ये कोसळू नये म्हणून पीव्हीसी किंवा लोखंडी ‘केसिंग पाईप’ ठराविक खोलीपर्यंत खडक लागेपर्यंत टाकले जातात.

पाणाडी जमिनीच्या खाली पाणी कसे शोधतात? भोंदूपणा, परंपरा की विज्ञान? जाणून घ्या सत्य

सबमर्सिबल मोटरचे कार्य

बोअरवेल पूर्ण झाल्यावर त्यात पाणी उपसण्यासाठी ‘सबमर्सिबल मोटर’  सोडली जाते. ही मोटर पाण्याच्या आत पूर्णपणे बुडलेली असते. यात एक इलेक्ट्रिक मोटर आणि मल्टिस्टेज इम्पेलर असतात. जेव्हा मोटर सुरू होते, तेव्हा इम्पेलर वेगाने फिरून पाण्याचा दाब वाढवतात आणि पाईपद्वारे पाणी जमिनीवर खेचून आणतात.

येणाऱ्या अडचणी आणि आव्हाने

बोअरवेल मारणे हे जोखमीचे काम असते. कधीकधी ड्रिलिंग करताना रॉड किंवा बिट खडकात अडकून तुटतात, ज्याला ‘रॉड जॅम’ म्हणतात. मऊ किंवा वाळूच्या जमिनीत बोअर कोसळण्याचा धोका असतो. तसेच, अनेकदा खूप खोल जाऊनही पाणी न लागल्याने ‘ड्राय बोअर’ होण्याचीही शक्यता असते.

थोडक्यात, बोअरवेल मशीन म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा असा नमुना आहे जो निसर्गाच्या आव्हानांवर मात करून मानवाला जीवनदायी मुबलक पाणी अगदी सोयीने मिळवून देतो.

Web Title: Working of borewell machine auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

Suzuki Hayabusa Special Edition लाँच; किंमत ₹19.90 लाख, नव्या टेक्नोलॉजीसह झाली आणखी खास
1

Suzuki Hayabusa Special Edition लाँच; किंमत ₹19.90 लाख, नव्या टेक्नोलॉजीसह झाली आणखी खास

Honda QC3 की Ather Konarc? ₹1.45 लाखांच्या आत कोण देतं जास्त रेंज आणि भन्नाट फीचर्स? कोण आहे वरचढ
2

Honda QC3 की Ather Konarc? ₹1.45 लाखांच्या आत कोण देतं जास्त रेंज आणि भन्नाट फीचर्स? कोण आहे वरचढ

Simple OneS इलेक्ट्रिक स्कूटर भारतात बंद! 190 किमी रेंजसह आलेली स्कूटर आता मार्केटमधून गायब; जाणून घ्या काय आहे कारण
3

Simple OneS इलेक्ट्रिक स्कूटर भारतात बंद! 190 किमी रेंजसह आलेली स्कूटर आता मार्केटमधून गायब; जाणून घ्या काय आहे कारण

टीव्हीएससोबत बिझनेस करण्याची संधी! Paddock पार्टनरशिपसाठी कंपनीकडून उद्योजकांना आमंत्रण
4

टीव्हीएससोबत बिझनेस करण्याची संधी! Paddock पार्टनरशिपसाठी कंपनीकडून उद्योजकांना आमंत्रण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.