Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Most Expensive Car: आयुष्याची सगळी जमापुंजी दिलीत तरी सुद्धा ‘ही’ कार खरेदी करता येणार नाही!

आज आपण जगातील सर्वात महागड्या कारबद्दल जाणून घेणार आहोत, जी खरेदी करण्यासाठी तुम्ही आयुष्यभराची कमाई खर्च केली तरीही ती तुमच्या आवाक्याबाहेरच राहील.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 21, 2025 | 06:17 PM
फोटो सौजन्य: @duPontREGISTRY/X.com

फोटो सौजन्य: @duPontREGISTRY/X.com

Follow Us
Follow Us:

भारतासह संपूर्ण जगभरात एकापेक्षा एक नवी कार्स ऑटो बाजारात येत असतात. मात्र काही कार्स अशा असतात ज्या केवळ चार चाकी वाहन म्हणून नाही, तर एखाद्या स्वप्नासारख्या वाटतात म्हणजेच मनात घर करून बसतात. देशात बजेट फ्रेंडली कार सर्वाधिक विकल्या जात असल्या तरी सर्वात जास्त चर्चा ही लक्झरी कारची होत असते. त्यामुळेच अनेकांना नेहमीच उत्सुकता असते की, जगातली सर्वात महागडी कार कोणती आहे आणि तिची किंमत किती आहे?

आज आपण अशाच एका जबरदस्त लक्झरी कारबद्दल जाणून घेणार आहो, जी केवळ आकर्षक नाही, तर जगातील सर्वात महागडी कार देखील आहे. ही कार म्हणजे Rolls-Royce La Rose Noire Droptail.

कधी आणि कुठे लाँच झाली ही लक्झरी कार?

ऑगस्ट 2023 Rolls-Royce La Rose Noire Droptail कार जागतिक बाजारात लाँच करण्यात आली. Rolls-Royce सारख्या प्रतिष्ठित ब्रँडकडून तयार करण्यात आलेली ही कार म्हणजे लक्झरी कार्सच्या दुनियेत एक नवा मैलाचा दगड आहे.

‘या’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी ‘लक्झरी’ झाली! चक्क Diwali Bonus म्हणून मिळाली आलिशान कार

ही कार सुमारे 30 मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात जवळपास 211 कोटी रुउपयांची आहे. इतक्या प्रचंड किमतीत लाँच करण्यात आली होती. ही किंमत इतकी अफाट आहे की सामान्य व्यक्ती आयुष्यभर कमावलं तरीदेखील ती विकत घेणे शक्य होणार नाही!

Rolls-Royce La Rose Noire Droptail ची इंजिन पॉवर किती आहे?

ही लक्झरी सुपरकार केवळ सौंदर्यातच नव्हे, तर पॉवर आणि परफॉर्मन्समध्येही कमालीची आहे. या कारमध्ये 6.75-लिटर ट्विन-टर्बो V12 इंजिन देण्यात आले आहे. जे 563 bhp ची पॉवर आणि 820 Nm टॉर्क जनरेट करतं. ही कार केवळ 2-सीटर आहे, म्हणजे एक ड्रायव्हर आणि एक प्रवासी. याचे हार्ड टॉप रिमूव्हेबल आहे, म्हणजेच ही कार ड्रॉपटेल स्टाईलमध्ये ओपन-एअर अनुभव देऊ शकते. बॉडी बनवताना कार्बन फायबर, स्टील आणि अ‍ॅल्युमिनियम यांचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे कार हलकी पण मजबूत राहते.

भारतात लाँच होणारी Audi Q3 प्रवाशांसाठी किती सुरक्षित? Euro NCAP Test मध्ये किती मिळाली सेफ्टी रेटिंग?

डिझाइन आणि फिनिश

या कारचा एक विशेष भाग म्हणजे याचे आकर्षक आणि वेगळे डिझाइन. Black Baccara Rose नावाच्या फ्रेंच फुलांच्या पाकळ्यांपासून प्रेरणा घेऊन हे डिझाइन तयार करण्यात आले आहे. ही पाकळी कोणत्याही कोनातून पाहिल्यावर वेगवेगळ्या शेड्समध्ये चमकते, आणि याच तंत्रज्ञानाचा वापर कारच्या बॉडी पेंटमध्ये करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, कारच्या अंतिम कलर कॉम्बिनेशनसाठी तब्बल 150 पेक्षा अधिक टेस्ट्स घेण्यात आल्या होत्या. यावरून या कारमध्ये असलेले बारकावे आणि मेहनत लक्षात येते.

 

Web Title: World most expensive car rolls royce la rose noire droptail know price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 06:16 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • cars

संबंधित बातम्या

Triumph Bonneville 400 भारतात लवकरच होणार दाखल! क्लासिक 350 ला देणार टक्कर; पाहा हे स्पाय फोटोज
1

Triumph Bonneville 400 भारतात लवकरच होणार दाखल! क्लासिक 350 ला देणार टक्कर; पाहा हे स्पाय फोटोज

Yamaha R2 डीलरशिपमध्ये दाखल; लवकरच सुरू होणार या नव्या स्पोर्ट्सबाइकची डिलिव्हरी
2

Yamaha R2 डीलरशिपमध्ये दाखल; लवकरच सुरू होणार या नव्या स्पोर्ट्सबाइकची डिलिव्हरी

इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनी अल्ट्राव्हायोलेटला 85 मिलियन डॉलरचा निधी! प्रोडक्शन वाढवून अमेरिकेत उतरण्याची तयारी
3

इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनी अल्ट्राव्हायोलेटला 85 मिलियन डॉलरचा निधी! प्रोडक्शन वाढवून अमेरिकेत उतरण्याची तयारी

Nissan Pixo Electric City Car: निसान पिक्सो इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; 259 किमी रेंजसह मिळणार स्मार्ट फीचर्स
4

Nissan Pixo Electric City Car: निसान पिक्सो इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; 259 किमी रेंजसह मिळणार स्मार्ट फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.