'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी 'लक्झरी' झाली!
दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. खासकरून कर्मचारी वर्गात तर या सणाची विशेष वाट पहिली जाते. याचे कारण म्हणजे दिवाळी बोनस. पूर्ण वर्षभर नित्यनियमाने काम केल्यानंतर दिवाळीत बोनस मिळण्याचे सुख काही औरच असते. बोनससोबतच गिफ्ट म्हणून काही जणांना सोनपापडी मिळते तर काही जणांना वेगवेगळ्या भेटवस्तू मिळतात. मात्र, काही कंपन्या अशा असतात ज्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना असे गिफ्ट देतात, जे ते कधीच विसरू शकणार नाहीत. असेच एक खास गिफ्ट चंदिगढच्या फार्मा कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
या फार्मा कंपनीच्या गिफ्टमुळे संपूर्ण इंटरनेट तिचीच चर्चा आहे. चंदीगडमधील एका कंपनीने दिवाळीनिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क 51 आलिशान कार भेट दिल्या. ही भेट औषध कंपनी एमआयटीएसने दिली. कंपनीचे संस्थापक एमके भाटिया हे स्वतः कारच्या चाव्या देताना दिसले आहे. असे माहिती आहे की त्यांनी 51 कर्मचाऱ्यांना कार भेट दिल्या आहेत, ज्यात एक महिंद्रा स्कॉर्पिओ-एन आणि इतर अनेक एसयूव्हीचा समावेश आहे.
पैसे तयार ठेवा! गेम चेंजर्स टेक्सफॅबचा IPO 28 ऑक्टोबरपासून सुरू होईल; किंमत पट्टा 96–102
माध्यमांच्या वृत्तानुसार, कंपनीने त्यांच्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या कार भेट दिल्या आहेत. या दिवाळी भेटीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, कंपनीने असे करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील वर्षांत, त्यांनी दिवाळीत कर्मचाऱ्यांना विविध वाहने भेट दिली आहेत. आता कंपनीमध्ये ही एक परंपरा बनली आहे.
कंपनीचे हे पाऊल विशेषतः खास मानले जाते कारण त्यांची स्वतःची कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे. संस्थापक एमके भाटिया यांनी २००२ मध्ये एका मेडिकल स्टोअरपासून सुरुवात केली होती, परंतु त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. मात्र, त्यांनी यातून शिकत पुन्हा एकदा कंपनी उभारण्याचा निर्णय घेतला आणि 2015 मध्ये एमआयटीएस ग्रुप सुरू केला. आज, त्यांच्याकडे भारत आणि परदेशात कार्यरत असलेल्या 12 कंपन्यांचे मालक आहेत.