भारतात लाँच होणारी Audi Q3 प्रवाशांसाठी किती सुरक्षित?
भारतीय ऑटो मार्केटमध्ये कार खरेदी करताना आता ग्राहक त्यांच्या सुरक्षिततेकडे देखील लक्ष देत आहे. त्यामुळेच अनेक ऑटो कंपन्या देखील त्यांच्या नवीन कारमध्ये उत्तम सेफ्टी फीचर्स समाविष्ट करत आहे. तसेच क्रॅश टेस्टमध्ये देखील अनेक कार्सचे टेस्टिंग होत आहे. नुकतेच लक्झरी ऑटो कंपनी Audi ने देखील त्यांच्या आगामी कारचे क्रॅश टेस्टिंग केले आहे.
भारतीय बाजारात ऑडी अनेक सेगमेंटमध्ये आपली वाहने विकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी लवकरच नवी Audi Q3 भारतात सादर करू शकतो. त्याआधी या SUV चा क्रॅश टेस्ट करण्यात आला आहे. हा क्रॅश टेस्ट कोणत्या संस्थेने केला आहे, त्यात तिला किती गुण मिळाले आहेत, आणि ही SUV प्रौढ व मुलांसाठी किती सुरक्षित आहे, याबाबतची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊयात.
ऑडीची नवी Audi Q3 अलीकडेच क्रॅश टेस्टसाठी सादर करण्यात आली होती. Euro NCAP या संस्थेने या SUV चे क्रॅश टेस्ट केला असून, याला 5 स्टार्स सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.
बजेट प्लॅन असा ज्यामुळे काही मिनिटातच Tata Safari होईल तुमच्या नावावर, किती असेल EMI?
प्रौढांच्या सुरक्षेसाठी या SUV ने 87% गुण मिळवले आहेत. यामध्ये Frontal Impact साठी 16 पैकी 12 गुण. Lateral Impact साठी 16 पैकी 15 गुण. तसेच Rear Impact आणि Rescue साठी 4 पैकी 4 गुण
Euro NCAP च्या टेस्टिंगनंतर मिळालेल्या निकालांनुसार, या SUV ने एकूण 49 पैकी 42.5 गुण मिळवले आहेत. यामध्ये Frontal Impact आणि Lateral Impact मध्ये 15.5 आणि 8 गुण. Safety Features मध्ये 13 पैकी 7 गुण. CRS Installation Check मध्ये 12 पैकी 12 गुण.
‘या’ 5 CNG Car म्हणजे वरचा दर्जा! किंमत 4.62 लाखांपासून सुरु, जाणून घ्या फीचर्स
Euro NCAP ने Audi Q3 SUV TFSI 110 kW या व्हेरिएंटचे क्रॅश टेस्ट केले आहे. हा लेफ्ट हँड ड्राईव्ह व्हेरिएंट आहे. मात्र, ही सुरक्षा रेटिंग लेफ्ट आणि राईट हँड ड्राईव्ह दोन्ही व्हेरिएंट्ससाठी लागू आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑडी लवकरच भारतात ही SUV अपडेटसह लाँच करू शकते. मात्र, कंपनीकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.