फोटो सौजन्य: iStock
ज्याप्रमाणे जगभरात कार्सच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे, त्याचप्रमाणे अपघाताच्या संख्येत देखील वाढ होताना दिसत आहे. अशावेळी योग्य खबरदारी घेणे महत्वाचे आहे. नुकताच एक रिपोर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यात जगात कोणत्या देशात सर्वात जास्त अपघात होतात त्याबद्दल माहिती मिळाली आहे.
वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू 2024 नुसार, अनेक देशांमध्ये रस्ते सुरक्षा हे एक गंभीर आव्हान आहे. या आकडेवारीच्या आधारे, 10 देशांची यादी तयार करण्यात आली आहे, जिथे सर्वाधिक कार अपघातांची नोंद झाली आहे.
जरी भारत जगातील सर्वात मोठ्या वाहन बाजारपेठांपैकी एक असला तरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात इथे अपघात आणि मृत्यूची नोंद हिट असते. तरी ही यादी केवळ नोंदवलेल्या अपघातांवर आधारित आहे. या यादीत भारताचा समावेश नाही. चला जाणून घेऊयात 2024 मध्ये सर्वात जास्त कार अपघात कुठे झाले त्याबद्दल जाणून घेऊयात.
‘या’ 4 घोडचुका टाळाच ! अन्यथा तुमच्या नजरेसमोरच तुमची कार होईल भस्मसात
2024 मध्ये अमेरिकेत सर्वाधिक कार अपघातांची नोंद झाली होती. ही संख्या १९ लाखांपेक्षा अधिक होती. यामुळे 36,000 हून अधिक लोकं मृत्युमुखी पडले. तर 27 लाखांहून अधिक लोक जखमी झाले. दर दहा लाख लोकसंख्येमागे सरासरी 5,938 अपघात झाले. अमेरिकेत जागरूकता मोहिमा असूनही, कार अपघात ही एक गंभीर समस्या बनली आहे.
जपानमध्ये एकूण 540,000 कार अपघातांची नोंद झाली होती, ज्यात अंदाजे 4,700 लोक मृत्युमुखी पडले आणि 600,000 हून अधिक जखमी झाले. जपानमध्ये चांगले रस्ते असूनही, हा आकडा चिंतेचा विषय आहे.
जर्मनीमध्ये 300,000 हून अधिक अपघातांची नोंद झाली होती, ज्यात अंदाजे 3,000 मृत्यू झाले. हे प्रमाण प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे 3,612 आहे. हाय स्पीड ऑटोबान आणि हाय सेफ्टी टेक्नॉलॉजी असूनही, अपघातांची संख्या जास्त राहिली आहे.
तुर्कीमध्ये 175,000 कार अपघात झाले, ज्यामध्ये 5,473 जणांचा मृत्यू झाला आणि 283,234 जण जखमी झाले. अपघातांची मुख्य कारणे म्हणजे खराब रस्ते, जास्त वेग आणि वाहतूक नियमांचे दुर्लक्ष.
इटलीमध्ये 172,000 हून अधिक कार अपघातांची नोंद झाली, ज्यामध्ये 3,173 जणांचा मृत्यू झाला आणि 241,000 हून अधिक जण जखमी झाले. या अपघातांची मुख्य कारणे मद्यपान करून गाडी चालवणे आणि मोबाईल फोनचा वापर असल्याचे सांगितले जाते.
युनायटेड किंग्डममध्ये एकूण 123,000 अपघात झाले, ज्यात 1,800 मृत्यू आणि 160,000 जखमी झाले. वाहतुकीचे नियम सामान्यतः पाळले जात असले तरी, पाऊस आणि जास्त वेग ही अपघातांची कारणे आहेत.
Kia Carens Clavis आणि Kia Carens च्या किमतीत फक्त 9000 हजारांचा फरक, कोणती MPV आहे बेस्ट?
कॅनडामध्ये, 106,000 अपघातांची नोंद झाली, ज्यामुळे 1,761 मृत्यू आणि 140,000 हून अधिक जखमी झाले. खराब हवामान आणि चालकांचे लक्ष विचलित होणे ही येथील मुख्य कारणे आहेत.
स्पेनमध्ये 104,000 कार अपघात झाले, ज्यामध्ये 1,755 जणांचा मृत्यू झाला आणि 139,000 जण जखमी झाले. स्पीड, ड्रग्ज आणि रात्रीच्या वेळी गाडी चालवणे ही अपघातांची मुख्य कारणे मानली जातात.
फ्रान्समध्ये 56,000 अपघातांची नोंद झाली, ज्यात 3,237 लोक मृत्युमुखी पडले आणि 70,000 हून अधिक जखमी झाले. दर दशलक्ष लोकसंख्येमागे अपघातांचे प्रमाण 833 आहे, जे कमी आहे, परंतु मृत्युदर हा चिंतेचा विषय आहे.
बेल्जियममध्ये 37,699 अपघात झाले. येथे जड वाहतूक, पाऊस, धुके आणि चालकाचा निष्काळजीपणा यासारख्या घटकांमुळे अपघात होतात.