फोटो सौजन्य: X
भारतीय ऑटोमोबाईल सेक्टरची व्याप्ती ही खूप मोठी आहे. त्यामुळेच तर इथे अनेक स्वदेशी आणि विदेशी ऑटो कंपन्या आपल्या दमदार कार ऑफर करत असतात. यातीलच एक विदेशी ऑटो कंपनी म्हणजे किया मोटर्स. या कंपनीने विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने 23 मे 2025 रोजी, त्यांची नवीन एमपीव्ही Kia Carens Clavis लाँच केली. याआधी, किआ फक्त कॅरेन्स विकत होती. आता ही नवीन कार लाँच झाल्यामुळे Kia Carens Claivs खरेदी करावी की Kia Carens असा प्रश्न निर्माण झाला आहे.
किआ कॅरेन्स क्लॅव्हिसच्या बेस व्हेरियंट मध्ये दोन इंजिन पर्याय दिले जात आहेत. यात 1.5 लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन आणि सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले जात आहे. दुसरा इंजिन पर्याय म्हणून, 1.5 लिटर क्षमतेचे डिझेल इंजिन उपलब्ध असेल. यामध्ये सहा-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देखील दिले जाईल.
तेच Kia Carens मध्ये तीन इंजिन पर्याय दिले जातील. त्यात फक्त स्मार्टस्ट्रीम G1.5 T-GDi 6iMT, स्मार्टस्ट्रीम G1.5 6MT आणि 1.5L CRDi VGT 6MT प्रकार उपलब्ध असतील.
Kia Carens Clavis च्या बेस व्हेरियंट म्हणून देण्यात येणारी HTE अनेक उत्तम फीचर्स देखील देते. यात 15 आणि 16 इंच व्हील्स, आइस क्यूब हॅलोजन हेडलाइट्स, एलईडी टेल लॅम्प, पोल टाइप अँटेना, इंडिगो मेटल पेंट डॅशबोर्ड, टू टोन इंटीरियर, लगेज बोर्ड, सेमी लेदरेट सीट्स, डबल डी स्टीअरिंग व्हील, पॉवर स्टीअरिंग, पॉवर विंडो, मॅन्युअल ड्रायव्हर सीट हायड अॅडजस्ट, मॅन्युअल एसी, की-लेस एंट्री, फोल्डिंग की, 12.5 इंच एलसीडी क्लस्टर, 4.2 इंच एमआयडी, टाइप सी चार्जिंग पोर्ट, रिअर पार्किंग सेन्सर अशी अनेक फीचर्स दिले आहेत.
दुसरीकडे, किया कॅरेन्समध्ये 15 आणि 16 इंच टायर्स, हॅलोजन लॅम्प, हॅलोजन टेल लॅम्प, शार्क फिन अँटेना, टिल्ट स्टीअरिंग, पॉवर विंडो, रिअर व्ह्यू कॅमेरा, 12.5 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, आठ इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार प्ले, सेमी लेदरेट सीट्स, टाइप सी चार्जिंग पोर्ट, कीलेस एंट्री, यासह अनेक फीचर्स यात असतील.
किआ कॅरेन्स क्लॅव्हिसमध्ये सहा एअरबॅग्ज, एबीएस, बीएएस, ईएससी, व्हीएसएम, हिल असिस्ट, ईएसएस, डीबीसी, टायर प्रेशर सेन्सर, रियर पार्किंग सेन्सर, स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, इम्पॅक्ट सेन्सिंग ऑटो डोअर अनलॉक, थ्री पॉइंट सीट बेल्ट रिमाइंडर, आयएसओफिक्स चाइल्ड अँकरेज, चारही व्हील्समध्ये डिस्क ब्रेक देण्यात येत आहेत.
दुसरीकडे, किया कॅरेन्समध्ये ABS, EBD, ESC, HAC, VSM, DBC, सहा एअरबॅग्ज, मागील पार्किंग सेन्सर, चारही चाकांवर डिस्क ब्रेक, ISOFIX चाइल्ड अँकरेज, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक अशी सेफ्टी फीचर्स असतील.
कियाने कॅरेन्स क्लॅव्हिसची एक्स-शोरूम किंमत 11.50 लाख रुपये ठेवली आहे. ही किंमत त्याच्या बेस व्हेरियंट HTE साठी आहे. तर दुसरीकडे, किया कॅरेन्स फक्त एकाच व्हेरियंटमध्ये येते, ते म्हणजे Premium Optional. या व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 11.41 लाख रुपये आहे.