फोटो सौजन्य: iStock
भारतीय ग्राहक पूर्वी कार खरेदी करताना फक्त त्याच्या मायलेज आणि किमतीवर लक्ष द्यायचे. मात्र, आज ही स्थिती पूर्णपणे बदललेली आहे. याचे कारण म्हणजे ग्राहकांमध्ये त्याच्या सुरक्षिततेबाबत झालेली जनजागृती. म्हणूनच तर अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये उत्तम सेफ्टी फीचर्स असणाऱ्या कार ऑफर करत आहे. तसेच क्रॅश टेस्टिंग करत कंपनीची कार किती सुरक्षित आहे? याबाबत सुद्धा तपशील मिळत आहे.
हल्ली भारतीय ऑटो बाजारपेठेत अश्या कारच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे, ज्यामध्ये सेफ्टी फीचर्स भर दिला जात आहे. भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत NCAP) क्रॅश टेस्टिंगद्वारे कार सुरक्षिततेचे मूल्यांकन करते. चला आपण अशा पाच प्रमुख सेफ्टी फीचर्सबद्दल जाणून घेऊयात जी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.
2 लाखाचं डाउन पेमेंट आणि Toyota Taisor ची चावी हातात मिळाल्याशिवाय राहणार नाही, किती असेल EMI?
बजेट कार असो किंवा हाय-एंड कार, एअरबॅग्ज तुमच्या सुरक्षिततेसाठी नेहमीच आवश्यक असतात. पूर्वी कारमध्ये फक्त दोन एअरबॅग्ज होत्या, परंतु कुटुंबांना लक्षात घेऊन सरकारने सर्व कारमध्ये सहा एअरबॅग्ज अनिवार्य केल्या आहेत. एअरबॅग्ज अपघातांचा धोका कमी करतात आणि ड्रायव्हर व प्रवाशांचे जीव वाचवतात.
कार चालवताना अनेकदा ब्लाइंड स्पॉट आढळतात, जे ड्रायव्हरला दिसत नाहीत. यामुळे रस्ते अपघात होण्याचे प्रमाण वाढू शकते. म्हणूनच, आता कारमध्ये ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन फीचर बसवले आहे, ज्यामुळे ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित होते.
ही सिस्टीम कारच्या चारही टायर्समध्ये बसवण्यात आली आहे. जी अचूक हवेच्या दाबाची माहिती देते. लोक अनेकदा त्यांचे टायर वेळेवर फुगवू शकत नाहीत, ज्यामुळे वाहनाच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो आणि ते लवकर खराब होतात. कार कंपन्यांनी हे गांभीर्याने घेतले आहे आणि वाहनांमध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) बसवण्यास सुरुवात केली आहे. या फीचरमुळे तुम्हाला प्रत्येक टायरमध्ये किती हवा आहे हे कळते.
ESC हे एक अतिशय उपयुक्त सेफ्टी फिचर आहे. हा फिचर चालकाचे वाहनावरील नियंत्रण गमावण्यापासून प्रतिबंधित करते. ESC कार वळवताना किंवा जोरात ब्रेक लावताना घसरण्यापासून रोखण्यास मदत करते.
अँटी-लॉक ब्रेकिंग अचानक ब्रेक लावताना नियंत्रण राखण्यास मदत करते. ते पावसाळी रस्त्यावर घसरण्यापासून देखील प्रतिबंधित करते.