Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tesla चा मार्केट गार करायला आली Xiaomi ची ‘ही’ कार! 3 सेकंडमध्ये पकडते 100 किमीची स्पीड, जाणून घ्या रेंज

जगभरात Tesla च्या कार्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. हीच क्रेझ कमी करण्यासाठी Xiaomi SU7 ही वेगवान इलेक्ट्रिक कार लाँच झाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 23, 2026 | 09:47 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:

चिनी स्मार्टफोन कंपनी म्हणून ओळखली जाणारी Xiaomi आता इलेक्ट्रिक कार मार्केटमध्येही वेगाने आपली ओळख निर्माण करताना दिसत आहे. नुकतेच कंपनीने आपली नवीन Xiaomi SU7 इलेक्ट्रिक कारचे अपडेटेड मॉडेल लाँच केले आहे. ही कार आधीपेक्षा अधिक पॉवरफुल, सुरक्षित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लॉंग रेंज आणि अतिशय फास्ट स्पीड, ज्यामुळे ती इतर इलेक्ट्रिक कार्सपेक्षा वेगळी ठरते.

किंमत आणि व्हेरिएंट

Xiaomi SU7 तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे; स्टँडर्ड, प्रो आणि मॅक्स. स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत सुमारे 30 लाख रुपयांपासून सुरू होते. प्रो व्हेरिएंटची किंमत अंदाजे 34 लाख रुपये आहे, तर टॉप मॅक्स व्हेरिएंटची किंमत सुमारे 41 लाख रुपयांपर्यंत जाते. या प्रत्येक व्हेरिएंटमध्ये फीचर्स आणि परफॉर्मन्सनुसार फरक आहे.

Honda चा मास्टरस्ट्रोक! ‘या’ राज्यातील प्लांटचा करणार विस्तार; दरवर्षी 6 लाखांहून अधिक वाहन उत्पादित करण्याचे लक्ष

बॅटरी, रेंज आणि स्पीड

Xiaomi SU7 ची सर्वात मोठी ताकद म्हणजे याची बॅटरी आणि परफॉर्मन्स. कंपनीच्या माहितीनुसार, प्रो व्हेरिएंट एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर सुमारे 902 किमीपर्यंत चालू शकतो. ही कार फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि केवळ 15 मिनिटांत सुमारे 670 किमी रेंज मिळू शकते. 10% ते 80% चार्ज होण्यासाठी फक्त 12 मिनिटे लागतात. स्पीडच्या बाबतीतही ही कार अतिशय वेगवान आहे. ती 0 ते 100 किमी प्रति तासाचा वेग फक्त 3.08 सेकंदात पकडते आणि तिचा टॉप स्पीड 265 किमी प्रति तास आहे.

स्मार्ट फीचर्स

Xiaomi SU7 मध्ये अनेक प्रगत फीचर्स देण्यात आले आहेत. यात Snapdragon 8 Gen 3 चिप आणि NVIDIA DRIVE AGX Thor चिपचा समावेश आहे. कारमध्ये 6 डिस्प्ले स्क्रीन आहेत, ज्या मागे बसलेले प्रवासीही कंट्रोल करू शकतात. ही कार Xiaomi च्या HyperOS वर चालते, ज्यामुळे घरातील स्मार्ट डिव्हाइसेसही कारमधून नियंत्रित करता येतात. यामध्ये AI व्हॉइस असिस्टंटचाही समावेश आहे.

Volkswagen Taigun Faelift च्या लाँच होण्याची तयारी सुरु? मिळाली ‘ही’ महत्वाची माहिती

डिझाइन आणि सेफ्टी

Xiaomi SU7 चे डिझाइन प्रीमियम आणि आकर्षक आहे. ही सुमारे 5 मीटर लांबीची सेडान कार आहे. यात 9 वेगवेगळ्या रंगांचे पर्याय मिळतात. आतील सीट्स लांब प्रवासात आराम मिळावा यासाठी खास डिझाइन केल्या आहेत.

सेफ्टीसाठी यात 9 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत आणि मजबूत स्टील बॉडी वापरण्यात आली आहे. बॅटरी डिझाइन अशा प्रकारे केले आहे की अपघाताच्या वेळी आग लागण्याचा धोका कमी होतो. तसेच ही कार रस्त्याच्या परिस्थितीनुसार स्वतःची ग्रिप आपोआप अ‍ॅडजस्ट करू शकते.

Web Title: Xiaomi su7 updated model launched compete with tesla cars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 09:42 PM

Topics:  

  • automobile
  • Tesla
  • xiaomi update

संबंधित बातम्या

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
1

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
2

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
3

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
4

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.