फोटो सौजन्य: Pinterest
भारतीय ऑटो बाजार म्हणजे व्यव्यसायाची उत्तम संधी! याच संधीचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी अनेक विदेशी ऑटो कंपन्या देशात उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत असतात. अशीच एक जर्मनी ऑटो कंपनी म्हणजे Volkswagen. कंपनीची मिड साइझ एसयूव्ही Volkswagen Taigun ला भारतात चांगली मागणी आहे. आता लवकरच कंपनी मार्केटमध्ये या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच होण्याची शक्यता आहे.
भारतामध्ये Volkswagen विविध सेगमेंटमध्ये आपली वाहने ऑफर करत असते. मिड-साईज SUV सेगमेंटमध्ये कंपनीची Volkswagen Taigun ही लोकप्रिय कार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या SUV च्या फेसलिफ्ट व्हर्जनची अलीकडे पुन्हा टेस्टिंग करताना नोंद झाली आहे. याबाबत समोर आलेली माहिती पुढीलप्रमाणे आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, Volkswagen भारतात Taigun च्या फेसलिफ्ट व्हर्जनच्या लॉन्चची तयारी करत आहे. अलीकडेच या SUV ला Pune येथे टेस्टिंगदरम्यान पाहण्यात आले आहे.
Skoda Kushaq Vs Hyundai Creta: फीचर्स, इंजिन आणि किमतीत कोणती SUV सुसाट? जाणून घ्या
पुण्यात दिसलेल्या युनिटमध्ये एक्सटीरियर डिझाइनमध्ये काही बदल दिसून आले आहेत. सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये नवीन डिझाइनच्या हेडलाइट्स दिल्या जाऊ शकतात. मात्र, ही युनिट लेफ्ट-हँड ड्राइव्ह असल्यामुळे हे बदल ग्लोबल मॉडेलसाठीही असू शकतात.
पुण्यात लाल रंगातील युनिटची टेस्टिंग सुरू आहे. यापूर्वीही ही SUV पाहण्यात आली होती, ज्यामधून काही अतिरिक्त माहिती मिळाली होती. नवीन व्हर्जनमध्ये अधिक आक्रमक हेडलाइट्स, कनेक्टेड LED DRLs, कनेक्टेड टेल लाइट्स दिल्या जाऊ शकतात. तसेच नवीन फ्रंट ग्रिल, अपडेटेड बंपर, स्किड प्लेट आणि 17 इंच अलॉय व्हील्स मिळण्याची शक्यता आहे.
देशात MG Windsor EV चा जलवा! ‘या’ शहरात भरपूर डिमांड; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
माहितीनुसार, या SUV च्या इंजिनमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. सध्याच्या मॉडेलप्रमाणेच 1.0 लिटर आणि 1.5 लिटर पेट्रोल इंजिनचे पर्याय उपलब्ध राहतील. यासोबत 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय मिळू शकतात.
कंपनीकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, अंदाजानुसार Volkswagen Taigun Facelift पुढील तीन महिन्यांत भारतात लाँच होऊ शकते.






