फोटो सौजन्य: @SawyerMerritt 9X.com)
इलेक्ट्रिक कार्सच्या मागणीत सतत वाढ होत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकतेच एका चिनी इलेक्ट्रिक कारची झालेली ताबडतोड विक्री. इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनात आता चीन देखील पुढे जात आहे. चिनी ऑटो कंपनी BYD तर जगभरात आपल्या कार्समुळे नावाजली जात आहे. भारतात सुद्धा ग्राहकांचा BYD च्या कार्सना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, आज आपण अशा एका कारबद्दल जाणून घेणार आहोत, जिला फक्त 3 मिनिटात 2 लाख प्री-ऑर्डर मिळाल्या आहेत.
Xiaomi ने चीनमध्ये त्यांची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही YU7 लाँच केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अवघ्या 18 तासांत या कारने 2.40 लाखांहून अधिक युनिट्सची विक्रमी बुकिंग आणि अवघ्या 3 मिनिटांत 2 लाख प्री-ऑर्डर मिळवली आहे. यावरून शाओमीने हे सिद्ध केले आहे की ते आता केवळ स्मार्टफोन ब्रँड नाही तर इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या जगात एक प्रमुख ब्रँड बनत आहे.
Ola-Uber ड्रायव्हर होण्याचा विचार करताय? कंपनी लवकरच लागू करणार ‘हा’ नियम
Xiaomi YU7 ची लोकप्रियतेवरून अंदाज लावता येतो की बुकिंग सुरू होताच कंपनीला फक्त 3 मिनिटांत 2 लाख प्री-ऑर्डर मिळाले. पुढच्याच तासात हा आकडा 2.89 लाखांवर पोहोचला आणि 2.40 लाखांहून अधिक ग्राहकांनी त्यांची ऑर्डर देखील कन्फर्म केली.
कंपनीने तीन प्रकारचे बुकिंग पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेत – एक नॉर्मल प्री-ऑर्डर, दुसरा नॉन-रिफंडेबल इन्स्टंट ऑर्डर आणि तिसरी प्रायोरिटी डिलिव्हरी, जी सुरुवातीच्या प्रतिसादानंतर बंद करण्यात आली.
कंपनीने Xiaomi YU7 तीन वेगवेगळ्या बॅटरी व्हेरिएंटसह सादर केली आहे, जे ग्राहकांच्या गरजेनुसार त्याची रेंज आणि परफॉर्मन्स अत्यंत फ्लेक्सिबल बनवते. पहिल्या व्हेरिएंटमध्ये 96.3kWh बॅटरी आहे जी रिअर-व्हील ड्राइव्ह (RWD) कॉन्फिगरेशनमध्ये 835 किमी पर्यंतची रेंज देते. दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 96.3kWh बॅटरी देखील आहे परंतु ती ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD Pro) सिस्टमने सुसज्ज आहे, जी 760 किमीची रेंज देते. त्याच वेळी, तिसऱ्या आणि सर्वात पॉवरफुल व्हेरिएंटमध्ये 101.7kWh बॅटरी आहे, जी AWD मॅक्स कॉन्फिगरेशनमध्ये 770 किमी पर्यंत चालण्याची क्षमता ठेवते. या आकडेवारीनुसार YU7 थेट टेस्ला मॉडेल Y आणि इतर हाय-एंड इलेक्ट्रिक वाहनांसोबत स्पर्धा करू शकते.
6 लाखांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ कारने इतर ऑटो ब्रँड्सचा उतरवला माज, एका झटक्यात मिळवले 1 लाख ग्राहक
Xiaomi YU7 च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर याची सुरुवातीची किंमत 2,53,500 युआन म्हणजेच सुमारे 30 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, जी टेस्ला मॉडेल Y पेक्षा सुमारे 1.19 लाख रुपये स्वस्त आहे. अशाप्रकारे, Xiaomi YU7 केवळ तांत्रिकदृष्ट्या सक्षम नाही तर पैशाच्या बाबतीत आणि विशेषतः मध्यम-प्रीमियम EV SUV सेगमेंटमधील ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय म्हणून उदयास येत आहे.