फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये विविध प्रकारच्या कार्स विकल्या जातात. जसे की पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक. यातही इलेक्ट्रिक कार्स मोठ्या प्रमाणात लाँच जरी होत असल्या तरी आजही ग्राहकांचा ओढा सीएनजी कार्सकडे दिसत आहे. हीच मागणी लक्षात घेत, अनेक ऑटो कंपन्या आपल्या कार्स सीएनजी पर्यायात सुद्धा लाँच करत असतात. मात्र, आज आपण अशा कारबद्दल जाणून घेणार जिने FY25 मध्ये दमदार विक्री केली आहे.
भारतीय ग्राहकांमध्ये नेहमीच सीएनजी कारची मागणी राहिली आहे. जर आपण FY25 मधील विक्रीबद्दल बोललो तर, हॅचबॅक सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी वॅगनआर ही सर्वाधिक विक्री होणारी सीएनजी कार बनली आहे. या काळात Maruti Suzuki Wagonr सीएनजीला एकूण 1,02,128 ग्राहक मिळाले. अशाप्रकारे, मारुती वॅगनआर ही स्वतःच्या कंपनीच्या एर्टिगा नंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी सीएनजी आहे. मारुती सुझुकी वॅगनआरच्या फीचर्स, पॉवरट्रेन आणि किमतीबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.
या Chinese Electric Car चा अमेरिकेत बोलबाला ! लाँच होताच लोकांची खरेदीसाठी झुंबड
या कारमध्ये 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 4-स्पीकर म्युझिक सिस्टम, स्टीअरिंग माउंटेड ऑडिओ आणि फोन कंट्रोल्ससह 14 इंचाचे अलॉय व्हील्स अशी फीचर्स आहेत. याशिवाय, सेफ्टीसाठी, कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज आणि रियर पार्किंग सेन्सर्स सारखी फीचर्स देखील देण्यात आली आहेत. मारुती वॅगनआरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.79 लाख रुपयांपासून टॉप मॉडेलमध्ये 7.62 लाख रुपयांपर्यंत आहे.
कारची एक्स शोरूम स्वस्त मात्र ऑन रोड किंमत महाग, नक्की भानगड काय? सोप्या पद्धतीने जाणून घ्या
दुसरीकडे, जर आपण या कारच्या पॉवरट्रेनबद्दल बोललो तर, ग्राहकांना मारुती सुझुकी वॅगनआरमध्ये 2 इंजिन पर्याय मिळतात. पहिले 1.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे जास्तीत जास्त 67bhp पॉवर आणि 89Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तर दुसरे 1.2-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे जास्तीत जास्त 90bhp पॉवर आणि 113Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. वॅगनआरमध्ये सीएनजी पॉवरट्रेनचा पर्याय देखील उपलब्ध आहे जो 34 किलोमीटरपेक्षा जास्तचा मायलेज देतो.