
3 व्हेरिएंट आणि वेगवेगळे रंग
यामाहा आर2 तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. बेस आर2ची किंमत Rs 2,30,500, क्विक शिफ्टर व्हेरिएंटची Rs 2,39,500 आणि टॉप आर2एमची किंमत Rs 2,53,000 आहे. बेस मॉडेलला मेटॅलिक ब्लॅक आणि डार्क ब्लुइश ग्रे रंग मिळतात. मिड व्हेरिएंटमध्ये मॅट व्हाइट पर्ल आणि रेसिंग ब्लू पर्याय आहेत, तर आर2एमला मेटॅलिक ग्रे रंग देण्यात आला आहे.
यामाहा R15 V4 चे अपडेटेड व्हर्जन भारतात लाँच; आता आणखी 2 रंगांमध्ये क्विकशिफ्टरची सुविधा
R1 आणि R9 ची डिझाइन प्रेरणा
आर2च्या डिझाइनमध्ये यामाहाच्या फ्लॅगशिप आर1ची झलक पाहायला मिळते. फ्रंटला कॉम्पॅक्ट बाय-फंक्शनल एलईडी हेडलाइटसोबत ड्युअल एलईडी पोझिशन लाइट्स आहेत. स्कल्प्टेड फेअरिंग आणि घट्ट बॉडीवर्कमुळे बाईकला आक्रमक स्पोर्ट्सबाइक लूक मिळतो. या डिझाइनवर यामाहाच्या आर9 मॉडेलचाही प्रभाव दिसतो.
फीचर्समध्येही भरपूर टेक्नॉलॉजी
आर2मध्ये 17-इंच अलॉय व्हील्स, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, असिस्ट आणि स्लिपर क्लच, यामाहा राइड कंट्रोलसह स्ट्रीट, स्पोर्ट आणि रेन राइड मोड्स देण्यात आले आहेत. याशिवाय 5-इंच फुल-कलर टीएफटी डिस्प्ले, स्मार्ट की, 37 मिमी यूएसडी फ्रंट फोर्क्स आणि ड्युअल-चॅनेल एबीएस मिळते. मिड आणि टॉप व्हेरिएंटमध्ये बाय-डायरेक्शनल क्विक शिफ्टरही उपलब्ध आहे.
204cc इंजिनसह हलके वजन
यामाहा आर2मध्ये 204cc सिंगल-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड आणि फ्युल-इंजेक्टेड इंजिन आहे. हे इंजिन 26.1 bhp पॉवर आणि 19.1 Nm टॉर्क तयार करते. बाईकचे कर्ब वजन फक्त 149 kg असल्याने ती आपल्या सेगमेंटमधील हलक्या मोटरसायकलींपैकी एक ठरते. आर2चा सामना भारतीय मार्केटमध्ये केटीएम आरसी 200 आणि हिरो करिझ्मा एक्सएमआर 210 सोबत होणार आहे.