(फोटो सौजन्य-AI एआय)
क्लच न वापरता गियर बदलण्याची सुविधा
R15 V4 मधील क्विकशिफ्टर हे युनिडायरेक्शनल सिस्टीम आहे. त्यामुळे बाइक वेग घेत असताना क्लच लीव्हर न दाबता वरचा गियर बदलता येतो. पण गियर डाउन करण्यासाठी नेहमीप्रमाणे क्लचचा वापर करावा लागतो. त्यामुळे स्पोर्टी रायडिंगमध्ये गियर बदलताना रायडरला वेग आणि नियंत्रण राखणे सोपे होते. पण ही सुविधा अजून सर्व रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आलेली नाही.
155cc इंजिन आणि 6-स्पीड गिअरबॉक्स
यामाहा R15 V4 मध्ये 155cc, सिंगल-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. Variable Valve Actuation म्हणजेच VVA तंत्रज्ञानासह हे इंजिन 18.1 bhp पॉवर आणि 14.2 Nm टॉर्क तयार करते. इंजिनला 6-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. VVA तंत्रज्ञानामुळे वेगवेगळ्या RPM वर वाल्व्ह ऑपरेशनमध्ये बदल करून पॉवर डिलिव्हरी जास्त कंट्रोलड ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
स्पोर्ट्स बाइकला मिळते प्रीमियम हार्डवेअर
R15 V4 मध्ये Deltabox फ्रेम, 37 mm USD फ्रंट फोर्क्स आणि लिंक्ड-टाइप Monocross रिअर सस्पेंशन मिळते. ब्रेकिंगसाठी पुढे 282 mm आणि मागे 220 mm डिस्क ब्रेक असून ड्युअल-चॅनेल ABS देण्यात आले आहे. बाइकला 17-इंच अलॉय व्हील्स मिळतात. सीटची उंची 815 mm, ग्राउंड क्लीअरन्स 170 mm आणि कर्ब वेट 141 kg आहे. फ्युल टँकची क्षमता 11 लिटर आहे.
सुपरकारचा लुक आता स्कुटरमध्ये! ‘Mansory’ ने मॉडिफाय केली Yamaha TMAX 560; पाहा काय आहे खास
फीचर्समध्ये LED लाइटिंग आणि डिजिटल कन्सोल
यामाहा R15 V4 मध्ये बाय-फंक्शनल LED हेडलॅम्प, LED पोझिशन लॅम्प, LED टेललॅम्प आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळतो. कन्सोलवर गियर पोझिशन आणि VVA स्टेटससह विविध माहिती पाहता येते. निवडक व्हेरिएंटमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि ट्रॅक्शन कंट्रोलची सुविधाही उपलब्ध आहे. आता Racing Blue आणि Matte Pearl White रंगांमध्ये क्विकशिफ्टरचा पर्याय मिळाल्याने या स्पोर्ट्स बाइकची इलेक्ट्रॉनिक फीचर लिस्ट आणखी विस्तारली आहे.






