
फोटो सौजन्य: Gemini
रिपोर्टनुसार, कंपनीने ज्या बाईक बंद केल्या आहेत त्यामध्ये यामाहा Yamaha YZF R3 आणि Yamaha MT 03 यांचा समावेश आहे. मात्र, कंपनीकडून अद्याप तरी याबाबत कोणतीही औपचारिक माहिती देण्यात आलेली नाही. डीलरशिपमध्ये दोन्ही बाईक्सचा स्टॉक आधीच संपला आहे आणि त्यांची आयात देखील थांबवण्यात आली आहे. कंपनीनेने दोन्ही मोटारसायकली भारतात सीबीयू म्हणून ऑफर केल्या आहेत.
नवीन MG Hector भारतात लाँच! फीचर्स आणि इंजिन असं जे Mahindra आणि Tata ला धडकी भरेल
यामाहा YZF R3 ची एक्स-शोरूम किंमत 4.65 लाख रुपये होती आणि MT03 ची एक्स-शोरूम किंमत 4.60 लाख रुपये होती. ऑक्टोबर 2025 मध्ये किमतीत सूट जाहीर करण्यात आली, ज्यामुळे किमती अनुक्रमे 3.39 लाख आणि 3.30 लाख रुपये झाल्या.
कंपनी दोन्ही बाईकवर समान इंजिन देत असे. हे 321 सीसी पॅरलल ट्विन इंजिन होते, जे 41.42 बीएचपी पॉवर आणि 29.5 एनएम टॉर्क निर्माण करते. दोन्ही बाईक्स 6-स्पीड ट्रान्समिशन देखील देण्यात आले.
कंपनीने समोर USD फोर्क्स, मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन, ड्युअल-चॅनेल ABS, दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि एलईडी लाईट्स असे फीचर्स दिले होते.
या बाईक बाजारात नेकेड आणि फेयर्ड बाईक म्हणून उपलब्ध होत्या. त्यांनी KTM Duke,Suzuki Gixxer 250, आणि Bajaj बाईक्सशी स्पर्धा केली होती.