Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विशेष : राष्ट्राध्यक्षांच्या मारेकऱ्याचा शेवट

अमेरिकेनं जवाहिरीला धडा का शिकवला, त्याची अमेरिकेला इतकी भीती का वाटत होती आणि जवाहिरी नेमका होता तरी कोण, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली, तर एका चित्रपटाच्या कथेला शोभेल अशी माहिती मिळते. अमेरिकेच्या कट्टर शत्रूराष्ट्रापेक्षा कडवट असलेल्या ओसाबा बिन लादेन आणि जवाहिरीला एकाही सैनिकाचा वापर न करता यमसदनी धाडण्याचं कौशल्य अमेरिकेनं दाखवलं. अचूक माऱ्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर त्यासाठी करण्यात आला. जवाहिरीच्या खात्म्यानं अल-कायदाला मोठा धक्का बसला असून, अल-कायदाची पार्श्वभूमी लक्षात घेता भारतानं सावध राहण्याची गरज आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Aug 07, 2022 | 06:00 AM
ayman al zawahiri america took revenge for the assassin of the president nrvb

ayman al zawahiri america took revenge for the assassin of the president nrvb

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेच्या ट्वीन टॉवरवर हल्ला करून, त्यात दोन हजार नागरिकांचे बळी घेणाऱ्या अल-कैदाच्या दोन्ही म्होरक्यांना यमसदनी धाडण्यात अमेरिकेला यश आलं आहे. अमेरिका हे अजिंक्य राष्ट्र असून त्यावर कोणी कधीच हल्ला करू शकणार नाही, या गृहितकालाच अल-कायदानं छेद दिला होता. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेची पाळंमुळं जगभर पसरली असताना एवढ्या मोठ्या हल्ल्याची पूर्वसूचना मिळू नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं.

अमेरिकेच्या संरक्षण व्यवस्थेच्या चिंधड्या केल्यानं तिचं पित्तं खवळणं स्वाभावीक होतं. त्यानंतर मात्र अमेरिका जागी झाली. नऊ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर हल्ला झाला. त्यानंतर बरोबर दहा वर्षांनी म्हणजे दोन मे २०११ रोजी अल-कैदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला पाकिस्तानातील ओबोटाबाद येथे ठार करण्यात अमेरिकेला यश आलं. तिथंही अमेरिकेनं एकाही सैनिकाचा वापर केला नव्हता. आता अफगाणिस्तानमध्ये घुसून अल जवाहिरीला ठार करण्यात अमेरिका यशस्वी झाली.

दोन्ही मोहिमांत ड्रोनचा वापर करण्यात आला. अफगाणिस्तानच्या भूमीवर अमेरिकेचा एकही सैनिक नसताना अल जवाहिरीचा अचूक ठिकाणा शोधून त्याचा गेम करण्यात अमेरिका यशस्वी झाली. अमेरिका आपल्यावर हल्ला करणाऱ्यांना धडा शिकवताना कोणत्याही नियमांचं पालन करीत नाही, हवाई हद्दीचा भंग करून कारवाई करते, हे जगानं पाहिलं आहे.

अमेरिकेनं गेल्या वर्षीच अफगाणिस्तानमधून आपलं सैन्य माघारी घेतलं. तालिबान्यांच्या ताब्यात तिथली सत्ता दिली. अमेरिकेचा एकही सैनिक सध्या अफगाणिस्तानमध्ये नाही, तरी अल जवाहिरीचा काबूलमधील निवासस्थानाचा पत्ता अचूक शोधून त्याचा निशाणा करण्यात अमेरिका यशस्वी झाली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबाननं अफगाणिस्तानचा एक एक प्रांत काबीज करीत संपूर्ण देशाचा ताबा घेतला. त्याला एक वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच अमेरिकेनं आपली मोहीम फत्ते केली.

ज्या अफगाणिस्तानमध्ये अल-कायदाचा जन्म झाला, त्याच अफगाणिस्तानमध्ये या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याचा अमेरिकेनं अंत केला. अल जवाहिरीला वारंवार बाल्कनीत यायची सवय होती. त्याच्या या सवयीचा अमेरिकन गुप्तचर यंत्रणेनं फायदा घेऊन, तो बाल्कनीत आला असताना दोन ड्रोननं त्याच्यावर हल्ला केला.

अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जवाहिरी एका सुरक्षित घराच्या बाल्कनीमध्ये उभा होता, तेव्हाच ड्रोनच्या सहाय्यानं दोन क्षेपणास्त्रं डागण्यात आली. त्यात त्याचा अचूक वेध घेताना तिथं उपस्थित असलेल्या त्याच्या कुटुंबीयांना मात्र कोणतीही इजा होणार नाही, याची दखल घेतली गेली. २०११ मध्ये ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल-कायदाचं नेतृत्व जवाहिरीकडंच होतं. अमेरिकेवर ९/११ला झालेल्या हल्ल्याची योजना लादेन आणि जवाहिरी यांनीच आखली होती. जवाहिरीला अमेरिका ‘मोस्ट वॉन्टेड दहशतवादी’ मानत होती.

जवाहिरीवर अमेरिकेनं केलेला पहिलाच हल्ला नव्हता. जानेवारी २००६ मध्ये पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर अमेरिकेनं मिसाईल हल्ला केला होता, त्यात अल-कायदाचे चार सदस्य मारले गेले; पण जवाहिरी वाचला. दोन दिवसांनी त्यानं एक व्हिडीओ जारी केला आणि तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांना इशारा दिला की, जगातल्या सगळ्या शक्ती मिळूनही जवाहिरीला मृत्यूच्या एक सेकंदही जवळ नेऊ शकत नाहीत.

आता मात्र जगातील सर्व नाही; परंतु एकट्या अमेरिकेन शक्तीनंच त्याला मृत्यूच्या जवळ नेलं. ओसामा बिन लादेनच्या संपर्कात येऊन अल-कायदामध्ये सामील होण्यापूर्वीच अल-जवाहिरी एक भयानक दहशतवादी बनला होता. इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली, तेव्हा जवाहिरीचं नाव पहिल्यांदा प्रकाशझोतात आलं.

तोपर्यंत तो अल-कायदामध्ये सामील झालेला नव्हता. अल-कायदामध्ये सामील झाल्यानंतर आणि बिन लादेनच्या जवळ गेल्यानंतर त्यानं अनेक राष्ट्रप्रमुखांवर हल्ले करण्याचे कट रचले. १९८१ मध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अन्वर अल-सआदत यांच्या हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. तेव्हा तो प्रथम आंतरराष्ट्रीय मीडियाच्या प्रकाशझोतात आला. न्यायालयीन सुनावणीदरम्यान अल-जवाहिरीनं आपली भीतीदायक दहशतवादी विचारसरणी व्यक्त केली.

तो न्यायालयात ओरडून म्हणाला, “आम्ही अनेक त्याग केले आहेत. इस्लामचा विजय होईपर्यंत आम्ही त्याग करण्यास तयार आहोत.” अल-जवाहिरीला इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अन्वर अल-सदात यांच्या हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आलं; परंतु बेकायदेशीर शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगातून सुटल्यानंतर अल-जवाहिरी अफगाणिस्तानात गेला. तिथं एक डॉक्टर म्हणून, त्यानं अफगाण सैनिकांवर उपचार केले. ओसामा बिन लादेनचा जवळचा मित्र बनल्यानंतर अल-जवाहिरीनं इजिप्तमध्ये दहशतवादाच्या आधारे इस्लामिक राज्य स्थापन करण्याची जबाबदारी स्वीकारली.

अल-जवाहिरीनं इजिप्तमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून दीर्घकाळ लढा दिला. या लढाईत त्याचे हजाराहून अधिक दहशतवादी मारले गेले. इजिप्तचे अध्यक्ष अन्वर अल-सादात यांच्या १९९५ मधील हत्येनंतर सुमारे १५ वर्षांनी अल-कायदामध्ये सामील झालेल्या अल-जवाहिरीने पुन्हा एकदा इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचा कट रचला.

यावेळी त्याचं लक्ष्य इजिप्तचे अध्यक्ष होस्नी मुबारक होते. अल-कायदानं अदिस अबाबामध्ये होस्नी मुबारक यांच्यावर प्राणघातक हल्ला केला; मात्र ते वाचले. यानंतर इजिप्त सरकारनं इस्लामिक दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी मोहीम सुरू केली.

यामुळं अल-जवाहिरी इतका चिडला, की त्यानं बदला म्हणून इस्लामाबादमधील इजिप्शियन दूतावासावर हल्ला करण्याचे आदेश दिले. त्याच्या आदेशानुसार, आत्मघातकी हल्लेखोरांच्या पथकानं दूतावासाच्या गेटवर गनपावडरनं भरलेल्या दोन गाड्यांवर हल्ला केला. या स्फोटात १६ जणांचा मृत्यू झाला होता. इजिप्तनं या प्रकरणी जवाहिरीवर खटला चालवला आणि १९९९ मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तथापि, अल-जवाहिरी इजिप्तच्या हाती कधीच पडला नाही.

१९९६ मध्ये अल-कैदानं अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला होता. लादेननंच त्याची योजना आखली होती. बिल क्लिंटन हे मनिला येथे एका महत्त्वाच्या बैठकीला जात असताना हा हल्ला होणार होता; मात्र गुप्तचर यंत्रणांना या कटाची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ अमेरिकन ‘सीक्रेट सर्व्हिस’ला अलर्ट केलं. यानंतर थोड्याच वेळात, अमेरिकन सुरक्षा एजन्सीनं एका पुलाखाली पेरलेला बॉम्ब जप्त केला. अशा जवाहिरीचा अखेर अमेरिकेनं खात्मा केला.

अल जवाहिरीला ठार मारण्यासाठी अमेरिकन गुप्तचर संस्था ‘सीआयए’नं कोणत्या ड्रोनचा वापर केला आहे, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही; मात्र ‘रीपर प्रीडेटर-ड्रोन’चा वापर करण्यात आल्याचं मानलं जातं. हेलफायर क्षेपणास्त्र डागण्यात आलं असावं, असा अंदाज आहे. हेलफायरला ‘हेलिबोर्न लेजर फायर अँड फर्गेट मिसाईल’ असंही म्हणतात.

आता या क्षेपणास्त्राची लाँगबो आवृत्तीही आली आहे, जी रडारवर आधारित आहे. ‘सीआयए’नं अल-जवाहिरीला मारण्यासाठी हेलफायर क्षेपणास्त्राची गुप्त आवृत्ती आर नाईन एक्स वापरली आहे. या क्षेपणास्त्राचं वजन हेलफायर क्षेपणास्त्राइतकं आहे; पण त्यात वारहेड म्हणजेच गनपावडर नाही. त्याऐवजी, त्यात ब्लेड आहेत जेणेकरून ते अचूक लक्ष्यावर आदळते आणि संपार्श्विक नुकसान होण्याची शक्यता खूपच कमी असते.

यामुळेच त्याला निन्जा-बॉम्ब असंही म्हणतात. हेलफायर हे एक बहु-मिशन बहु-लक्ष्य क्षेपणास्त्र आहे. ते जमीन, आकाश आणि समुद्र या तिन्ही ठिकाणांवरून सोडलं जातं. स्ट्राइक मिशनमध्ये अमेरिकेची पहिली पसंती हेलफायर मिसाईल आहे. हेलफायरचा वापर सुरुवातीला शत्रूचे रणगाडे, आयसीव्ही वाहनं आणि लष्करी ट्रक्सना अँटी-आर्मर म्हणजेच हेलिकॉप्टरनं नष्ट करण्यासाठी वापरला जात होता; परंतु त्याचा अचूक स्ट्राइक पाहता शत्रूचे सैन्य बंकर आणि लष्करी छावण्या नष्ट करण्यासाठीदेखील त्याचा वापर केला जाऊ लागला. यामुळंच अल-जवाहिरीला ठार मारण्यासाठी अमेरिकेनं हे विशेष हेलफायर क्षेपणास्त्र वापरलं.

जवाहिरी मारला गेल्यानंतर अल- कायदाला ओसामा आणि जवाहिरीच्या तोडीचं नेतृत्व राहिलेलं नाही. ओसामाच्या हत्येनंतर अल-कायदानं भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु भारतीय गुप्तचर यंत्रणांनी तो प्रयत्न उधळून लावला. गेल्या काही वर्षांत काश्मीरमध्ये तसंच देशाच्या अन्य भागात केलेल्या दहशतवादी कारवायांत अल-कायदा आणि ‘इसिस’च्या ‘मोडस्‌ आँपरेडी’चा वापर करण्यात आला आहे. हे पाहता आता जवाहिरीच्या खात्म्यानंतर भारताला अधिक सावध राहावं लागेल.

भागा वरखडे

warkhade.bhaga@gmail.com

Web Title: Ayman al zawahiri america took revenge for the assassin of the president nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2022 | 06:00 AM

Topics:  

  • America
  • Navarashtra Update
  • Revenge

संबंधित बातम्या

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
1

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण
2

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये
3

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
4

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.