
उद्योगांमध्ये सुरक्षिततेचा नवा मंत्र! पुण्यात 'BeSafe' परिषदेचा प्रारंभ (Photo Credit - X)
“इन्स्पिरेशनल सेफ्टी लीडरशीप फॉर झीरो हार्म” या विषयसूत्रीअंतर्गत आयोजित करण्यात आलेला व ‘भारत बने सुरक्षित’ मिशनचा एक भाग असलेला हा उपक्रम सुरक्षा कार्यपद्धतींची मानके तयार करण्यासाठी, माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी व ISO 45001 च्या मापदंडांशी मेळ साधणारी शून्य-इजा म्हणजे झीरो-हार्म उद्दीष्टे पुढे नेण्यासाठी भारतभरातील आरोग्य सुरक्षा पर्यावरण व्यावसायिकांना निमंत्रित करते. नॅशनल सेफ्टी काउन्सिल (एनएससी) इंडिया व उद्योगक्षेत्रातील नेतृत्वाच्या फळीतील व्यक्तींच्या पाठबळाने बीईएसएएफई आणि थरमॅक्स लि. द्वारे संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेमध्ये भारतीय उद्योगसंस्थांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीचा गौरव करणाऱ्या बीबीएस पुरस्कारांचाही समावेश असणार आहे.
२०१६ साली तयार करण्यात आलेले बीईएसएएपसफई हे बीबीएस कार्यपद्धतीचा वापर करणाऱ्यांना सहभागी होण्यासाठी, वापरासाठी आणि त्यानुसार कामगिरी करून दाखविण्यासाठी एक मंच पुरविते. वर्तणूकीतील धोक्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या संस्था “सेफ ओन्ली ॲक्सीडेन्टली” राहतात, मात्र बीबीएसमुळे जीवन व व्यवसायाचे संरक्षण करणाऱ्या शाश्वत संस्कृतींची उभारणी होते.
या प्रसंगी बोलताना थरमॅक्सचे एमडी व सीईओ आशिष भंडारी म्हणाले, “थरमॅक्समध्ये सुरक्षा हे एक असे मूल्य आहे, ज्याच्याशी तडजोड करणे संभव नाही व भक्कम व्यवस्थांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी योग्य वर्तणूकीची साथ मिळाली पाहिजे असे आम्हाला ठामपणे वाटते. दैनंदिन सुरक्षा कार्यपद्धतींना अधिक भक्कम करण्यासाठी व आमच्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी आमच्या सुरक्षा कार्यचौकटीचा अविभाज्य भाग म्हणून बिहेवियर-बेस्ड सेफ्टी प्रोग्रामची अंमलबजावणी केल्याचा आम्हाला आनंद आहे. त्याचबरोबर थरमॅक्स लाइफ डिजिटल सेफ्टी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून धोकादायक वर्तणूक, असुरक्षित परिस्थिती, थोडक्यात चुकलेले अपघात व घटनांची नोंद करण्यासही आम्ही सक्रिय प्रोत्साहन देतो. यामुळे सुरक्षेला असलेल्या धोक्यांची दृश्यमानता वाढविण्याच्या, उत्तरदायीत्त्व अधिक पक्के करण्याच्या व सुरक्षेची हेळसांड होण्यामागे असलेल्या मूळ कारणांविषयी आमच्या लोकांना संवेदनशील बनविण्याच्या कामी मदत झाली आहे. आम्ही सुरक्षेचा एक भक्कम पाया तयार केला आहे, असा आमचा विश्वास असला तरीही आपल्या प्रयत्नांत सातत्याने सुधारणा करण्याप्रती आणि सुरक्षेच्या बाबतीत आपली कामगिरी अधिकाधिक उंचावण्याप्रती आम्ही कायम कटिबद्ध आहोत. मी अधिकाधिक संस्थांना प्रोत्साहित करू इच्छितो की, त्यांनी वर्तणूक सुरक्षेचा दृष्टिकोन स्वीकारावा आणि एक अशी संस्कृती उभारावी, जिथे झीरो-हार्म ही केवळ एक महत्त्वाकांक्षा नसेल तर काम करण्याची एक शाश्वत पद्धत असेल.”