
खरंच सिलेंडर बंद होणार का? (फोटो सौजन्य - iStock)
ज्यांच्याकडे आधीपासून पीएनजी जोडण्या आहेत, त्यांना त्यांचे एलपीजी सिलिंडर सोडून देण्यास प्रोत्साहित करण्याची सरकारची मोहीम देखील यशस्वी ठरत आहे. सरकारच्या आवाहनानंतर, आतापर्यंत १६,००० हून अधिक LPG जोडण्या परत करण्यात आल्या आहेत. ज्यांना आपल्या जोडण्या परत करायच्या आहेत, ते पोर्टलवर आपली माहिती सादर करू शकतात, जिथे स्वेच्छेने आपल्या जोडण्या परत करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी ‘हॉल ऑफ फेम’ देखील तयार करण्यात आला आहे.
घरगुती मागणीची १००% पूर्तता
Times Of India च्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, पाईपद्वारे गॅस विस्ताराचा वेग आतापर्यंतच्या उच्चांकावर आहे. सध्या, १००% घरगुती मागणी पाईपलाईनद्वारे पूर्ण केली जात आहे. पीएनजीच्या व्यावसायिक मागणीपैकी ८०% मागणी देखील पूर्ण केली जात आहे. अंदाजे ५० लाख सिलिंडरच्या अखंड पुरवठ्यासोबतच, पीएनजी नेटवर्कचा आता युद्धपातळीवर विस्तार केला जात आहे.
आता LPG गॅस सिलेंडरला करा ‘बायबाय’; तुमच्याही घरात पाईपने येणार गॅस तोही PNG
आता ९०% वितरण कोडद्वारे
गॅस वितरणातील अनियमितता आणि काळाबाजार रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑनलाइन सिलिंडर बुकिंगने विक्रमी ९५% चा टप्पा गाठला आहे. वितरणाच्या वेळी मिळणाऱ्या प्रमाणीकरण कोडमध्ये सर्वात मोठी सुधारणा दिसून आली आहे. फेब्रुवारीमध्ये केवळ ५३% वितरण कोडद्वारे केले जात होते, तर आता हा आकडा ९०% वर पोहोचला आहे. यामुळे सिलिंडर योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याची खात्री होत आहे.
यामुळेच आता सामान्यांपर्यंत सिलेंडरपेक्षाही पाईप गॅस अधिक वेगाने पोहचत आहे आणि याची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय पाईप गॅसचे कामही वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. सिलेंडरपेक्षा पाईप गॅस अनेक भागांमध्ये कधीच पोहचला असला तरीही अधिकाधिक जनता अजूनही सिलेंडरवरच अवलंबून आहे असं असताना आता सिलेंडर बंद तर होणार नाहीत ना? अशी भीतीही पसरू लागली आहे. मात्र असं कोणतंही चित्र नाही असंही सरकरातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.