Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

8th Pay Commission : 69 लाख पेन्शनधारकांची चिंता वाढली! ToR मध्ये बदलाची मागणी; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

8th Pay Commission : 8th Pay Commission च्या स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी देशातील तब्बल ६९ लाख पेन्शनधारकांची चिंता कमालीची वाढली आहे. वेतन आयोगाच्या संदर्भ अटींमध्ये पेन्शन पुनर्रचनेचा स्पष्ट उल्लेख करावा, अशी मागणी विविध पेन्शनधारक संघटनांकडून केली जात आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 09, 2026 | 03:23 PM
( सौजन्य - सोशल मीडिया )

( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • 69 लाख पेन्शनधारकांची चिंता वाढली!
  • ToR मध्ये बदलाची मागणी
  • जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8th Pay Commission : आठवा वेतन आयोगाच्या बैठका सध्या सुरुच आहेत. ७ आणि ८ सप्टेंबर रोजी चेन्नई येथे बैठक झाल्यानंतर, आयोग 9 सप्टेंबरला दिवसभर पुदुचेरी येथे बैठका घेत आहे. या बैठकांमध्ये सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या वेतन, निवृत्तीवेतन आणि भत्त्यांमध्ये संभाव्य बदलांची दिशा निश्चित केली जात आहे. दरम्यान, निवृत्तीवेतनधारकांची एक प्रमुख संघटना असलेल्या ‘रिटायर्ड एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन’ने म्हणजेच REWA ने आठव्या वेतन आयोगाच्या कार्यकक्षेत बदल करण्याची मागणी केली आहे. ( 8th Pay Commission ) 

तब्बल 7790 कोटींची मालकीण! Bollywood च्या ‘या’ Female Actor चा बिझनेस विश्वात डंका; कमाईच्या बाबतीत SRK लाही देते टक्कर

या संघटनेची मागणी आहे की, सरकारने हे स्पष्टपणे नमूद करावे की आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये १ जानेवारी २०२६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या सर्व निवृत्तीवेतनधारकांच्या आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनात सुधारणांचा समावेश असेल. नेमकं काय आहे प्रकरण?

६९ लाख निवृत्तीवेतनधारकांबाबत संभ्रम का ?

REWA च्या मते, अंदाजे ६९ लाख निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना संभ्रम आहे की आठवा वेतन आयोग त्यांच्या निवृत्तीवेतनात आणि कुटुंब निवृत्तीवेतनात सुधारणांची शिफारस करेल की नाही. संस्थेची मुख्य चिंता आठव्या वेतन आयोगाच्या ToR च्या point 2 E संबंधित आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या Death-cum-Retirement Gratuity आणि निवृत्तीवेतन रचनेच्या पुनरावलोकनावर भाष्य करण्यात आलं आहे. यात NPS, UPS आणि non-NPS निवृत्तीवेतनांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

REWA च्या म्हणण्यानुसार, यामध्ये १ जानेवारी २०२६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारकांचा आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचा स्पष्ट उल्लेख नाही. यामुळे, ज्येष्ठ निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनाला या सुधारणेचा लाभ मिळेल की नाही, असा प्रश्न निवृत्तीवेतनधारकांमध्ये निर्माण झाला आहे.

मागील वेतन आयोगांमध्ये काय होतं?

निवृत्तीवेतनधारकांच्या संघटनेने आपल्या मागणीच्या समर्थनार्थ मागील वेतन आयोगांच्या TORs देखील संदर्भ दिला आहे. REWA च्या मते, सातव्या वेतन आयोगाच्या कार्यकक्षांमध्ये सेवानिवृत्ती लाभ आणि सेवानिवृत्तीपूर्व निवृत्तीवेतनाच्या सुधारणेचा स्पष्ट उल्लेख होता. पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाच्या कार्यकक्षांमध्येही निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचा उल्लेख होता. या तुलनेच्या आधारे, संघटनेला आठव्या वेतन आयोगाच्या कार्यकक्षांमध्ये पूर्ण स्पष्टीकरण असणं आवश्यक आहे.

अर्थ मंत्रालयाकडून पूर्वीही मागण्यात आलंय स्पष्टीकरण

REWA चं म्हणणे आहे की, त्यांनी यापूर्वी अर्थमंत्री आणि अर्थ सचिवांकडून या विषयावर स्पष्टीकरण मागितले होते, परंतु संघटनेच्या मते, अद्याप कोणतेही स्पष्ट उत्तर आलेले नाही. यामुळे निवृत्तीवेतनधारकांच्या संघटनांमध्ये या विषयावर चर्चा वाढली असून, सोशल मीडियावर विविध चिंता व्यक्त केल्या जात आहेत.

प्रधानमंत्रींना पत्र लिहून काय मागणी?

७ सप्टेंबर रोजी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात, REWA ने सरकारला आठव्या वेतन आयोगाच्या कार्यकक्षेत स्पष्टपणे सुधारणा करण्याचे आवाहन केले आहे. १ जानेवारी २०२६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या सर्व निवृत्तीवेतनधारकांसाठी आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी आयोग निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्तीवेतन सुधारणांची शिफारस करेल, असे कार्यकक्षेत स्पष्टपणे नमूद करावे, असं या संस्थेने स्पष्ट केलं. जोपर्यंत कार्यकक्षेत औपचारिकपणे सुधारणा होत नाही, तोपर्यंत स्पष्टता देण्यासाठी सरकारने एक प्रसिद्धीपत्रक किंवा अधिकृत निवेदन जारी करावे, अशी विनंतीही रेवाने केली आहे.

सध्या सर्वात मोठा प्रश्न कोणता?

सध्या, निवृत्तीवेतन वाढणार की नाही यापेक्षा, आठव्या वेतन आयोगाच्या सध्याच्या कार्यकक्षेत जुन्या निवृत्तीवेतनधारकांचा स्पष्टपणे समावेश आहे की नाही, यावर अधिक वाद आहे. त्यामुळे, निवृत्तीवेतनधारक सरकारच्या पुढील स्पष्टीकरणाची आणि आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची आतुरतेने वाट पाहत आहेत. जर जुन्या निवृत्तीवेतनधारकांचा स्पष्टपणे समावेश करण्यासाठी कार्यकक्षेत सुधारणा केली गेली, तर १ जानेवारी २०२६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या अंदाजे ६९ लाख निवृत्तीवेतनधारकांसाठी आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी निवृत्तीवेतन सुधारणांचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशव्यापी मोहीम! Vedanta कडून ‘संपूर्ण पोषण’ अभियानाचा प्रारंभ; 18 राज्यांतील बालकांना मिळणार फायदा

Web Title: 8th pay commission 69 lakh pensioners demand changes in terms of reference marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • 8th pay commission
  • Pension

संबंधित बातम्या

EPS Pensioners : पेन्शनधारकांनो लक्ष द्या! बँकेच्या रांगेत उभं राहून ‘जीवन प्रमाण पत्र’ जमा करायची गरज नाही; फोनवरून थेट होईल काम
1

EPS Pensioners : पेन्शनधारकांनो लक्ष द्या! बँकेच्या रांगेत उभं राहून ‘जीवन प्रमाण पत्र’ जमा करायची गरज नाही; फोनवरून थेट होईल काम

8th Pay Commission बाबत मोठी अपडेट! 22-23 ऑक्टोबरच्या बैठकीकडे कोट्यवधी कर्मचाऱ्यांचं लक्ष्य; पगारात होणार बंपर वाढ?
2

8th Pay Commission बाबत मोठी अपडेट! 22-23 ऑक्टोबरच्या बैठकीकडे कोट्यवधी कर्मचाऱ्यांचं लक्ष्य; पगारात होणार बंपर वाढ?

Atal Pension Yojana: ४० वयानंतरही पेन्शन मिळवण्याची संधी! सरकारी योजनेत दरमहा भरा ‘इतके’ पैसे
3

Atal Pension Yojana: ४० वयानंतरही पेन्शन मिळवण्याची संधी! सरकारी योजनेत दरमहा भरा ‘इतके’ पैसे

PFRDA Pune NPS News: पुण्यात ‘एनपीएस’चा मोठा डंका!; १२,१७१ कोटींची मालमत्ता जमा, PFRDA चे सदस्य संजय पांडेंची माहिती
4

PFRDA Pune NPS News: पुण्यात ‘एनपीएस’चा मोठा डंका!; १२,१७१ कोटींची मालमत्ता जमा, PFRDA चे सदस्य संजय पांडेंची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.