
PFRDA, NPS, National Pension System, Pune News, Sanjay Pandey,
पीएफआरडीएचे पूर्णवेळ सदस्य (वित्त) संजय पांडे यांनी पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ही माहिती दिली. पेन्शन योजनांविषयी जागरूकता वाढविण्यासाठी तसेच विविध क्षेत्रांतील नागरिकांना या योजनांशी जोडण्यासाठी नवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत.
CJP Press Conference: ज्ञानेश कुमार मोदींना निवडणूक जिंकवून देतायेत का?; अभिजीत दीपकेंचा संतप्त सवाल
पुण्यात कॉर्पोरेट एनपीएसअंतर्गत १ लाख १३ हजार ३६ सभासद असून, ९ हजार १०७ कोटी रुपयांची मालमत्ता व्यवस्थापनाखाली आहे. तर सर्व नागरिकांसाठीच्या एनपीएसअंतर्गत १ लाख ४० हजार ५१८ सभासद असून, ३ हजार ६४ कोटी रुपयांची मालमत्ता व्यवस्थापनाखाली आहे.
स्वयंरोजगार करणारे नागरिक, गिग कामगार आणि लघुउद्योजकांना पेन्शन व्यवस्थेशी जोडण्यासाठी ‘एनपीएस संचय’, तर ग्रामीण महिलांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी ‘पेन्शन सखी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. मुलांच्या भविष्यासाठी बचतीला प्रोत्साहन देणाऱ्या ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेतही पुणे आघाडीवर आहे. शहरात या योजनेचे ७ हजार ६७९ सभासद असून, १८ कोटी रुपयांची मालमत्ता व्यवस्थापनाखाली आहे.
Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट
डिजिटल नोंदणी, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘पेन्शन सहाय्यक’ आणि पेन्शन योजनांची तुलना करण्यासाठी डिजिटल साधने विकसित करण्यावरही प्राधिकरणाचा भर आहे.
पुण्यातील पेन्शन योजनांची आकडेवारी :
– कॉर्पोरेट पेन्शन योजना : १ लाख १३ हजार ३६ सभासद
– सर्व नागरिकांसाठी योजना : १ लाख ४० हजार ५१८ सभासद
– एकूण सभासद : २ लाख ५३ हजार ५५४
– एकूण गुंतवणूक : १२ हजार १७१ कोटी रुपये
– ‘एनपीएस वात्सल्य’ : ७ हजार ६७९ सभासद; १८ कोटींची गुंतवणूक