Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

8th Pay Commission: 186% की 20-30% किती वाढणार कर्मचाऱ्यांचा पगार, काय आहे गोंधळ?

प्रत्येक वेतन आयोगात, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन महागाईनुसार सुधारित केले जाते. अशा परिस्थितीत, सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगातून त्यांच्या पगारात मोठी वाढ अपेक्षित आहे, किती होणार?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 08, 2025 | 04:58 PM
८ व्या वेतन आयोग लागू झाल्यावर किती वाढू शकतो पगार (फोटो सौजन्य - iStock)

८ व्या वेतन आयोग लागू झाल्यावर किती वाढू शकतो पगार (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या महिन्यात केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून, आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर काय असेल आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल याबद्दल अटकळ बांधली जात आहे. काही तज्ञांचे म्हणणे आहे की किमान मूळ वेतनात १०८-१८६ टक्के वाढ होईल. त्याचवेळी, माजी अर्थ सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी एका मुलाखतीत दावा केला होता की ही वाढ २० ते कमाल ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित असेल.

यामुळे देशातील १ कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक एकूण पगारवाढ किती असेल याबद्दल गोंधळलेले आहेत. पगार प्रत्यक्षात किती वाढू शकतो ते समजून घेऊया.

आठवा वेतन आयोग म्हणजे काय?

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या २०१६ पासून लागू झालेल्या ७ व्या वेतन आयोगाअंतर्गत वेतन मिळत आहे. प्रत्येक वेतन आयोगात, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन महागाईनुसार सुधारित केले जाते. अशा परिस्थितीत, सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगातून त्यांच्या पगारात मोठी वाढ अपेक्षित आहे.

देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी LIC च्या नफ्यात जोरदार उसळी, शेअरची काय असणार परिस्थिती

आठव्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर

माजी अर्थ सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी एका मुलाखतीत सांगितले की, सरकार आठव्या वेतन आयोगात १.९२ ते २.०८ दरम्यान फिटमेंट फॅक्टरला मान्यता देऊ शकते. तथापि, NC-JCM (नॅशनल कौन्सिल – जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी) चे सचिव शिव गोपाल मिश्रा यांचे मत आहे की हा फिटमेंट फॅक्टर 2.86 असावा. फिटमेंट फॅक्टर हा एक गुणांक आहे जो किमान मूळ वेतन किती वेळा वाढवले ​​जाईल हे दर्शवितो.

पगार वाढ किती होईल?

जर आपण जानेवारी २०२६ मध्ये लागू होणाऱ्या आठव्या वेतन आयोगाचा विचार केला तर त्यावेळचा महागाई भत्ता (डीए) सुमारे ६० टक्के असेल.

  • सध्याचे किमान वेतन (सातव्या वेतन आयोगाअंतर्गत) = ₹१८,०००
  • महागाई भत्ता जोडल्यानंतर पगार = ₹२८,८००
आता आपण आठव्या वेतन आयोगाअंतर्गत मिळणारे संभाव्य वेतन पाहूया:
  • १.९२ फिटमेंट फॅक्टरवर: नवीन किमान वेतन = ₹३४,५६० (सुमारे २०% वाढ)
  • २.०८ फिटमेंट फॅक्टरवर: नवीन किमान वेतन = ₹३७,४४० (सुमारे ३०% वाढ)
  • २.८६ फिटमेंट फॅक्टरवर: नवीन किमान वेतन = ₹५१,४८० (सुमारे ८०% वाढ)
जर आपण डीए वगळला तर पगारातील वाढ इतकी होईल:
  • १.९२ फिटमेंट फॅक्टरवर ९२% वाढ
  • २.०८ फिटमेंट फॅक्टरवर १०८% वाढ
  • २.८६ फिटमेंट फॅक्टरवर १८६% वाढ
याचा अर्थ असा की आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर पगारात २० ते ३० टक्के वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तथापि, हे सरकार आणि देशाच्या आर्थिक आरोग्यावर देखील बरेच अवलंबून असेल. त्यानुसार, किमान वेतन कमी-अधिक प्रमाणात वाढू शकते.

मोठी बातमी! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणुकदारांना लागणार ‘झटका’, सरकार करू शकते ‘ही’ घोषणा

आठव्या वेतन आयोगाचे फायदे

  • कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये वाढ होईल
  • वाढलेल्या पगारामुळे तुमची खर्च करण्याची क्षमता वाढेल
  • वाढत्या खरेदीमुळे अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल.
आठव्या वेतन आयोगातील आव्हाने
  • सरकारी तिजोरीवर अतिरिक्त ताण येईल
  • पगारवाढीचा महागाईवर परिणाम होऊ शकतो
  • खाजगी क्षेत्रात पगारातील तफावत वाढू शकते

Web Title: 8th pay commission how much salary hike 20 30 percent or 186 percent why is confusion regarding same

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 04:58 PM

Topics:  

  • 8th pay commission
  • Business News
  • Salary Hike

संबंधित बातम्या

प्रजासत्ताक दिनी Dubai सफारी! IRCTC कडून स्वस्त आंतरराष्ट्रीय पॅकेजची घोषणा; पाहा किंमत आणि सोयीसुविधा
1

प्रजासत्ताक दिनी Dubai सफारी! IRCTC कडून स्वस्त आंतरराष्ट्रीय पॅकेजची घोषणा; पाहा किंमत आणि सोयीसुविधा

India-Venezuela Crisis: अमेरिकेची मादुरोवर अ‍ॅक्शन, ट्रम्प यांचा तेलावर ताबा; पण ‘या’ एका निर्णयामुळे भारताची लागली लॉटरी!
2

India-Venezuela Crisis: अमेरिकेची मादुरोवर अ‍ॅक्शन, ट्रम्प यांचा तेलावर ताबा; पण ‘या’ एका निर्णयामुळे भारताची लागली लॉटरी!

Free Train in India: भारतात ‘ही’ खास ट्रेन आजही धावते विना तिकीट; प्रवाशांकडून १ रुपयाही घेतला जात नाही, कारण जाणून थक्क व्हाल
3

Free Train in India: भारतात ‘ही’ खास ट्रेन आजही धावते विना तिकीट; प्रवाशांकडून १ रुपयाही घेतला जात नाही, कारण जाणून थक्क व्हाल

नोकरी… ते काय असतं? स्वातीने नाकारला जॉब आणि तीन महिन्यात दहा हजारांचे केले लाखो रुपये
4

नोकरी… ते काय असतं? स्वातीने नाकारला जॉब आणि तीन महिन्यात दहा हजारांचे केले लाखो रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.