
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
या अपग्रेडमधून कंपनीचा सातत्यपूर्ण विस्तार, स्थिर मालमत्ता गुणवत्ता, प्रबळ नफा आणि पुरेसे भांडवलीकरण दिसून येते. रेटिंग एजन्सीने परवडणाऱ्या हाउसिंग फायनान्स क्षेत्रातील आधारचे प्रस्थापित स्थान, भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण व्यवसाय, निधीचे वैविध्यपूर्ण स्रोत आणि अनुभवी व्यवस्थापन टीम या मुद्दयांवर विशेष भर दिला आहे. तसेच विविध आर्थिक चक्रांमध्ये कंपनीने दाखवलेली स्थिरता आणि चांगला ऑपरेटिंग नफा राखण्याची कंपनीची क्षमता यावरही इंडिया रेटिंग्सने (Ind-Ra) प्रकाश टाकला आहे.
इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च (Ind-Ra)ने आधार हाउसिंग फायनान्सच्या क्रेडिट रेटिंगमध्ये सुधारणा करून ते ‘इंड एए’वरून ‘इंड एए+’ असे अपग्रेड केले आहे आणि आउटलुक ‘स्टेबल’ केले आहे. आधारचे प्रबळ भांडवलीकरण, जे व्यवसायाच्या वाढीस आवश्यक आधार देते, या गोष्टीचा विचार करून हे अपग्रेड करण्यात आले आहे. परवडणाऱ्या हाउसिंग फायनान्स क्षेत्रातील आधारची प्रस्थापित ओळख, किरकोळ ग्राहकांवर केंद्रित असणारे पोर्टफोलिओ आणि पुरेसे भांडवलीकरण कंपनीची प्रगती आणि क्रेडिट प्रोफाइल मजबूत ठेवण्यास मदत करत आहे.
आधारकडे निधी उभारणीचे अनेक स्रोत उपलब्ध आहेत; ज्यामध्ये बँका, नॅशनल हाउसिंग बँक, एनसीडी, ईसीबी, कमर्शियल पेपर्स आणि डायरेक्ट असाइनमेंट यांचा समावेश आहे. आधारचे किरकोळ ग्राहकांवर आधारित पोर्टफोलिओ, तसेच त्यांची प्रस्थापित अंडररायटिंग आणि वसुलीची रचना कंपनीची मालमत्ता गुणवत्ता उत्तम राखण्यात सातत्याने मदत करत आहे.
या रेटिंग अपग्रेडबाबत मत व्यक्त करत आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री. ऋषी आनंद म्हणाले, “हे रेटिंग अपग्रेड आमच्या आर्थिक ताकदीची, प्रबळ व्यवसाय मॉडेलची आणि सातत्यपूर्ण कामगिरीची मोठी पोचपावती आहे. सातत्यपूर्ण अंमलबजावणी आणि जबाबदार वाढीच्या माध्यमातून आम्ही आमच्या भागधारकांमध्ये निर्माण केलेला विश्वास आणि आत्मविश्वास यातून दिसून येतो. अधिक मजबूत क्रेडिट प्रोफाइलमुळे, आम्ही अल्प-उत्पन्न आणि वंचित बाजारपेठांमध्ये आमचा विस्तार वाढवण्यासाठी आणि अधिक कुटुंबांना अधिकृत हाउसिंग फायनान्स उपलब्ध करून देण्यासाठी उत्तम स्थितीत आहोत.”
३० जून २०२६ पर्यंत आधारची व्यवस्थापनाखालील मालमत्ता जवळपास ३१,४०० कोटी रूपये होती, ज्यामध्ये २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ६२८ शाखांचे नेटवर्क पसरलेले आहे. आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा भांडवल पर्याप्तता गुणोत्तर ४३.४ टक्के होते, तर मालमत्तेवरील परतावा ४.० टक्के होता.