Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: ‘झोपु’ कायद्याचा घेतला आढावा! उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या पहिल्या बैठकीत प्रक्रियेला गती देण्याचे धोरण

Mumbai News: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीची पहिली आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ च्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन भविष्यातील कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 12, 2026 | 08:55 AM
'झोपु' कायद्याचा घेतला आढावा! उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या पहिल्या बैठकीत प्रक्रियेला गती देण्याचे धोरण

'झोपु' कायद्याचा घेतला आढावा! उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या पहिल्या बैठकीत प्रक्रियेला गती देण्याचे धोरण

Follow Us
Follow Us:

Mumbai News: महाराष्ट्रातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाची प्रक्रिया अधिक पारदर्शक, प्रभावी आणि जलद करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीची पहिली आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ च्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन भविष्यातील कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत आमदार पराग अळवणी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.(फोटो सौजन्य – AI)

एसटी बँकेचे मुख्य कार्यालय म्हणजे गुंडागर्दीचा अड्डा; श्रीरंग बरगे यांचा आरोप

सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आणि मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या सुमोटो याचिकेअंतर्गत दिलेल्या आदेशांचे पालन करून, महाराष्ट्र सरकारच्या गृहनिर्माण विभागाने ३१ जुलै २०२६ रोजी ही तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. न्यायालयाने कायद्याच्या परिणामकारकतेचे परफॉर्मन्स ऑडिट करण्याचे निर्देश दिले होते आणि विकासक, जमीन मालक, कायदेशीर तज्ञांच्या सूचना विचारात घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

१० महिन्यांत शिफारशी सरकारला सादर करणार

उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर या तज्ज्ञ समितीला पुढील १० महिन्यांत आपल्या सविस्तर शिफारशी राज्य सरकारला सादर कराव्या लागणार आहेत. या समितीला मदत करण्यासाठी एसआरएच्या विविध विभागातील अधिकारी जसे की, अभियांत्रिकी, वित्त, भूसंपादन आणि नगररचना यांचा समावेश असलेली एक उपसमितीदेखील स्थापन केली जाईल.

वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञांची उपस्थिती

या बैठकीला गृहनिर्माण व नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, माजी खासदार राहुल शेवाळे, नगररचना संचालक जितेंद्र भोपले, वास्तुविशारद सलोनी देवधर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Shivaji Park CJP Protest : मुंबईत शिवाजी पार्कवर CJP चं आंदोलन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

प्रमुख मुद्द्यांवर सखोल विचारमंथन

समितीच्या पहिल्या बैठकीत कायद्याची सद्यस्थिती आणि पुनर्विकासातील अडथळे यांचा आढावा घेण्यात आला. झोपडपट्टीवासीयांना सन्माननीय जीवनशैली मिळावी आणि झोपडपट्टीमुक्त शहराचे स्वप्न लवकरच साकार व्हावे, यावर बैठकीत भर देण्यात आला.याशिवाय पुनर्विकासाशी संबंधित प्रशासकीय व तांत्रिक कामांना गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक बदलांवरही चर्चा करण्यात आली.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai news high level expert committee reviews sra law focuses on speeding up procedures sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • Housing Schemes
  • Mumbai News

संबंधित बातम्या

CJP Mumbai Protest : आंदोलकांची धरपकड सुरूच! शिवाजी पार्क परिसरात पोलिसांची फिल्डिंग, दंगली भडकवण्याचा पोलिसांचा डाव? मनसेचा आरोप
1

CJP Mumbai Protest : आंदोलकांची धरपकड सुरूच! शिवाजी पार्क परिसरात पोलिसांची फिल्डिंग, दंगली भडकवण्याचा पोलिसांचा डाव? मनसेचा आरोप

Pratap Sarnaik : ॲक्शन मोडमध्ये प्रताप सरनाईक! MMRDA च्या ५५४ सुरक्षा रक्षकांना थकीत पगारासह दिवाळी बोनस मिळणार
2

Pratap Sarnaik : ॲक्शन मोडमध्ये प्रताप सरनाईक! MMRDA च्या ५५४ सुरक्षा रक्षकांना थकीत पगारासह दिवाळी बोनस मिळणार

Mumbai News: वॉर्डमध्ये डॉक्टर आले नाहीत, सहकारी खोलीत पोहोचला; बाथरूम उघडताच निवासी डॉक्टर मृतावस्थेत
3

Mumbai News: वॉर्डमध्ये डॉक्टर आले नाहीत, सहकारी खोलीत पोहोचला; बाथरूम उघडताच निवासी डॉक्टर मृतावस्थेत

Mumbai News : मुंबईत ‘वंचित’ आक्रमक! हुतात्मा चौकात आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात
4

Mumbai News : मुंबईत ‘वंचित’ आक्रमक! हुतात्मा चौकात आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.