Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शत्रूची झोप उडवणार… सैन्याची ताकद वाढणार! भारतातच बनणार AK-203 रायफलच्या गोळ्या; Adani Group चे Defence क्षेत्रात मोठं पाऊल!

Adani Group AK-203 Ammunition : भारतीय संरक्षण क्षेत्रात 'आत्मनिर्भरता' वाढवण्यासाठी अदाणी ग्रुपच्या अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेसने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भारतीय सैन्याची मुख्य रायफल असलेल्या AK-203 साठी लागणाऱ्या गोळ्यांची निर्मिती आता भारतातच केली जाणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 05, 2026 | 07:20 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शत्रूची झोप उडवणार… सैन्याची ताकद वाढणार!
  • भारतातच बनणार AK-203 रायफलच्या गोळ्या
  • Adani Group चे Defence क्षेत्रात मोठं पाऊल!
Adani Group AK-203 Ammunition : भारतीय संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यानुसार महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. आताच हे मोठा निर्णय घेण्यात आला. अदाणी ग्रुपच्या अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेससने एक अत्यंत मोठं आणि महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. भारतीय सैन्याची मुख्य रायफल असलेल्या AK 2023 साठी लागणाऱ्या गोळ्याची निर्मिती भारतातच केली जाणार आहे. यामुळे भारतीय सैन्याची ताकद कैक पटीने वाढणार आहे. नेमकं काय आहे प्लॅनिंग आणि काय घडलं? सविस्तर जाणून घेऊयात. ( Adani Group AK-203 Ammunition ) 

ब्रेक लावताच तयार होणार Electricity! Vande Bharat Express चं अजब तंत्रज्ञान; कशी काम करते सिस्टीम?

अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने AK-203 असॉल्ट रायफल कार्यक्रमासाठी स्वदेशी 7.62×39 मिमी स्मॉल-कॅलिबर दारुगोळा पुरवण्यासाठी इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड (IRRPL) सोबत पाच वर्षांचा करार केला आहे. या भागीदारीमुळे भारतातील AK-203 रायफल आणि दारुगोळा उत्पादन प्रक्रिया एकत्रित केल्या जाणार आहेत. ज्यामुळे संपूर्ण कराराच्या कालावधीत एक एकात्मिक आणि सातत्यपूर्ण पुरवठा साखळी सुनिश्चित होईल. याचे उत्पादन उत्तर प्रदेशातील विविध शहरांमध्ये केले जाते.

कुठे केलं जाणार उत्पादन?

या व्यवस्थेअंतर्गत, अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस असॉल्ट रायफल्सच्या दारुगोळ्याची गरज भागवण्यासाठी पुढे आले आहेत. कानपूरमधील आपल्या उत्पादन सुविधेसह, लहान-कॅलिबर दारुगोळा निर्मितीच्या आपल्या विद्यमान क्षमतांचा वापर करणार आहे. ७.६२x३९ मिमी राऊंडसाठी भारतीय स्रोत उपलब्ध करून दिल्यामुळे आता हा करार बाहेरच्या उत्पानाअवलंबित्व कमी करतो आणि सशस्त्र दलांसाठी पुरवठ्यात सातत्य सुनिश्चित करतो.

भारत-रशिया आंतर-सरकारी करारानुसार २०१९

भारतीय सशस्त्र दलांसाठी AK-203 असॉल्ट रायफल्सचे उत्पादन करण्याकरिता भारत-रशिया आंतर-सरकारी करारानुसार २०१९ मध्ये IRRPL ची स्थापना झाली. हा संयुक्त उपक्रम उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील कोरवा येथे एक उत्पादन सुविधा चालवतो. ही कंपनी भारतीय भागधारक ॲडव्हान्स्ड वेपन्स अँड इक्विपमेंट इंडिया लिमिटेड आणि म्युनिशन्स इंडिया लिमिटेड आणि रशियन भागीदार कन्सर्न कलाश्निकोव्ह आणि रोसोबोरॉनएक्सपोर्ट यांच्यातील एक सहयोग आहे.

‘आत्मनिर्भर भारत’ या राष्ट्रीय ध्येयाला पुढे नेतो

डिसेंबर 2021 मध्ये, संरक्षण मंत्रालयाने कोरवा येथील प्रकल्पात ६,०१,४२७ एके-२०३ रायफल्सच्या उत्पादनासाठी आयआरआरपीएलसोबत एक औपचारिक करार केला. या शस्त्रांना आवश्यक असलेल्या दारुगोळ्याची एक विश्वसनीय, स्थानिक पातळीवर उत्पादित पुरवठा साखळी सुरक्षित करून, हा नवीन करार लहान शस्त्रास्त्रांच्या परिसंस्थेतील देशांतर्गत क्षमता मजबूत करतो आणि संरक्षण उत्पादनातील ‘आत्मनिर्भर भारत’ या राष्ट्रीय ध्येयाला पुढे नेतो.

Unique Business Idea : अजब कल्पना अन् गजब कमाई! लोकांची खाज घालवून ‘हा’ तरुण कमावतोय महिन्याला 1400000 रुपये!

Web Title: Adani group to manufacture ak 203 rifle bullets in india boost to defence marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Adani Group
  • Defence Sector

संबंधित बातम्या

India Defence Export : अमेरिका-चीन सोडाच, पाकिस्तानपेक्षाही मागे भारत! कसा बनणार ग्लोबल डिफेन्स हब?
1

India Defence Export : अमेरिका-चीन सोडाच, पाकिस्तानपेक्षाही मागे भारत! कसा बनणार ग्लोबल डिफेन्स हब?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.