
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Ambani House Antilia: अंबानींच्या अँटिलियालाही टक्कर! ‘या’ उद्योगपतीच्या घराची किंमत ऐकून व्हाल थक्क
अदानी समूहाने मुंद्रा बंदरावर एकात्मिक गोदामासह एक समर्पित ‘एम्प्टी कंटेनर यार्ड’ सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे. अदानींचे मुंद्रा बंदर हे भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणारे बंदर आहे. त्यामुळे यामध्ये टाकलेलं पाऊल हे व्यवसायातील सगळ्यात मोठं पाऊल मानलं जात आहे. या नवीन विस्तार योजनेअंतर्गत, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड APSEZ रिकाम्या कंटेनरची निर्मित करेल. यामध्ये निर्यातदार आणि कंटेनर फ्रेट स्टेशन्ससाठी स्टोरेज, मेंटेनेंस, इन्स्पेक्शनआणि सुलभ वाहतूक यांचा समावेश असणार आहे.
या सुविधेमुळे कंटेनर हॅन्डलिंग सोपी होईल आणि शिपिंग लाईन्स व ग्राहकांसाठी सेवा अधिक चांगली होण्यास मदत होईल. यामुळे ऑपरेशनमधील सुरक्षा आणि नियमांचं पालन आणखी मजबुतीनं केलं जाईल. रिकाम्या कंटेनरचे ऑपरेशन मुंद्रा पोर्ट SEZ मध्ये आणल्याने कस्टम अधिकारी, शिपिंग लाईन्स, टर्मिनल ऑपरेटर आणि ट्रान्सपोटर यांच्यात उत्तम ताळमेळ राहण्यास मदत होईल.
APSEZ चे CEO अश्वनी गुप्ता यांनी याबाबत स्पष्ट केलं की, “मुंद्रा येथील समर्पित रिकाम्या कंटेनर यार्डमुळे कंटेनर इकोसिस्टममधील कार्यक्षमता वाढेल. यामुळे कामाचा वेग वाढेल, अनावश्यक कंटेनर वाहतूक कमी होईल आणि लॉजिस्टिक्स खर्चात देखील सुधारणा होईल.”
अदानीचे मुंद्रा बंदर भारतातील सुमारे 35% कंटेनर व्यापार हाताळतं आणि हे देशातील सर्वात मोठे कंटेनर हँडलिंग पोर्ट आहे. त्यावर दरवर्षी 1.6 दशलक्ष TEU रिकामे कंटेनर हाताळले जातात. पुढील 5 वर्षांत 6 दशलक्ष TEU कंटेनर हाताळणी क्षमता जोडण्याची कंपनीची योजना आहे.
दरम्यान, आज BSE वर व्यवहार करताना अदानी पोर्ट्सचे शेअर्स प्राईज दोन टक्क्यांनी वाढून रु. 1,716.60 वर पोहोचले आहे. गेल्या सत्रात तो रु. 1,686.60 वर बंद झाला होता आणि आज रु. 1,704.95 वर उघडला होता. सकाळी 11.20 वाजता तो 1.31 टक्क्यांच्या वाढीसह 1708.70 रुपयांवर व्यवहार करत होता. त्यामुळे अदानींच्या व्यापारात मोठी वाढ होणार हे मात्र निश्चित आहे.