Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kinder Happiness Times Diwali Gift : यंदाची दिवाळी होणार आणखी गोड! किंडरच्या भन्नाट गिफ्ट पॅक्समुळे मुलांच्या चेहऱ्यावर येणार हसू

Kinder Happiness Times Diwali Gift : जगप्रसिद्ध कन्फेक्शनरी ब्रँड 'किंडर'ने लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्यासह यंदाच्या दिवाळीसाठी 'किंडर हॅप्पीनेस टाईम्स' ही अत्यंत आकर्षक फेस्टिव्ह गिफ्टिंग सिरीज बाजारात आणली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 17, 2026 | 01:32 PM
यंदाची दिवाळी होणार आणखी गोड! ( सौजन्य - सोशल मीडिया )

यंदाची दिवाळी होणार आणखी गोड! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • यंदाची दिवाळी होणार आणखी गोड!
  • किंडरच्या भन्नाट गिफ्ट पॅक्समुळे मुलांच्या चेहऱ्यावर येणार हसू
  • नेमकं काय आहे खास?
Kinder Happiness Times Diwali Gift : किंडर हा पॅकेज्ड मिठाई क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी फेरेरोचा लोकप्रिय कन्फेक्शनरी ब्रँड यंदाच्या दिवाळीत अधिक गोडवा वाढवण्यासाठी सज्ज झाला आहे. ब्रँडने नुकतेच आपली ‘किंडर हॅप्पीनेस टाइम्स’ ही खास फेस्टिव्ह गिफ्टिंग सिरीज सादर केली आहे. नव्या पिढीला दिवाळीच्या परंपरा, त्यामागच्या रंजक गोष्टी आणि सणाचे महत्त्व अगदी खेळता-खेळता कळावे, अशा रितीने ही भेटवस्तूंची श्रेणी डिझाइन करण्यात आली आहे. आपल्या संस्कृतीचा वारसा मुलांपर्यंत पोहोचवण्यात पालकांची भूमिका सर्वात मोलाची असते, हीच बाब लक्षात घेऊन किंडरने दिवाळीच्या पारंपरिक चालीरीतींना मजेशीर खेळाचे रूप दिले आहे, ज्यामुळे घरातील प्रत्येकाला या सणाचा मनमुराद आनंद घेता येईल. ( Kinder Happiness Times Diwali Gift ) 

US Russia Oil Tariff Decision : हुश्श…! 100% टॅरिफला ब्रेक, अमेरिकेचा मोठा युटर्न! भारत-चीनवरील कारवाई तात्पुरती स्थगित

सध्या बाजारात मिळणाऱ्या नेहमीच्या पारंपरिक चौकोनी गिफ्ट बॉक्सच्या पलीकडे जात किंडरने यंदाची दिवाळी अधिक रंगतदार आणि रंजक बनवण्यासाठी कल्पक पाऊल उचलले आहे. दिवाळीचे मुख्य आकर्षण असलेल्या रॉकेट, अनार आणि कंदील यांच्या आकारावरून प्रेरित होऊन ही तीन खास फेस्टिव्ह पॅक्सची सिरीज आणली आहे. यामध्ये किंडर जॉय, किंडर क्रीमी आणि किंडर शोको-बॉन्स क्रिस्पीचा समावेश आहे.

लोकप्रिय चवीला दिवाळीचा एक खास ट्विस्ट

प्रत्येक पॅक किंडरच्या लोकप्रिय चवीला दिवाळीचा एक खास ट्विस्ट तर देतो, शिवाय सोबत असणाऱ्या रंजक गोष्टी, माहिती आणि छोट्या-मोठ्या अॅक्टिव्हिटींमुळे कुटुंबाला सणाच्या परंपरा नव्याने अनुभवण्याची संधी मिळते. पालक व मुलांनी एकत्र येऊन खेळत, शिकत आणि निवांत क्षण घालवत दिवाळीच्या परंपरा जाणून घ्याव्यात, हा यामागचा मुख्य विचार आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या हस्ते अनावरण

१३ ऑक्टोबर रोजी मुंबईतील फिनिक्स मार्केटसिटी येथे पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या हस्ते या नव्या गिफ्टिंग सिरीजचे अनावरण करण्यात आले. “त्योहारों को बनाये खास, किंडर के साथ” हा ब्रँडचा फेस्टिव्ह मंत्र इथे एका आगळ्यावेगळ्या प्रत्यक्ष अनुभवातून मांडण्यात आला. यात रांगोळी, तोरण, पणत्या, कंदील, फुलांचे हार आणि मिठाई अशा सर्व पारंपरिक घटकांना ‘किंडर हॅप्पीनेस टाइम्स’च्या उत्साहाची सुरेख जोड देण्यात आली होती.

दिवाळीची एखादी परंपरा अनुभवता येते

किंडर फेस्टिव्ह होमच्या माध्यमातून सणांच्या परंपरा फक्त दुरून न पाहता त्यात प्रत्यक्ष सहभागी होता यावे अशी व्यवस्था करण्यात आली आहे. खास कुटुंबांसाठी डिझाइन करण्यात आलेल्या या वॉक-थ्रू सफरीत घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवाळीची एखादी परंपरा अनुभवता येते. रांगोळी काढणे, पाना-फुलांचे तोरण गुंफणे, अंगणात पणत्या लावणे, कंदील सजवणे आणि फुलांच्या माळा लावणे अशा आनंददायी प्रवासाने या घराची सुरुवात होते.

१० ते २४ ऑक्टोबर दरम्यान सुरू असलेला हा किंडर दिवाळी अनुभव सर्वांसाठी खुला आहे. सर्जनशीलता आणि एकत्र येण्याच्या या गोड क्षणांमुळे यंदाची दिवाळी कुटुंबांसाठी अधिक संस्मरणीय ठरणार आहे.

‘किंडर हॅप्पीनेस टाइम्स’ यंदाच्या दिवाळी साजरीकरणाचा अविभाज्य भाग

फेरेरो इंडियाचे मार्केटिंग हेड जोहर कापूसवाला म्हणाले, “दिवाळी म्हणजे परंपरा, सुरेख गोष्टी आणि कुटुंबासोबत निवांत घालवलेले आनंदाचे क्षण. ‘किंडर हॅप्पीनेस टाइम्स’ गिफ्टिंग सिरीजच्या माध्यमातून आम्हाला याच पारंपरिक भावनांना उजाळा द्यायचा आहे. रॉकेट, अनार आणि कंदिलाच्या अनोख्या आकारातील हे गिफ्ट पॅक्स किंडरच्या गोडव्यात दिवाळीचा उत्साह आणतात, तर किंडर फेस्टिव्ह होमच्या माध्यमातून कुटुंबे स्वतः सहभागी होऊन सणाचा आनंद घेऊ शकतात. करिश्मा कपूर यांच्या उत्साही उपस्थितीने या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली. आम्हाला खात्री आहे की, ‘किंडर हॅप्पीनेस टाइम्स’ यंदाच्या दिवाळी साजरीकरणाचा अविभाज्य भाग बनेल.”

आकर्षक पॅकेजिंगसह ही किंडर हॅप्पीनेस पॅक्स आता देशभरातील पारंपरिक किराणा दुकाने, आधुनिक ट्रेड आऊटलेट्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत. ‘किंडर हॅप्पीनेस टाइम्स’सोबत लहान क्षणांचेही एका मोठ्या आनंदोत्सवात रूपांतर करत किंडर यंदाची दिवाळी अधिक गोड आणि अविस्मरणीय बनवत आहे.

फक्त बँक खाते उघडून चालणार नाही! स्वस्त कर्ज, विमा आणि पेन्शनही मिळायला हवे; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन

Web Title: Kinder and karisma kapoor launch happiness times diwali gift series marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • Business News
  • Diwali

संबंधित बातम्या

‘बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत’, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचं मोठं विधान
1

‘बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत’, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचं मोठं विधान

Vibrant Goa Summit: उद्योगांना मिळणार जागतिक भरारी! ‘व्हायब्रंट गोवा समिट’मध्ये १,००० हून अधिक व्यावसायिक बैठका; निर्यातीला चालना
2

Vibrant Goa Summit: उद्योगांना मिळणार जागतिक भरारी! ‘व्हायब्रंट गोवा समिट’मध्ये १,००० हून अधिक व्यावसायिक बैठका; निर्यातीला चालना

Inflation: ऑक्टोबरमध्ये महागाई माजवणार हाहाःकार? घाऊक महागाई १२% आणि किरकोळ महागाई ६% ओलांडण्याची शक्यता
3

Inflation: ऑक्टोबरमध्ये महागाई माजवणार हाहाःकार? घाऊक महागाई १२% आणि किरकोळ महागाई ६% ओलांडण्याची शक्यता

School Diwali Vacation: २ नोव्हेंबरपासून शाळांना दिवाळीची सुट्टी; प्राथमिक, माध्यमिकच्या तारखा जाहीर
4

School Diwali Vacation: २ नोव्हेंबरपासून शाळांना दिवाळीची सुट्टी; प्राथमिक, माध्यमिकच्या तारखा जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.