Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Air ची भरारी! आता 5 पट वेगाने होणार डिलिव्हरी, ईशान्य भारतात केला विस्तार

Amazon Air ने आता आपला उद्योग अधिक विस्तारित केला असून ईशान्य भारतामध्येही मोठी भरारी घेतली आहे. आता डिलिव्हरीदेखील ५ पट अधिक वेगाने होणार असल्याचे सांगण्यात आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 17, 2026 | 12:16 PM
Amazon Air ची मोठी झेप

Amazon Air ची मोठी झेप

Follow Us
Follow Us:
  • नागरी उड्डयन मंत्री मा. श्री राम मोहन नायडू किंजरप्पू यांच्या हस्ते गुवाहटी कडे जाणार्‍या पहिल्या ॲमेझॉन एअरच्या पहिल्या विमानाला दाखवण्यात आला हिरवा झेंडा
  • विशेषत्वाने तयार करण्यात आलेले कार्गो नेटवर्क असलेली ॲमेझॉन ही भारतातील पहिली ईकॉमर्स कंपनी बनली 
  • या वाढीमुळे आता या भागातील छोट्या व्यवसायांसह व्यावसायिकांना मिळणार भारताच्या अन्य भागातील ग्राहकांना वेगाने सेवा देण्याची संधी 
ॲमेझॉनतर्फे आज ॲमेझॉन एअरची ईशान्य भारतात सेवा विस्तारत असल्याची घोषणा करण्यात आली. या अंतर्गत नवीन कार्गो मार्ग हे कोलकाता आणि गुवाहटी दरम्यान सुरु करण्यात येत असून यामुळे आता या भागातील वाहतूक सुविधा आणि जोडणी अधिक सक्षम होणार आहे.  त्याच बरोबर विशेष अशा हवाई क्षमते मुळे डिलिव्हरी करण्याचा वेग आणि विश्वसनीयता वाढू शकेल, ज्यामुळे ईशान्य भारतातील ॲमेझॉनची मोठ्या प्रमाणावरील उत्पादने संपूर्ण भारतातील ग्राहकांपर्यंत वेगाने आणि अधिक सातत्याने प्राप्त होऊ शकतील. 

या सेवेमुळे सेव्हन सिस्टर्स राज्ये म्हणजेच अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांना एकात्मिक अशा हवाई आणि रस्ते वाहतूकीच्या नेटवर्कने जोडून या राज्यांतील डिलिव्हरीजना सहकार्य प्राप्त होईल.  विशेष अशा हवाई क्षमतेला मल्टीमोडल वाहतूक सुविधांशी जोडल्यामुळे ॲमेझॉनला वाहतूकीचा वेळ कमी होण्याची अपेक्षा असून यामुळे पाच पट पर्यंत डिलिव्हरीचा वेळ कमी होणार आहे, यामुळे वैविध्यपूर्ण उत्पादने अगदी रोजच्या गरजांपासून ते स्मार्टफोन पर्यंत, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि ब्यूटी उत्पादनांसह अनेक उत्पादने ग्राहकांपर्यंत वेगाने उपलब्ध होऊ शकतील. 

Amazon च्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 2025’ ची घोषणा; जाणून घ्या ऑफर्स आणि डिस्काउंट्स!

एअर फ्लाईटला हिरवा झेंडा 

गुवाहटी कडे जाणार्‍या पहिल्या ॲमेझॉन एअर फ्लाईटला नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारत सरकारचे नागरी उड्डयन मंत्री श्राम मोहन नायडू किंजरप्पू यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला यावेळी त्यांच्या सह, ॲमेझॉन च्या इंडिया ॲन्ड ऑस्ट्रेलिया च्या ऑपरेशन्स चे व्हाईस प्रेसिडेंट अभिनव सिंग, ॲमेझॉन इंडिया च्या पब्लिक पॉलिसीचे व्हीपी चेतन कुमारस्वामी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

“भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारताला प्राधान्य देण्यासाठी ‘ॲक्ट ईस्ट, ॲक्ट फास्ट, ॲक्ट फर्स्ट’  दृष्टिकोन  आपल्याला दिला असून या अंतर्गत ईशान्य भारतात पायाभूत सुविधा आणि जोडणी दिल्याने हा भाग अतिशय वेगाने विकसित होत आहे. आज ईशान्येकडील प्रत्येक राज्यात विमानतळ आहे आणि काम सुरु असलेल्या विमानतळा मध्ये वाढ होऊन २०१४ मध्ये ४ विमानतळे होती ती वाढून १६ वर गेली आहेत.  ईशान्येकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरील हॉर्टिकल्चर आणि कार्गो निर्यातीसाठी  मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत.  ॲमेझॉन एअरच्या दिल्ली आणि गुवाहटी दरम्यानच्या या सुरुवाती मुळे ईशान्य भारतातील शेतकर्‍यांना, कलाकारांना आणि व्यावसायिकांना मोठे सहकार्य मिळेल. सरकार कडूनही देशातील हवाई वाहतूकीला प्रोत्साहन मिळण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या आहेत.  २०२६ च्या अर्थसंकल्पामध्ये हवाई कार्गो सुविधा आणि वेअरहाऊस क्षमतांच्या विकासासाठी विशेष भर दिला आहे, जेणेकरुन नाशिवंत आणि उच्च मुल्याच्या मालाची वाहतूक वेगाने होऊ शकेल.  त्याच बरोबर कुरियर ने निर्यात करण्यासाठीची असलेली मर्यादा काढून टाकल्याने आता परदेशातील ई कॉमर्स ला सुध्दा चालना मिळू शकेल.  आणि मी ॲमेझॉनचे या महत्त्वपूर्ण टप्प्याची सुरुवात करुन देशातील नेटवर्क वाढवल्या बद्दल अभिनंदन करतो.” असे भारत सरकारचे नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू किंजरप्पू यांनी सांगितले.

रोजगार निर्मिती 

“ईशान्येकडील राज्यांमधील व्यवसायांना आणि रोजगार निर्मितीसाठी स्थानिक व्यावसायिकांसाठी सुधारीत वाहतूक जोडणीमुळे उत्तम भूमिका बजावली जाईल. या भागातील विक्रेत्यांसाठी ॲमेझॉन एअर सेवा गुवाहटी साठी सुरु झाल्यामुळे या व्यावसायिकांना ग्राहकांची संख्या वाढवण्यासाह भारतात वेगाने वाढणार्‍या डिजिटल अर्थव्यवस्थेत त्यांचे योगदान देण्यास प्रोत्साहन मिळेल. त्याच बरोबर ग्राहकांना वेगाने आणि अधिक विश्वसनीय अशा डिलिव्हरीज आसाम आणि आसपासच्या ईशान्य भागातील समाजाला याचा लाभ होईल.  वाहतूकीतील या प्रगतीशील सुविधांमुळे स्थानीय तरुणांना सुध्दा रोजगार मिळू शकेल. अशी आशा आहे की ॲमेझॉन एअर च्या सेवा सुरु झाल्यामुळे ॲमेझॉन एअर सर्व्हिसेस कडून या भागातील एकूण आर्थिक प्रगतीला चालना मिळेल.”  असे डॉ. रवी कोटा, आयएएस, मुख्य सचिव, आसाम यांनी सांगितले.

Amazon-Flipkart Sale 2024: Flipkart-Amazon सेलमधून iPhone विकत घेतला! पण MFNP तपासले का? नंतर पश्चाताप नको

ग्राहकांसाठी उत्तम 

“ २०१३ मध्ये amazon.in सुरु केल्या पासून आम्ही सातत्याने भारतातील सर्वांत मोठ्या वाहतूक नेटवर्क्स पैकी एक नेटवर्क स्थापित करुन देशभरांतील कुठल्याही ग्राहकांना सेवा देत आहोत. ॲमेझॉन एअर च्या या ईशान्येकडील सेवांतील वाढ ही नैसर्गिक अशी गुंतवणूक असून यामुळे देशभरांतील जोडणी अधिक सक्षम करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला आम्ही अधोरेखित करत आहोत.  ही वाढ सरकारच्या सुधारीत वाहतूक सुविधांमधील सुधारणे नुसार असून यामुळे या भागातील आर्थिक संधी सुध्दा वाढण्यास मदत होईल.  ग्राहकांसाठी सुद्धा ॲमेझॉनची वैविध्यपूर्णत: आता ५ पट अधिक गतीने होणार आहे, तर ईशान्य भागातील विक्रेत्यांसह व्यावसायिकांना आता संपूर्ण भारतातील ग्राहकांशी अधिक वेगाने आणि अधिक विश्वसनीयतेने जोडणे शक्य होणार आहे.”  असे ॲमेझॉनच्या इंडिया ॲन्ड ऑस्ट्रेलिया ऑपरेशन्सचे VP अभिनव सिंग यांनी सांगितले

Web Title: Amazon air deliveries now 5 times faster expands operations in northeast india business getting bigger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • amazon
  • Business News

संबंधित बातम्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
1

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Amazon: नो स्पॅम कॉल्स, नो एजंट! अमेझॉन पेवर आता स्वतःच निवडा अन् खरेदी करा हेल्थ इन्शुरन्स
2

Amazon: नो स्पॅम कॉल्स, नो एजंट! अमेझॉन पेवर आता स्वतःच निवडा अन् खरेदी करा हेल्थ इन्शुरन्स

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
3

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ
4

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.