Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Case : ‘तलवारीने डास मारण्यासारखा प्रकार!’ ॲमेझॉन प्रकरणी हायकोर्टाने FDA ला सुनावले

Amazon Case : ई-कॉमर्स दिग्गज कंपनी ॲमेझॉनच्या अधिकाऱ्यांवर FDA ने दाखल केलेल्या FIR वर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "ही कारवाई म्हणजे तलवारीने डास मारण्यासारखा प्रकार आहे," अशी अत्यंत कडक टिप्पणी करत उच्च न्यायालयाने ॲमेझॉनच्या अधिकाऱ्यांविरोधातील FIR रद्द केली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 08, 2026 | 07:24 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘तलवारीने डास मारण्यासारखा प्रकार!’
  • ॲमेझॉन प्रकरणी हायकोर्टाने FDA ला सुनावले
  • संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे?
Amazon Case : अमेझॉन रिटेल ( Amazon Case )  इंडियाच्या भिवंडी येथील गोदामावर केलेल्या कारवाईबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला फटकारले. न्यायालयाने म्हटले की, ही कारवाई म्हणजे ‘तलवारीने डास मारण्याचा प्रयत्न करण्यासारखी’ आहे. उच्च न्यायालयाने म्हटले की, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक असले तरी, त्यासाठी योग्य दृष्टिकोनही आवश्यक आहे. सर्व व्यवसाय बंद करणे हाच एकमेव उपाय आहे का, असा प्रश्न न्यायालयाने एफडीएला विचारला. कारवाई करताना योग्य रीतीने कार्यवाही करावी, असा सल्ला न्यायालयाने विभागाला दिला.

NUCFDC Headquarter : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! NUCFDC चे मुख्यालय मुंबईत होणार; अमित शाह यांची घोषणा

संपूर्ण प्रकरण काय आहे?

हे प्रकरण ॲमेझॉन रिटेल इंडियाच्या भिवंडी येथील गोदामाशी संबंधित आहे. FDA ने आरोप केला आहे की, मुदत संपलेले खाद्यपदार्थ, जे टाकून द्यायला हवे होते, ते गोदामातून बाजारात पाठवले जात होते. या संदर्भात FDA ने गोदामावर कारवाई केली.

ॲमेझॉनचे प्रतिनिधित्व करणारे वकील व्यंकटेश धोंड यांनी न्यायालयाला सांगितले की, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी २४ जून रोजी गोदामाला भेट दिली होती. दुसऱ्याच दिवशी, गोदामाचा परवाना काही काळासाठी निलंबित करण्यात आला. त्यांनी सांगितले की, कंपनीला आपल्या त्रुटी दूर करण्यासाठी यापूर्वी कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती.

परवाना देखील रद्द

यानंतर, ॲमेझॉनने अधिकाऱ्याकडे अपील केले. पण अपीलवर सुनावणी सुरू असतानाच, एफडीएने १ जुलै रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली आणि त्यानंतर परवाना रद्द केला. प्रकरण अपीलमध्ये प्रलंबित असताना परवाना रद्द करण्याचा आदेश कसा जारी केला जाऊ शकतो, असा प्रश्न उच्च न्यायालयाने उपस्थित केला. अपील सुरू असताना अशी कारवाई केली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले.

अतिरेकी कारवाई – उच्च न्यायालय

नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य कार्यपद्धतीचे पालन केले पाहिजे, असे न्यायालयाने एफडीएला स्पष्टपणे सांगितले. कठोरतेच्या नावाखाली अतिरेकी कारवाई करू नये, असेही न्यायालयाने म्हटले. सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने FDA च्या वतीने उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला. मुंबई उच्च न्यायालय आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी घेणार आहे. या निर्णयानंतर ॲमेझॉन रिटेल इंडियाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे, परंतु या प्रकरणावर अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

Government Spending : तिजोरी रिकामी झाली हो… सरकारी खर्चामुळे मेटाकुटीला आलेत ‘हे’ देश; परिस्थिती झाली ‘बेहाल’

Web Title: Amazon case bombay high court slam fda quashes fir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • amazon
  • Amezon Prime
  • Business News
  • High court
  • Marathi News

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी
1

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड
2

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
3

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट
4

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.