
Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर
सॅटेलाईट इंटरनेट प्राव्हाईड करणारी एलन मस्कची कंपनी स्टारलिंक भारतात लवकरच सुरु होणार आहे. स्टारलिंकची भारतात सर्विस सुरु होण्याआधीच त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांची तयारी सुरु झाली आहे. स्टारलिंकला टक्कर देण्यासाठी Amazon त्यांची नवीन Amazon Leo सर्विस सुरु करण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी हा प्रोजेक्ट कुइपर नावाने ओळखला जात होता. मात्र आता या प्रोजेक्टचं नाव बदलण्यात आलं आहे. प्रोजेक्ट कुइपरचं नाव बदलून आता कंपनीने याला Amazon Leo असं नाव दिलं आहे.
असं सांगितलं जात आहे की, एंटरप्राइजेजसाठी Amazon Leo ची सर्विस याच वर्षी तर सामान्य यूजर्ससाठी Amazon Leo ची सर्विस पुढील वर्षी सुरु होणार आहे. Amazon चं असं म्हणणं आहे की, कंपनी हजारो सॅटेलाईटच्या मदतीने अशा भागांमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे, ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही. कंपनीने या प्रोजक्टचं नाव का बदललं आणि ही सर्विस कशा पद्धतीने फायदेशीर ठरणार आहे, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
Amazon चं असं म्हणणं आहे की, डोंगराळ आणि खेडेगाव यासोबतच मोठ्या शहरांमध्ये देखील अशी काही ठिकाण असतात, जिथे इंटरनेट कनेक्शन पोहोचू शकत नाही. त्यामुळे सॅटेलाईट नेटवर्कच्या मदतीने या ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी पोहोचवली जाते. Amazon गेल्या अनेक वर्षांपासून प्रोजेक्ट कुइपरवर काम करत आहे, मात्र आता कंपनीने या प्रोजेक्टचं नावच बदललं आहे. Amazon Leo नावावरून हे समजतं की, ही सिस्टिम लॉ अर्थ ऑरबिट (LEO) मध्ये प्लेस करण्यात आलेल्या सॅटलाईटद्वारे चालणार आहे.
जमीनीवर Amazon चे गेटवे एंटीना लावलेले असतात, जे सॅटेलाइटसोबत डेटा एक्सचेंज करतात. यानंतर ग्राहक त्यांच्या घरी किंवा ऑफीसमध्ये छोटे अँटीना वापरणार आहेत. स्पीडच्या आधारावर Leo Nano, Leo Pro आणि Leo Ultra ची निवड केली जाऊ शकते. यामध्ये एडवांस्ड प्रोसेसर लावलेले असतात, ज्यामुळे हे सॅटेलाइटने डायरेक्ट इंटरनेट कनेक्टिविटी प्रदान करते.
Apple मध्ये होणार मोठा बदल! टिम कुक सोडणार CEO पद , कोण घेणार त्यांची जागा? या नावाची जोरदार चर्चा
Amazon ची योजना स्पेसमध्ये 3 हजार सॅटेलाईट लाँच करण्याची आहे. हे सर्व एकत्र काम करतील, जेणेकरून ग्राहकांना मजबूत आणि स्थिर कनेक्टिव्हिटी मिळू शकेल. हे सॅटेलाइट अवकाशात पाठवण्यासाठी, Amazon ने SpaceX, Blue Origin, Arianespace आणि ULA कडून 80 रॉकेट प्रक्षेपण बुक केले आहेत. हे संपूर्ण नेटवर्क पूर्ण होण्यासाठी अनेक वर्षे लागण्याची अपेक्षा आहे.
Ans: हे हजारो Low-Earth Orbit (LEO) सॅटेलाइट्सद्वारे इंटरनेट सिग्नल पृथ्वीवरील युजर्सपर्यंत पोहोचवते.
Ans: सध्या Starlink ला भारतात पूर्ण व्यावसायिक परवानगी मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Ans: स्पीड साधारण 50 Mbps ते 150 Mbps, काही ठिकाणी यापेक्षा अधिक देखील मिळू शकतो.