
चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी 'ही' भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या
चीनी ब्रँड्स Xiaomi, Realme, Vivo, Oppo ना आता घाम फुटणार आहे. कारण आता टेक कंपनी स्मार्टफोन मार्केटमध्ये एंट्री करणार आहे. वेगाने वाढणाऱ्या भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अप्लायंसेज बनवणारी कंपनी Philips ची एंट्री होणार आहे. त्यामुळे चीनी स्मार्टफोन ब्रँड्सना आता मोठी टक्कर मिळणार आहे. Philips बऱ्याच काळापासून लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक्स अप्लायंसेज बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. आता ही कंपनी स्मार्टफोन मार्केटमध्ये देखील एंट्री करणार आहे.
Philips लवकरच भारतात बजेट स्मार्टफोन, टॅबलेट, स्मार्टवॉच आणि लॅपटॉप लाँच करणार आहे. याबाबत सतत अपडेट्स देखील समोर येत आहेत. अलीकडेच Philips ने त्यांच्या अपकमिंग प्रोडक्ट्सचा टिझर देखील रिलीज केला आहे. फिलिप्स हे प्रोडक्ट्स Zenotel च्या भागिदारीत लाँच करणार आहे. Philips चे हे आगामी प्रोडक्ट कोणतं असणार आणि त्यामध्ये कोणते फीचर्स दिले जाणार, याबाबत अपडेट समोर आली आहे. (फोटो सौजन्य – X)
Zenotel भारतीय बाजारात Philips चे प्रोडक्ट्स विकण्याचे काम करणार आहे. भारतीय बाजारात Zenotel कंपनीचे स्मार्टफोन, टॅबलेट्स, लॅपटॉप, स्मार्टवॉचसह इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स विकणार आहे. फिलिप्स गेल्या अनेक वर्षांपासून भारतात कंज्यूर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स जसे टिव्ही, रेडियो इत्यादी प्रोडक्ट्स विकत आहे. आता ही कंपनी भारतात स्मार्टफोन देखील लाँच करणार आहे.
Philips चे अपकमिंग टॅबलेटचा टिझर काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला आहे. कंपनीचा हा पहिला टॅब्लेट Philips Pad Air या नावाने लाँच केला जाणार आहे. कंपनीने त्यांच्या अपकमिंग टॅबलेटच्या अनेक स्पेसिफिकेशन्सबाबत आधीच माहिती दिली आहे. याशिवाय कंपनी बजेट स्मार्टफोन लाँच करण्याची देखील तयारी करत आहे, हा स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाणार आहे. कंपनीच्या अपकमिंग टॅब्लेटमध्ये Unisoc T606 प्रोसेसर दिला जाणार असल्याची माहिती आहे. याशिवाय हे डिव्हाईस 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करणार आहे. या डिव्हाईसमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 2K रेजोल्यूशवाला डिस्प्ले दिला जाणार आहे.
आता चक्क AI ठरवणार कर्मचाऱ्यांचं अप्रेजल! Meta ने जारी केला अजब गजब नियम, वाचून तुम्हीही व्हाल हैराण
कंपनीच्या या अपकमिंग डिव्हाईसमध्ये 7000mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते, जी 18W चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. कंपनी पुढील वर्षाच्या सुरुवातीला स्मार्टफोन आणि टॅबेलेट्ससह इतर प्रोडक्ट्स देखील लाँच केले जाणार आहेत. कंपनीने अद्याप स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्टवॉचबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र येत्या काहीच दिवसांत याबाबत माहिती शेअर केली जाण्याची शक्यता आहे. भारतात Xiaomi, OnePlus, Oppo सारखे ब्रँड्स स्मार्टफोनसह टॅबलेट, स्मार्टवॉच सारखे कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट लाँच करतात. कमी किंमतीत चांगले फीचर्स यांसारख्या कारणामुळे हे चीनी ब्रँड्सचे स्मार्टफोन, टॅबलेट लोकांना आवडतात.
Ans: Philips ही इलेक्ट्रॉनिक्स, हेल्थकेअर, होम-अॅप्लायन्सेस आणि पर्सनल केअर प्रॉडक्ट्स बनवणारी जागतिक कंपनी आहे.
Ans: LED बल्ब, ट्रिमर, शेव्हर, किचन अप्लायन्सेस, टीवी, साऊंडबार, इलेक्ट्रिक टूथब्रश, मेडिकल इक्विपमेंट इत्यादी.
Ans: नाही, Philips ही भारतीय कंपनी नाही. ती मूळची डच बहुराष्ट्रीय कंपनी आहे.